Join us  

भारती सिंगने कसे घटवले १० महिन्यात १५ किलो वजन? ती स्वत:च सांगते घटत्या वजनाची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2023 5:59 PM

Bharti Singh lost 15 kg with intermittent fasting वजन कमी करणं सोपं नसतं पण भारती सिंगने ते जमवलं, ते नेमकं कसं?

विनोदी कलाकार भारती सिंह अतिशय लोकप्रिय आहे. तिचं विनोदाचं अचूक टायमिंग प्रत्येकाला आवडते. तिच्या लठ्ठपणावरही अनेकदा जोक्स होतात. ती स्वत:ही करते. वाढलेलं वजन हा मात्र तिच्या चिंतेचा विषयही होता. मूल होण्यापूर्वी ती याविषयी उघडपणे बोलतही असे.

२०२१ साली भारतीने बरेच वजन कमी केले होते. तिने १० महिन्यात १५ किलो वजन कमी केल्याचं समजतं. भारतीने नुकताच एक व्हिडिओ सोशल मिडियात शेअर केला. ती आपला वजन कमी करण्याचा प्रवास आणि त्यावेळचं डाएट याविषयी तपशीलवर सांगते(Bharti Singh lost 15 kg with intermittent fasting).

कसे घटवले वजन?

भारती सिंहने सांगितले की, तिला वॉक करायला आवडत नाही. त्याचवेळी, जिम करूनही वजनात विशेष फरक पडला नव्हता. रिॲलिटी शोच्या तयारीसाठी भारतीने काही काळ जिम लावली होती. परंतु जिममुळे शरीरात काही विशेष बदल घडले नाही. भारतीला विविध पदार्थ खायला प्रचंड आवडते. ती खाण्याची शौकीन आहे.

बसून - बसून कंबरेचा भाग वाढलाय? २ सोपी योगासने, मलायका अरोराही सांगते त्यांचे फायदे

ती ब्रेकफास्टमध्ये बटर आणि फुलकोबीचे पराठे खायची. पण नंतर मात्र तिनं खाण्यावर बंधन घातले. सायंकाळी सातनंतर तिनं काहीही खाणं बंद केलं. रात्री एकतर ती जेवायचीच नाही किंवा सातच्या आत काहीतरी लाइट खायची. या डाएटमुळे वजनात प्रचंड फरक पडला. हा एक इंटरमिटेंट फास्टिंगची पद्धत आहे.

३० मिनिटांत करा ४ सोपे व्यायाम, परफेक्ट फिगरचं स्वप्न होईल पूर्ण- कॅलरी बर्न झटपट

इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय?

इंटरमिटेंट फास्टिंग हा एक डाएटींगचा प्रकार आहे. या पद्धतीत काही वेळ अन्नाचे सेवन करायचे असते, तर काही वेळ उपाशी राहायचे असते. तर कधी अन्नाचे सेवन करायचे नाही, मात्र, हे डाएट फॉलो करताना आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :भारती सिंगफिटनेस टिप्स