lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > शिल्पा शेट्टीने स्वीकारले डेंजर फिटनेस चॅलेंज; हिंमत असेल तर बघा जमतोय का व्यायाम

शिल्पा शेट्टीने स्वीकारले डेंजर फिटनेस चॅलेंज; हिंमत असेल तर बघा जमतोय का व्यायाम

व्यायामात आपण स्वत:चं स्वत:ला चॅलेंज दिलं तर नवीन काही शिकता येतं आणि त्याचा आपल्या फिटनेसला फायदा होतो. शिल्पा शेट्टीचा ट्रिपल स्क्वॉटस या वर्क आउटवरचा व्हायरल व्हिडीओ हेच सांगतो आहे. काय आहे हे ट्रिपल स्क्वॉटस आणि त्याचे फायदे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 04:49 PM2021-10-21T16:49:01+5:302021-10-21T16:57:51+5:30

व्यायामात आपण स्वत:चं स्वत:ला चॅलेंज दिलं तर नवीन काही शिकता येतं आणि त्याचा आपल्या फिटनेसला फायदा होतो. शिल्पा शेट्टीचा ट्रिपल स्क्वॉटस या वर्क आउटवरचा व्हायरल व्हिडीओ हेच सांगतो आहे. काय आहे हे ट्रिपल स्क्वॉटस आणि त्याचे फायदे?

Shilpa Shetty accepts Triple squats Challenge; If you have the courage, do it as Shilpa Shetty | शिल्पा शेट्टीने स्वीकारले डेंजर फिटनेस चॅलेंज; हिंमत असेल तर बघा जमतोय का व्यायाम

शिल्पा शेट्टीने स्वीकारले डेंजर फिटनेस चॅलेंज; हिंमत असेल तर बघा जमतोय का व्यायाम

Highlightsशिल्पाने दाखवलेल्या ट्रिपल स्क्वॉटस या व्यायाम प्रकारात हालचालींना गती आहे. यात हात आणि पाय वेगानं हलवावे लागतात. ट्रिपल स्क्वॉटसमुळे शरीराच्या खालच्या अवयवांच्या स्नायुंचा चांगला व्यायाम होतो.ट्रिपल स्क्वॉटस केल्यानं शरीराला गती मिळते, हातापायात चपळता येते, यामुळेच हा वर्कआउट नियमित केल्यानं वजन कमी होण्यास मदत होते.

शिल्पा शेट्टी आपला फिटनेस राखण्यासाठी नियमित व्यायाम करते हा काही बातमीचा किंवा लेखाचा विषय नाही. पण आपला फिटनेस राखण्यासाठी ती स्वत:लाच सतत आव्हान देत राहाते. ती म्हणते की, जो पर्यंत आपण नवीन काही करण्यासाठी धजावत नाही तोपर्यंत आपल्यात काहीच बदल होत नाही. नवीन काही केलं की मन एका चौकटीतून बाहेर पडतं. नव्यानं आत्मविश्वास मिळतो आणि नवीन काही केल्याचं समाधान मनाला मिळतं.

व्यायाम हा प्रकारच असा आहे की रोज तेच तेच केलं तर आपण आपल्याच भोवती एका मर्यादेची चौकट आखून घेतो. तेवढंच करत राहातो. यातून जी शरीर आणि मनाला नवीन ऊर्जा हवी असते ना ती मिळत, न काही नवीन केल्याचा अनुभव. त्याच त्याच व्यायामाच्या रुटीनची शरीराला सवय होते आणि त्या व्यायामाचा शरीराला फायदा मिळेनासा होतो. म्हणूनच आपण करत असलेल्या व्यायामातला तोचतोचपणा टाळून नवीन काहीतरी करुन बघायला हवं. व्यायामात आपण स्वत:चं स्वत:लाच चॅलेंज दिलं तर नवीन काही शिकता येतं आणि त्याचा आपल्या फिटनेसला फायदा होतो. शिल्पा शेट्टीचा व्हायरल व्हिडीओ हेच सांगतो आहे.

Image: Google

शिल्पा शेट्टीचा हा व्हायरल व्हिडीओ आहे तो ‘ट्रिपल स्क्वॉटस’ या वर्कआउटचा. पण व्हिडीओच्या सुरुवातीला शिल्पा वर्कआउटसाठी आपले केस बांधताना तिनं नवीन केलेला हेअरकटही दाखवते. अंडरकट बज नावाची ही हेअर स्टाइल करायलाही धाडस लागतं, हे का ते तिचा तो व्हायरल व्हिडीओ बघून सहज कळतं. तसेच ट्रिपल स्क्वॉटस हा व्यायाम प्रकारही अवघड असून शिल्पा तो अगदी हसत खेळत करते आहे.

शिल्पाचं म्हणणं आहे की, कोणताही धोका पत्करल्याशिवाय आणि आपला कम्फर्ट झोन सोडून बाहेर पडल्याशिवाय तुम्ही काहीच करु शकत नाही. ना असा अंडरकट बज हेअरकट ना नवीन एरोबिक एक्सरासाइज. स्क्वॉटस हा व्यायाम प्रकार सगळ्यांनाच माहिती आहे. या व्यायामाला गती नसून त्यासाठी ताकद लावावी लागते आणि तोलही सांभाळावा लागतो. हाफ किंवा फुल स्क्वॉटस करताना हात, खांदे पोट, पाठ, मांडा, पोटर्‍या आणि पावलांच्या स्नायुंवर विशिष्ट ताण पडतो. पण शिल्पाने दाखवलेल्या ट्रिपल स्क्वॉटस या व्यायाम प्रकारात हालचालींना गती आहे. यात हात आणि पाय वेगानं हलवावे लागतात. शिल्पा हा व्यायाम सूर आणि ताल यांच्या लयीवर वेगानं करते आहे. हा व्यायाम ती जीममधे करताना दिसत असून तो करताना तिने एका जागेवरुन दुसर्‍या जागेवर जाण्यासाठी एक्सरसाइज स्टेपरचा उपयोग केला आहे. ट्रिपल स्क्वॉटस हा हाय इंन्टेन्सिटी व्यायाम प्रकारात मोडतो.

