Join us

हनुवटीखालची- गळ्यावरची चरबी वाढल्याने चेहऱ्याचा आकार बिघडलाय? ५ सोप्या गोष्टी करा- १५ दिवसांत दिसेल फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2025 12:42 IST

Double chin reduction exercises: Facial exercises for double chin: वाढलेले गाल आणि गळ्यावरची चरबी यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. पण काही खास व्यायाम केल्याने आपण चेहऱ्याचे सौंदर्य पुन्हा आणू शकतो.

चेहरा सुंदर दिसावा यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. त्यासाठी अनेक महागड्या क्रीम्सचा देखील वापर करतो. पण अनेकदा चेहरा सुंदर जरी दिसत असला तरी हनुवटीखालची- गळ्यावरची चरबी वाढल्याने चेहऱ्याचा आकार बिघडतो. (Double chin reduction exercises)वाढत्या डबल चिनच्या त्रासामुळे अनेकजण त्रस्त आहेत. वाढत्या वजनामुळे आपला आत्मविश्वास देखील कमी होतो. (Facial exercises for double chin)आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना आपल्या आरोग्याची काळजी घेता येत नाही.(How to lose double chin in 15 days) अशा परिस्थितीत अनेक प्रकारच्या आजारांना बळी आपण पडतो.(Best facial exercises to slim face) ज्यावेळी शरीरातील चरबी वाढते तेव्हा पोट, कंबर आणि मांड्यांमध्ये फरक जाणवू लागतो. तसेच चेहऱ्याचा आकार देखील बदलतो.(Simple face workouts to reduce cheek fat) चेहऱ्यावरील चरबी कमी करणे हे सगळ्यात कठीण मानले जाते.(Face yoga for double chin) अनेक वेळा वाढलेले गाल आणि गळ्यावरची चरबी यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. पण काही खास व्यायाम केल्याने आपण चेहऱ्याचे सौंदर्य पुन्हा आणू शकतो. (Natural ways to lose face fat)

मुलतानी मातीत कालवून 'हा' पदार्थ चेहऱ्याला लावा! भरपूर पिंपल्स- पिगमेंटेशन-डाग होतील गायब

1. त्वचेला टोन करण्यासाठी 

चेहऱ्याच्या स्नायूंना टोन करण्यासाठी स्ट्रेचिंग हा उत्तम व्यायाम आहे. हे करण्यासाठी शक्यतो तोंड शक्य तितके उघडून आपली जीभ बाहेर काढा. १० सेकंद या स्थितीत राहा. हे दररोज १० ते १५ वेळा करा. या व्यायामामुळे चेहरा आणि गालांच्या खालच्या भागातून चरबी कमी होण्यास मदत होईल. 

2. गाल उचलणे

गाल उचलण्याचा     व्यायाम गालांच्या स्नायूंना टोन करण्यास मदत करतो. यासाठी हसण्याचा प्रयत्न करा. आपले ओठ बाहेर काढा. बोटांच्या मदतीने दोन्ही गाल वर उचला आणि काही सेकंदांसाठी असेच धरुन ठेवा. पुन्हा सामान्य स्थितीत परत या. असे १० ते १५ वेळा करा. 

3. चेहऱ्याचा व्यायाम 

फिश फेस एक्सरसाइज करणे खूप सोपे आहे. हे करण्यासाठी गाल आत खेचा. यानंतर माशासारखा चेहरा बनवा आणि ५ ते १० सेकंद या स्थितीत रहा. नंतर हळूहळू सामान्य स्थितीत परत या. हा व्यायाम दिवसातून २ ते ३ वेळा करा. 

4. जबड्याचा व्यायाम 

जबड्याच्या स्नायूंना बळकटी देऊन, चेहऱ्याचा आकार सुडैल होतो. हे करण्यासाठी आपल्याला सरळ स्थितीत बसावे लागेल. त्यानंतर दातावर दात प्रेस करा. या स्थितीत पाच सेकंद राहा. असे किमान १५ ते २० वेळा करा. 

5. फुग्याचा व्यायाम 

डबल चीनपासून सुटका होण्यासाठी बलून व्यायाम चांगला आहे. फुगा फुगवताना चेहऱ्याच्या स्नायूंवर ताण येतो. ज्यामुळे अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून १ ते २ वेळा हा व्यायाम करा.  

टॅग्स :फिटनेस टिप्स