Join us  

सकाळी झोपेतून उठताना अंग आखडतं? अंथरुणावर पडूनच करा ५ व्यायाम- दिवसभर ॲक्टीव्ह राहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2023 5:10 PM

5 Morning stretches for increasing mobility: थंडीमुळे सकाळी सकाळी अंग अगदी आखडून गेलेलं असतं. म्हणूनच आता आखडलेलं अंग मोकळं करण्यासाठी हा एक उपाय पाहा.. (simple exercises for reducing back pain, sciatica and gastric gas)

ठळक मुद्देजर तुम्हाला पाठदुखीचा, कंबरदुखीचा, सायटिकाचा त्रास असेल तर तो त्रासही हे काही साधे सोपे स्ट्रेचेस केल्यामुळे कमी होईल, असं भाग्यश्री सांगते आहे.

थंडीच्या दिवसांत सकाळी एकतर लवकर जाग येत नाही. जाग आली तरी मग अंग खूपच आखडून गेलेलं असतं. तसंही या दिवसांत अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतोच. पण ज्यांना हा त्रास नसतो, अशा लोकांनाही थंडीत अंग खूपच जड पडल्यासारखं, आखडल्यासारखं वाटतं. असं तुम्हालाही होत असेल तर अभिनेत्री भाग्यश्री हिने एक छान उपाय सुचविला आहेत. याविषयीचा व्हिडिओ तिने सोशल मिडियावर शेअर केला असून त्यामध्ये काही स्ट्रेचेस सांगितले आहे (Actress Bhagyashree suggests 5 Morning stretches for increasing mobility). सकाळी जाग आल्यानंतर अंथरुणातून उठण्याच्या आधीच ५ मिनिटे हे व्यायाम करा. यामुळे अंग तर मोकळं होईलच, पण दिवसभर फ्रेश- उत्साही वाटेल. (simple stretches for reducing back pain, sciatica and gastric gas.)

अंग आखडून गेलं असल्यास व्यायाम

 

जर तुम्हाला पाठदुखीचा, कंबरदुखीचा, सायटिकाचा त्रास असेल तर तो त्रासही हे काही साधे सोपे स्ट्रेचेस केल्यामुळे कमी होईल, असं भाग्यश्री सांगते आहे.

प्रवासात मळमळ- उलट्या होतात? ६ सोपे उपाय, मुळीच त्रास होणार नाही- सफर होईल सुहाना.. 

१. यात तिने सांगितलेला सगळ्यात पहिला व्यायाम म्हणजे पाठीवर झोपा. त्यानंतर एक पाय वर उचला. गुडघ्यात वाकवा आणि नंतर पोटावर ठेवून त्या पायाला दोन्ही हातांनी पकडा. म्हणजेच पवन मुक्तासन हा व्यायाम ती सांगते आहे.

२. एकेक पाय उचलून झालं की दोन्ही पाय एकाचवेळी उचला, गुडघ्यात दुमडा आणि पोटाजवळ घ्या. 

 

३. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा. तळपाय जमिनीला टेकवा. दोन्ही हात पसरून ठेवा. यानंतर एकदा दोन्हीपाय उजव्या बाजुला करा नंतर डाव्या बाजुला करा. यावेळी चेहरा स्थिर ठेवा किंवा गुडघे जिकडे असतील, त्याच्या विरुद्ध दिशेला ठेवा.

कुडकुडणाऱ्या थंडीत प्या वाफाळतं हॉट चॉकलेट, बघा ५ मिनिटांत होणारी एकदम कॅफेस्टाईल रेसिपी

४. यानंतर उठून बसा. डावीकडे, उजवीकडे असं एकानंतर एक करून पाठीचा कणा मोकळा करून घ्या.

५. यानंतर डावा तळपाय उजव्या पायाच्या गुडघ्यावर घ्या आणि पुढे वाका. यानंतर असंच उजवा तळपाय डाव्या पायाच्या गुडघ्यावर घेऊन करा. 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामभाग्यश्री