Join us
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेसियरमध्ये एकापुढे एक तीनच हुक का असतात? महिलांना माहीतच नसते खरे कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2026 17:35 IST

why does bra have three hooks at the back : why bra has three hooks at the back : why do bras have three rows of hooks at the back : ब्रेसियरला फक्त तीनच हुक्स का असतात ? याची आहेत ५ कारणं...

महिलांच्या नेहमीच्या पेहरावातील 'ब्रेसियर' हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आपण रोज वापरत असलेल्या ब्रेसियर अंतर्वस्त्राकडे अनेकदा फारसे लक्ष देत नाही. ब्रेसियरच्या डिझाइनमध्ये अनेक छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी लपलेल्या असतात. त्यापैकीच एक म्हणजे ब्रा च्या मागील बाजूस असलेले एकापुढे एक तीन हुक...हे तीन हुक नेमके का असतात, त्यांचा उपयोग काय असतो आणि ते स्त्रियांच्या आराम व फिटिंगसाठी कसे मदत करतात, याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. योग्य फिटिंग, शरीराच्या बदलत्या आकारानुसार अॅडजस्टमेंट आणि दिवसभर आरामदायी अनुभव मिळावा यासाठी या हुक्सची रचना करण्यात आलेली असते. ब्रेसीयरच्या मागे असणाऱ्या तीन हुक्सना आपण फक्त डिझाईन किंवा हे केवळ वेगवेगळ्या कंबरेच्या मापानुसार असतं असंच समजतो... पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या छोट्याशा दिसणाऱ्या ३ हुक्समागे एक मोठं वैज्ञानिक कारण आणि तुमच्या आरोग्याशी निगडित लॉजिक दडलंय...(why do bras have three rows of hooks at the back).

जर तुम्हीही आजवर या ३ हुक्सचा चुकीचा वापर करत असाल, तर तुमची महागडी ब्रा लवकर खराब तर होईलच, पण त्याचा परिणाम तुमच्या शारीरिक सुखावरही होऊ शकतो. ८५% पेक्षा जास्त महिलांना (why does bra have three hooks at the back) यामागचं खरं सिक्रेट माहीत नसतं. आपण महिलांच्या ब्रेसियरला नेमके ३ हुकचं (why bra has three hooks at the back) का असतात आणि त्यांचा फायदा काय ते पाहूयात... 

महिलांच्या ब्रेसियरला नेमके तीनच हुक्स का असतात ? 

आपण रोज वापरत असलेल्या ब्राच्या डिझाइनमध्ये अनेक सूक्ष्म आणि विचारपूर्वक केलेले बदल असतात, जे आपल्या आरामासाठी महत्त्वाचे ठरतात. त्यातीलच एक खास गोष्ट म्हणजे मागच्या बाजूला असलेले एकापुढे एक तीन हुक. पहिल्या नजरेत ही साधी रचना वाटली तरी तिच्यामागे फिटिंग, सपोर्ट आणि दीर्घकाळ टिकणारा आराम याचा महत्त्वाचा विचार केलेला असतो. शरीराच्या आकारात होणारे छोटे-मोठे बदल, कपड्यांचा ताण आणि दिवसभराची हालचाल यामध्ये ब्रा नीट बसावी यासाठी हे हुक्स उपयोगी पडतात. त्यामुळेच ही छोटीशी डिझाइन डिटेल तुमच्या रोजच्या कम्फर्टमध्ये मोठी भूमिका बजावते.

व्हाईट डिस्चार्ज होत असतांना खाऊ नयेत ५ पदार्थ! त्रास कमी होण्यापेक्षा वाढेल - चुकीचा आहार वाढवतो ही समस्या... 

लग्नानंतर नात्यातील गोडवा संपवणाऱ्या ६ वाईट सवयी! वेळीच सावध व्हा, अन्यथा पश्चात्तापाची येईल वेळ...

महिलांच्या ब्रेसियरला तीनच हुक्स असतात कारणं... 

