lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > आलिया भट सांगतेय, व्यायामाच्या प्रेमात पडण्याची तिची युक्ती, व्यायाम असा केला तर होईल सोपा

आलिया भट सांगतेय, व्यायामाच्या प्रेमात पडण्याची तिची युक्ती, व्यायाम असा केला तर होईल सोपा

व्यायामातून आपल्याला काय मिळतं याबाबत आलिया म्हणते की व्यायामादरम्यान मन आणि शरीराचं जे समन्वयन होत असतं ते मला ध्यानधारणेचा अनुभव देतो. व्यायामाला आपल्या जगण्याचा भाग बनवणं ही सोपी बाब नाही. यासाठी समर्पण भाव लागतो. आलियाला हे कसं जमलं याबाबात जेव्हा विचारलं जातं तेव्हा ती महत्त्वाच्या पाच गोष्टी सांगते. आलियानं सांगितलेल्या या पाच गोष्टी म्हणजे व्यायामाच्या प्रेमात कसं पडावं याचे पाच धडेच आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 07:32 PM2021-06-08T19:32:58+5:302021-06-08T19:42:28+5:30

व्यायामातून आपल्याला काय मिळतं याबाबत आलिया म्हणते की व्यायामादरम्यान मन आणि शरीराचं जे समन्वयन होत असतं ते मला ध्यानधारणेचा अनुभव देतो. व्यायामाला आपल्या जगण्याचा भाग बनवणं ही सोपी बाब नाही. यासाठी समर्पण भाव लागतो. आलियाला हे कसं जमलं याबाबात जेव्हा विचारलं जातं तेव्हा ती महत्त्वाच्या पाच गोष्टी सांगते. आलियानं सांगितलेल्या या पाच गोष्टी म्हणजे व्यायामाच्या प्रेमात कसं पडावं याचे पाच धडेच आहेत.

Alia Bhatt says, her trick to fall in love with exercise, exercise will be easier | आलिया भट सांगतेय, व्यायामाच्या प्रेमात पडण्याची तिची युक्ती, व्यायाम असा केला तर होईल सोपा

आलिया भट सांगतेय, व्यायामाच्या प्रेमात पडण्याची तिची युक्ती, व्यायाम असा केला तर होईल सोपा

Highlightsव्यायामाबाबत आवड निर्माण व्हायची असेल तर व्यायाम करताना वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करायला हवेत असं आलिया म्हणते.आपल्या वर्कआउट नियोजनात वैविध्य हवं!आलिया म्हणते की मी व्यायाम हा माझ्या आयुष्यासाठी करते एखाद्या चित्रपटातल्या भूमिकेसाठी नाही. जी गोष्ट आयुष्याशी जोडलेली आहे ती टाळण्यापेक्षा करण्यावर भर द्या.

 आलिया भटचे फॅन्स तिला तिचे ब्युटी सिक्रेटस विचारतात तेव्हा आलिया आपण फिटनेसचे फॅन आहोत असं उत्तर देते. तिच्या या उत्तरातच तिच्या फिटनेसचं रहस्य आहे. उत्तम आरोग्य आणि चमकणारी त्वचा याचं संपूर्ण श्रेय आलिया व्यायामादरम्यान आपण गाळत असलेल्या घामाला देते.  'हे सगळं या घामामुळेच'असं ती म्हणते. व्यायाम ही सर्वात प्रिय बाब आहे. या व्यायामाला ती कधीही चुकवत नाही. या व्यायामातून आपल्याला काय मिळतं याबाबत आलिया म्हणते की व्यायामादरम्यान मन आणि शरीराचं जे समन्वयन होत असतं ते मला ध्यानधारणेचा अनुभव देतो. व्यायामाला आपल्या जगण्याचा भाग बनवणं ही सोपी बाब नाही. यासाठी समर्पण भाव लागतो. आलियाला हे कसं जमलं याबाबात जेव्हा विचारलं जातं तेव्हा ती महत्त्वाच्या पाच गोष्टी सांगते. आलियानं सांगितलेल्या या पाच गोष्टी म्हणजे व्यायामाच्या प्रेमात कसं पडावं याचे पाच धडेच आहेत. 

