Join us

बायकांना कशाला हवाय विमा? असा गैरसमज तुमचाही आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 18:40 IST

गृहिणी, एकल महिलाच नाही तर सर्वच महिलांसाठी विमा काढणं, वैद्यकीय विमा घेणंही गरजेचं आहे.

ठळक मुद्देतुमच्या कुटुंबातील सदस्यांना केवळ जगण्यासाठीच नव्हे तर त्यांचे जीवन सन्मानाने जगण्यासाठी आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसे मिळतील.

अनुप सेठ, मुख्य वितरण अधिकारी,एडलवाईस टोकियो लाइफ इन्शुरन्स

विमा आवश्यक आहे, पण अनेक महिलांना त्याची माहिती नसते किंवा ती गोष्ट आपल्या अन्य खरेदीच्या यादीत येत नाही. पतीने कोणता विमा घेतला, कव्हर किती हे ही अनेकींना माहिती नसते. महिलांनी स्वत:चाही विमा उतरवणे याकाळात गरजेचे आहे. महिलांनी जीवन विमा विकत घेणे महत्त्वाचे आहे कारण त्यांच्या अनुपस्थितीमुळे कुटुंबात अस्थैर्य येऊ शकते. काही विमा योजना पॉलिसीधारकाचे निधन झाल्यास जोडीदाराला कव्हर देण्याचा पर्याय देतात. गृहिणीनींही स्वत:चा विमा उतरवायलाच हवा. मला काय गरज असा प्रश्न न विचारता भविष्यातील आर्थिक सुरक्षितता महत्वाची मानली पाहिजे. तुम्ही एकल महिला असाल, विवाह केलेला नसेल तरी विमा घ्यायलाच हवा. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना केवळ जगण्यासाठीच नव्हे तर त्यांचे जीवन सन्मानाने जगण्यासाठी आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसे मिळतील. विशेष म्हणजे टर्म प्लॅन पुरुषांपेक्षा महिलांसाठी स्वस्त आहेत.

(Image : Google)

अनेक संशोधन अभ्यासानुसार स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त काळ जगतात आणि म्हणूनच टर्म प्लॅनचा प्रीमियम पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी कमी असतो. याशिवाय, वयोमानामुळे देखील पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी मुदतीच्या योजना स्वस्त असतात. आकर्षक असतात. याशिवाय दुहेरी-उत्पन्न असलेल्या कुटुंबात, सामान्यत: जास्त कमाई करणारा जीवन विमा खरेदी करण्यास प्राधान्य देतो. परंतु, तुम्ही घरातील कमी कमाई करणाऱ्या सदस्य असल्या तरी विमा घेणं गरजेचं आहे.

(Image : Google)

महत्त्वाचे म्हणजे जैविक आणि अनुवांशिकदृष्ट्या, महिलांना आरोग्य समस्या उद्भवू शकतात. यामध्ये इतर जुनाट परिस्थितींव्यतिरिक्त स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासारख्या आजारांचा समावेश असू शकतो. गरोदरपणाचे वेगवेगळे टप्पे त्यांच्या स्वत:च्या जोखीम आणि खर्चांसह येतात ज्यासाठी प्रत्येक स्त्री किंवा कुटुंबाला नियोजन करावे लागते. हे धोके कमी करणारे उपाय देऊ करण्यासाठी औषधी आणि तंत्रज्ञानाने खूप लांब पल्ले गाठले आहेत, परंतु गंभीर आजारांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे व्यवस्थापन करण्याचा खर्च आपल्याला आर्थिकदृष्ट्या कठीण स्थितीत आणू शकतो. त्यामुळे तुमची विमायोजना सर्वसमावेशक आहे आणि तुम्हाला अशा समस्यांपासून संरक्षण देते याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. जीवन विमा पॉलिसी हा तुमच्या मुलांसाठी किंवा तुमच्या जोडीदारासाठी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भविष्यासाठीही महत्त्वाचा आहे.

 

टॅग्स :गुंतवणूकमहिला