Join us  

सुपरफिट मलायका अरोरा सांगतेय पोटावरची चरबी घटवणारे सोपे व्यायाम, तिच्यासारखी फिगर हवी, मग पहा व्हिडीओ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2021 2:15 PM

बॉलीवुड अभिनेत्री मलायका अरोरा म्हणजे खऱ्या अर्थाने फिटनेस क्वीन... लाखो लोक तिच्या फिटनेसचे दिवाने असून तरूणी आणि महिलांना तर तिच्या वर्कआऊटविषयी नेहमीच उत्सूकता असते. 

ठळक मुद्देमलायका अरोरा ही बॉलीवुडची फिटनेस क्वीन आहे. त्यामुळे अगदी पहिल्याच प्रयत्नात तिच्यासारखा व्यायाम आपल्याला जमलाच पाहिजे, असा अट्टाहास करू नका. शरीराला हळू- हळू तशी सवय लावा. 

आपली फिगर मलायकासारखी करण्यासाठी अनेकींची धडपड सुरू असते. मलायकाला ही फिगर मेंटेन ठेवणे कसे जमले असेल, असा प्रश्न जर कुणाला पडला असेल, तर त्याचे उत्तर या व्हिडियोमध्ये दडलेले आहे. सुपरफिट मलायकाने एक व्हिडियो आणि फोटो नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये पोट कमी करण्यासाठी तिने काही एक्सरसाईज सांगितल्या आहेत. हे सगळेच व्यायाम अतिशय सोपे असून प्रत्येकीला आपापल्या घरी करता येतील, अशा आहेत. 

 

पहिले बाळांतपण झाले की बहुतांश बायकांना पोट सुटण्याचा त्रास जाणवतो. शरीराच्या इतर भागावरची चरबी कमी झाली, तरी सुटलेले पोट मात्र काही कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे अनेक जणी हैराण झालेल्या असतात. पण चक्क फिटनेस क्वीन मलायका अरोराने आता सुटलेल्या पोटाला  आकारात  आणण्याचा कानमंत्र सांगितला आहे. तो नक्की फॉलो करा आणि स्लिम ट्रीम दिसा...

 

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडियोच्या माध्यमातून मलायकाने पोट कमी करण्यासाठी तीन प्रकारचे व्यायाम सांगितले आहेत. हे सगळे व्यायाम करण्यासाठी तुम्हाला फक्त एका योगा मॅटची गरज पडणार आहे. 

१. पहिल्या व्यायाम प्रकारात सगळ्यात आधी ताठ बसा आणि दोन्ही पाय शक्य तेवढे एकमेकांपासून दूर घ्या. यानंतर दोन्ही हात एकमेकांत गुंफुन डोक्याच्या मागे लावा. आता एका बाजूला झुकून हाताचे कोपरे मांडीला लावण्याचा प्रयत्न करा. असाच प्रयत्न दुसऱ्या बाजूने करा. एकानंतर एक याप्रमाणे प्रत्येक बाजूने १०- १० वेळेस हा व्यायाम करा.

 

२. मलायकाने जो दुसरा व्यायाम सांगितला आहे, यामध्ये तिचे दोन्ही हातांचे तळवे आणि दोन्ही पायांचे तळवे जमिनीला टेकलेले आहेत. यानंतर आता तिने हाताचे तळवे तसेच जमिनीवर ठेवून एक पाय पुर्णपणे वर उचलला आहे. यानंतर असाच व्यायाम दुसऱ्या पायाने करायचे. पाय खाली आणि वर घेताना तो जमिनीवर टेकवायचा नाही.

३. तिसऱ्या व्यायाम प्रकारात मलायकाने नौकासनासारखी पोझिशन घेतली आहे. आणि पाय पुर्णपणे ९० डीग्रीवर उचलले आहेत. एका नंतर दुसरा अशा प्रकारे ती पाय सरळ ठेवत आहे. हे सगळे व्यायाम केले तर तुमची टमीही निश्चितच मलायकासारखी फ्लॅट होऊ शकते.

 

टॅग्स :फिटनेस टिप्समलायका अरोरा