Join us  

मिलिंद सोमण म्हणतो, पेट भर के खाओ, फिट रहो! 'ही' पथ्यं मात्र विसरू नकाच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 1:30 PM

Fitness Tips : फिटनेस जपायचा म्हणून जेवण टाळता? किंवा कमी जेवता का? असं करू नका. कारण सुपरफिट मिलिंद सोमणचं (Actor Milind Soman) सांगतोय की फिटनेससाठी जेवण कमी करू नका, फक्त थोडीशी पथ्ये पाळा... काय आहेत बरं त्याची ही पथ्ये ?

ठळक मुद्देत्याच्या म्हणण्यानुसार भारतीय जेवण हे जगातलं सगळ्यात पौष्टिक अन्न असलं तरी ते किती प्रमाणात तुम्ही खात आहात, हे खूप महत्त्वाचं आहे.

मिलिंद सोमणच्या जबरदस्त फिटनेसचे चर्चे तर आपण नेहमीच ऐकत असतो....फिटनेससाठी मिलिंद सोमण काय करतो आणि काय करत नाही, हे देखील तो सोशल मिडियाच्या (social media)माध्यमातून त्याच्या चाहत्यांना सांगत असतो. त्याचा व्यायाम, त्याचं रनिंग असं सगळं ऐकून आणि पाहून असं वाटतं की बाप रे हा माणूस किती मोजून मापून जेवत असणार.... पण असं काही नाहीये बरं का.... त्याचं जेवणंही आपल्यासारखंच आहे, यथेच्छ आणि भरपेट. एवढंच नाही, तर त्याने त्याच्या चाहत्यांनाही हेच सांगितलं आहे की पेट भर के खाओ... बिनधास्त खाओ....

 

मिलिंद सोमण सोशल मिडियावर चांगलाच ॲक्टीव्ह असतो. नुकताच त्याने त्याचा आणि अंकिताचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटो पाहून तर असं वाटतं की तो आणि अंकिता सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. या फोटोमध्ये दोघांनीही गुजराती वेशभुषा केली आहे. मिलिंदने पांढऱ्या रंगाचा काठीयावाडी कुर्ता घातला आहे आणि गळ्यात एक छानसं पारंपरिक गुजराती धाटणीचं सोनेरी रंगाचं गळ्यातलं आहे. अंकितानेही काठीयावाडी महिलांसारखी पारंपरिक वेशभुषा केली आहे. घागरा, चोली, मोठी टिकली आणि पारंपरिक गुजराती दागिणे... असा तिचा एकंदरीत गेटअप आहे. एवढंच नाही तर दोघांच्याही हातात भली मोठी विविध पदार्थांनी सजलेली गुजराती थाली आहे.

 

त्याच्या थाळीमधले गुजराती पदार्थ (Gujarati food)पाहून आपल्यालाच ते पदार्थ चाखून पाहण्याचा मोह होतो, हे अगदी खरं आहे. हा फोटो शेअर करून मिलिंदने त्याच्या खाली एक मोठी पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्याने जे काही सांगितलं आहे, ते खरोखरंच खूप महत्त्वाचं आहे. तो म्हणतो की भारतातल्या कुठल्याही प्रांतातलं सिंपल, ट्रॅडिशनल जेवण हे त्याच्यासाठी जगातलं सगळ्यात पौष्टिक अन्न आहे. पण moderation is the key ! असं म्हणायलाही तो विसरलेला नाही. म्हणजेच त्याच्या म्हणण्यानुसार भारतीय जेवण हे जगातलं सगळ्यात पौष्टिक अन्न असलं तरी ते किती प्रमाणात तुम्ही खात आहात, हे खूप महत्त्वाचं आहे.

 

हे सांगत असतानाच मिलिंदने त्याच्या काही फिटनेस टिप्सही या पोस्टसोबत शेअर केल्या आहेत. तो म्हणतो की मी कधीही डाएट केलं नाही. किंवा जेवण समोर आल्यावर एवढंच खायचं, तेवढंच खायचं अशी कोणती बंधनंही मी पाळली नाहीत. पण रिफाईन्ड, प्रोसेस केलेलं आणि पॅक फुड (pack food) मात्र मी कमीत कमी खातो. घरी तयार केलेलं साध्या पद्धतीचं जेवण हे निरोगी शरीर आणि निरोगी मन घडवतं, यावर त्याचा विश्वास असल्याचंही त्याने पुढे सांगितलं आहे. त्यामुळे मिलिंदच्या म्हणण्याप्रमाणे आपण घरी तयार केलेलं साधं जेवण जेवलो आणि सगळेच पॅकफुड, प्रक्रिया केलेलं अन्न खाणं सोडलं तरी आपल्या फिटनेसमध्ये कमालीचा फरक पडू शकतो. मिलिंदने सांगितलेला हा फिटनेस फंडा करून बघायला काही हरकत नाही, नाही का? 

टॅग्स :फिटनेस टिप्समिलिंद सोमण अंकिता कुंवरगुजरातअन्नसेलिब्रिटी