Join us  

उष्णतेच्या त्रासामुळे गळून गेलात? आलिया- करिनाची फिटनेस ट्रेनर सांगते २ उपाय- शरीराला मिळेल थंडावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2024 4:34 PM

How To Cool Down The Body In Summer: उष्णता वाढून अंगाची आग होत असेल, गळून गेल्यासारखं वाटत असेल तर सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी सांगितलेले २ उपाय करून पाहा. (pranayam to avoid heatstroke)

ठळक मुद्देशरीरातली उष्णता कमी करून उष्माघात, डिहायड्रेशन, अशक्तपणा असा त्रास टाळण्यासाठी कोणते व्यायाम करावे, याविषयी....

सध्या सगळीकडेच खूप उकाडा वाढला आहे. दुपारच्यावेळी तर घराबाहेर पडणं सोडाच पण खिडकीबाहेर साधं डोकावूनही पाहावं वाटत नाही, एवढ्या उष्णतेच्या झळा तिव्र झाल्या आहेत. वाढत्या उष्णतेमुळे अनेकांना उन्हाळी लागणे, शरीरातून गरम वाफा आल्यासारखं होणे, डिहायड्रेशन होणे, गळून गेल्यासारखं वाटणे असे त्रास होऊ लागले आहेत (How To Cool Down The Body In Summer). हे सगळे त्रास कमी करायचे असतील तर कोणते सोपे उपाय घरबसल्या करता येतील, याविषयी आलिया भट, करिना कपूर यांच्यासारख्या सेलिब्रिटींच्या फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani) यांनी एक खास उपाय सांगितला आहे (pranayam to avoid heatstroke). यामुळे उष्माघाताचा त्रास होणार नाही, असंही त्या म्हणत आहेत. 

 

शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी २ व्यायाम

शरीरातली उष्णता कमी करून उष्माघात, डिहायड्रेशन, अशक्तपणा असा त्रास टाळण्यासाठी कोणते व्यायाम करावे, याविषयीचा एक व्हिडिओ अंशुका यांनी सोशल मिडियावर शेअर केला असून यामध्ये त्यांनी २ उपाय सुचवले आहेत.

१. शीतकारी प्राणायाम 

शीतकारी प्राणायाम करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ बसा. हाताची योगमुद्रा करून ते गुडघ्यांवर ठेवा. आता वरचे आणि खालचे दात एकमेकांवर ठेवा आणि ओठ एकमेकांपासून विलग करा.

रामनवमी विशेष नैवेद्याचे ५ गोड पदार्थ- करायला सोपे, अतिशय चवदार आणि झटपट होणारे

आता दातांच्या फटींमधून हवा आत घेत तोंडाने श्वास घ्या नाकाने बाहेर सोडा. याला शीतकारी प्राणायाम म्हणतात. ते ३ ते १५ मिनिटे एवढ्या वेळेत करावे.

 

२. चंद्रभेदन प्राणायाम 

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठीचा दुसरा उपाय आहे चंद्रभेदन प्राणायाम. हे प्राणायाम करण्यासाठी पायांची मांडी घालून किंवा वज्रासन, पद्मासन, सुखासन घालून ताठ बसा. दोन्ही हातांची योगमुद्रा करून हात गुडघ्यावर ठेवा.

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, ॲक्ने होतील छुमंतर, बघा भाग्यश्री सांगतेय तरुण त्वचेसाठी ब्यूटी सिक्रेट

आता उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्या. यानंतर डावी नाकपुडी बंद करा आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. ही क्रिया ५ ते १० मिनिटांसाठी करावी. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्ससमर स्पेशलव्यायामआलिया भटकरिना कपूर