शिल्पा शेट्टी अनेक व्यायाम प्रकारांबद्दल आपल्या व्हिडीओतून सांगत असते. ते कसे करायचे यासोबतच या व्यायामाचा काय फायदा होणार आहे हे देखील सांगते. यामुळे हा नवीन व्यायाम प्रकार शिकून घेण्याची प्रेरणा मिळते. ट्रिपल स्क्वॉटस या व्यायामाचेही तिने फायदे सांगितले आहेत.

Image: Google

ट्रिपल स्क्वॉटस का करावेत

1. ट्रिपल स्क्वॉटसमुळे शरीराच्या खालच्या अवयवांच्या स्नायुंचा चांगला व्यायाम होतो.
2. हा व्यायाम प्रकार करताना हाताच्या हालचाली वेगानं होत असल्यानं खांद्यानाही यामुळे बळकटी मिळते.
3. विशिष्ट लय आणि तालासोबत ट्रिपल स्क्वॉटस केले जातात, त्यामुळे ते करताना हात आणि पाय यांचा ताळमेळ जुळणं आवश्यक आहे. या व्यायामानं हातापायातला ताळमेळ जमायला लागतो.
4. ट्रिपल स्क्वॉटस केल्यानं शरीराला गती मिळते, हातापायात चपळता येते.
5. ट्रिपल स्क्वॉटस हा तीव्र हालचालींचा व्यायाम प्रकार असला तरी या हालचालींमधे ताळमेळ राखणं आवश्यक आहे. त्यासाठी एकाग्रता लागते. हा व्यायाम प्रकार केल्यानं चित्ताची एकाग्रता साधली जात असल्यानं मेंदू अणि शरीराला या व्यायामाचा लाभ होतो.

Image: Google

शिल्पा म्हणते..

ट्रिपल स्क्वॉटस याबद्दल माहिती सांगताना शिल्पा म्हणते की, शरीर चपळ करुन, शरीराच्या वेगानं हालचाली करुन वजन कमी करण्यासाठी मेंदू शांत आणि चित्त एकाग्र करण्यासाठे ट्रिपल स्क्वॉटसचा समावेश आपल्या दैनंदिन व्यायाम प्रकारात असायला हवा. एक सेट किमान एक मिनिट करावा. प्रत्येक सेटमधे 30 सेकंदाचा अवकाश घ्यावा. असे 60 सेकंदाचे ( एका मिनिटाचे) 4 सेट करावेत. हा व्यायाम नियमितपणे केला तरच वजन कमी होण्याचा अपेक्षित फायदा मिळतो. शिल्पा म्हणते की,  मेहनत केली तरच फळ मिळतं. ट्रिपल स्क्वॉटसचही असंच आहे.

https://www.instagram.com/reel/CVKNwgdDPjL/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading" data-instgrm-version="14" style=" background:#FFF; border:0; border-radius:3px; box-shadow:0 0 1px 0 rgba(0,0,0,0.5),0 1px 10px 0 rgba(0,0,0,0.15); margin: 1px; max-width:540px; min-width:326px; padding:0; width:99.375%; width:-webkit-calc(100% - 2px); width:calc(100% - 2px);">
https://www.instagram.com/reel/CVKNwgdDPjL/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading" style=" background:#FFFFFF; line-height:0; padding:0 0; text-align:center; text-decoration:none; width:100%;" target="_blank">
https://www.w3.org/2000/svg" xmlns:xlink="https://www.w3.org/1999/xlink">
View this post on Instagram

https://www.instagram.com/reel/CVKNwgdDPjL/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading" style=" color:#c9c8cd; font-family:Arial,sans-serif; font-size:14px; font-style:normal; font-weight:normal; line-height:17px; text-decoration:none;" target="_blank">A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

ट्रिपल स्क्वॉटस हा ऐकायला नवीन प्रकार असला तरी तो आहे तसा जुना. शिल्पाच्या आधी बॉडी बिल्डर याशमीन चौहान या बॉडी बिल्डरनेही हा ट्रिपल स्क्वॉटस करतानाचा व्हिडीओ व्हायरल केला हातो. याशमीनने हा व्हिडीओ व्हायरल करुन याशमीननं आव्हान दिलं की , जो कोणी आपली सर्व ऊर्जा लावून ट्रिपल स्क्वॉटस करतील ते एका मिनिटात नक्कीच थकतील. पण शिल्पानं हे चॅलेन्ज स्वीकारलं आणि तिने ते अगदी हसत खेळत पूर्ण करुन दाखवलं.
शरीर आणि मनात सकारात्मक बदल हवे असतील तर ट्रिपल स्क्वॉटस या व्यायाम प्रकाराचं चॅलेन्ज आपणही स्वीकारायला हवं.

Web Title: Shilpa Shetty accepts Triple squats Challenge; If you have the courage, do it as Shilpa Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.