आलियाचे व्यायामाचे पाच धडे

  • आलिया म्हणते,जिमला जाऊ शकला नाही तर घरी ऑनलाइन ट्रेनिंग घेऊन व्यायाम करा.  जीमला जाऊन व्यायाम करण्याची सवय असल्यास कधी कधी व्यायामात खंडही पडू शकतो. कारण अचानक एखादं काम आलं तर जिमला जाणं अचानक रद्द होवू शकतं. अशा वेळेस व्यायामात खंड पडतो. हा खंड व्यायामाबाबत लळा निर्माण होऊ देत नाही. हा लळा लागायचा असेल तर काहीही झालं तरी मी व्यायाम करणारच हा निर्धार हवा. स्वत: आलियाही हेच करते. जिमला जायला जमलं नाही तर ती तिच्या ट्रेनरकडून ऑनलाइन धडे घेते आणि कूठेही असली तरी व्यायाम पूर्ण करते. आलिया म्हणते व्यायामाला विशिष्ट जागाच लागते असं नाही. आपण कूठेही असलो तरी व्यायाम करु शकतो. आलिया एकच एक प्रकारचा व्यायाम करत नाही. तिच्या वर्क आउटमधे स्ट्रेन्थ, फंक्शनल आणि हाय इंंटेन्सिटी ट्रेनिंग  या व्यायाम प्रकाराचा समावेश असतो. ज्यावेळेस ती जीमला जाऊ शकत नाही त्यावेळेस आलियाचे ट्रेननर तिला ऑनलाइन कार्डिओ रुटीन पाठवतातात. ती ट्रेनरनं पाठवलेला व्यायाम प्रामाणिकपणे पूर्ण करते. पळणं हा तिच्या आवडीचा विषय. तसे आलियाला सर्वच प्रकारचे व्यायाम प्रकार करायला आवडतात. व्यायामाबाबत आवड निर्माण व्हायची असेल तर व्यायाम करताना वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करायला हवेत असं आलिया म्हणते.
  •  व्यायामासाठी पार्टनर शोधा. व्यायाम हा मुळात कंटाळा येणारी गोष्टच नाहीये. पण हे तेव्हा कळतं जेव्हा आपण नियमित व्यायाम करतो. व्यायाम आपल्या सवयीचा भाग होतो, व्यायामाच्या आपण प्रेमात पडतो. हे घडून येण्यासाठी व्यायाम करताना कोणीतरी सोबत हवं. या सोबतीचा फायदा म्हणजे आपण जो व्यायाम सोबतीनं करणार आहोत त्याबाबत उत्सुकता निर्माण होते. सोबत असली की स्ट्रेन्थ ट्रेनिंग करायला, पिलाटेचे सेशन करायला खरी मजा येते. सोबतीनं व्यायाम केला की अधिकाधिक अवघड, थकवणारे व्यायाम करण्याची प्रेरणा मिळते. वैयक्तिक पातळीवर व्यायाम करतना चांगली सुधारणा दिसून येते. सोबतीनं व्यायाम करण्याला आलिया खूप महत्त्वं देते.

  •  आलियाला पिलाटे करायला आवडतात. हाय इन्टेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग करायलाही ती एका पायावर तयार असते. तिला चालणं, पळणं , पोहोणं हे कार्डिओ व्यायाम प्रकार करायलाही आवडतात. आणि तिच्य्या रोजच्या वर्कआउट नियोजनात वैविध्यपूर्ण व्यायामाचा समावेश असतो. प्रत्येक दिवशीचं तिचं व्यायामाचं शेड्यूल वेगवेगळं असतं. ते बदलतं ठेवायला आलियाला आवडतं. आलिया म्हणते की कार्डिओ व्यायाम झाला की स्ट्रेन्थ ट्रेनिंग केल्यामुळे वेगवेगळ्या स्नायुंचा व्यायाम होतो. वेगवेगळ्या व्यायाम प्रकाराचा एकत्रित फायदा म्हणजे फिटनेस जबरदस्त वाढतो आणि चयापचय क्रियाही सुधारते.
  • शूटींग करुन कितीही थकलेली असली तरी आज मी थकले आहे, व्यायाम करत नाही, मध्यरात्री उशीरा शूटींगहून परतले म्हणून सकाळी व्यायामासाठी उठणार नाही अशी कारणं आलिया व्यायाम टाळण्यासाठी कधीही देत नाही. आलिया म्हणजे व्यायाम टाळण्याला मी कारण का देऊ? ज्या गोष्टीनं मला ऊर्जा मिळते ती मी कशी टाळू? आलिया म्हणते की हे खरं आहे की थकून आल्यानंतर सकाळी डोळे उघडत नाही. पण मी उठते. डोळे चोळतच व्यायामाला लागते. पिलाटे केलं की अंगात ऊर्जा येते की झोप गायब . आलिया म्हणते की मी व्यायाम हा माझ्या आयुष्यासाठी करते एखाद्या चित्रपटातल्या भूमिकेसाठी नाही. जी गोष्ट आयुष्याशी जोडलेली आहे ती टाळण्यापेक्षा करण्यावर भर द्या.

  • सातत्य राखलं की परिणाम दिसतात. सातत्य राखलं की ती गोष्ट आपल्या सवयीची होते, जगण्याचा भाग होते. आलिया म्हणते की व्यायामाच्या बाबत मी सातत्य राखलं आणि म्हणूनच व्यायाम हा माझ्या प्रेमाचा विषय झाला आहे. एक काळ होता की जिम म्हटलं की मला टेन्शन यायचं. पायच ओढायचा नाही जिमला जायला. मला जिममधे स्वत:ला ढकलावं लागायचं. आता मात्र उलटं झालंं आहे. आता जिमला जाऊ नको असं कधी कधी स्वत:ला सांगावं लागतं. इतका व्यायाम माझ्या अंगवळणी पडला आहे. आलिया म्हणते की व्यायामाचा कंटाळा येत असेल तर फक्त एकच गोष्ट करायची ती म्हणजे व्यायाम. तो रोज केला की व्यायामाचा कंटाळा कुठल्या कुठे पळून जाईल!

Web Title: Alia Bhatt says, her trick to fall in love with exercise, exercise will be easier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.