१. कप साईज आणि बँड साईजमधील फरक :- ब्रा मध्ये एकापुढे एक तीन हुक असण्याचं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रत्येक महिलेची शरीररचना (Body Type) वेगळी असते. प्रत्येक महिलेच्या शरीराचा आकार दुसऱ्या महिलेपेक्षा वेगळा असतो, त्यामुळेच ब्रा च्या 'कप साईज' आणि 'बँड साईज' मध्ये अनेकदा फरक दिसून येतो. बऱ्याचदा असं घडतं की, महिलेला कप साईज एकदम परफेक्ट बसतो, पण पाठीमागचा बँड (पट्टा) मात्र हवा तसा फिट बसत नाही. अशा परिस्थितीत, वेगवेगळ्या अंतरावर दिलेले हे तीन हुक अत्यंत कामाला येतात. या हुक्सना गरजेनुसार ॲडजस्ट करून तुम्हाला हवी तशी 'परफेक्ट फिटिंग' मिळवता येते.

२. बँड सैल झाल्यावर हुक्सचा असा होतो वापर :- वेळेनुसार सतत वापरुन ब्रा थोडी सैल होऊ लागते, कारण ज्या बँडवर हुक्स लावलेले असतात तो 'स्ट्रेचेबल' (लवचिक) असतो. म्हणूनच, जेव्हा महिला नवीन ब्रा खरेदी करतात, तेव्हा त्यांनी ती नेहमी पहिल्या (सर्वात बाहेरच्या) हुकमध्ये लावूनच वापरली पाहिजे. जसजसा काळ जातो आणि ब्रा वापरल्यामुळे किंवा धुण्यामुळे सैल होत जाते, तेव्हा तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या (आतल्या) हुकचा वापर करू शकता. याच वेगवेगळ्या हुक्समुळे ब्रा चे आयुष्य म्हणजेच तिची 'लाईफ' वाढते. जर तुमच्या ब्रा चा 'कप' खराब झाला नसेल, तर या हुक्सच्या मदतीने तुम्ही ती अधिक काळ वापरू शकता.

फेकून देऊ नका कांदा-लसणाच्या साली! पांढरे केस काळे करण्याचा उपाय - शून्य खर्चात नॅचरल हेअर डाय तयार... 

३. तिसऱ्या हुकमध्येही ब्रा सैल होत असेल, तर वेळीच बदला :- ब्रा वापरताना पहिल्या हुकनंतर दुसरा हुक हा दैनंदिन वापरासाठी सर्वात सोयीस्कर मानला जातो. हा हुक जास्त सैलही नसतो आणि जास्त घट्टही नसतो, ज्यामुळे पाठीला योग्य आधार मिळतो. परंतु, जर तुमची ब्रा तिसऱ्या (सर्वात शेवटच्या) हुकमध्ये लावल्यानंतरही सैल वाटत असेल, तर हे स्पष्ट लक्षण आहे की आता ती बदलण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत ब्रा आपली इलास्टिसिटी गमावून बसते. त्यामुळे शरीराला योग्य आकार आणि सपोर्ट मिळण्यासाठी नवीन ब्रा खरेदी करणेच हिताचे ठरते.

४. योग्य आकार आणि प्रेशर :- एका हुकऐवजी एकापुढे एक तीन हुक असण्यामागचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे शरीरावर पडणारा दाब. जेव्हा ब्रेसियरला अनेक हुक्स असतात, तेव्हा तिचा दाब पाठीच्या एकाच भागावर न पडता समान रितीने विभागला जातो. यामुळे पाठीत दुखणे किंवा अस्वस्थ वाटणे यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत.

५. हुकचा आकार गोल का नसतो?

तुम्ही कधी लक्ष दिले आहे का? कोणत्याही ब्रा चे हुक कधीच पूर्णपणे गोल नसतात. ते नेहमी गोल कमानदार किंवा 'रेकँगल' (चौकोनी) आकारात बनवले जातात. यामागे फॅशन नाही, तर सोयीस्कर वापर आणि आराम ही दोन मुख्य कारणे आहेत. गोल आकाराचे हुक लावणे आणि काढणे खूप कठीण होऊ शकते, विशेषतः जेव्हा तुम्ही पाठीमागे हात करून ते लावण्याचा प्रयत्न करता. गोल आकारामुळे ते निसटण्याची शक्यता जास्त असते. याउलट, आर्क किंवा रेकँगल आकार असे डिझाइन केलेले असतात की ते एकमेकांमध्ये अगदी सहज फिट होतात. या विशिष्ट आकारामुळे हुक लॉक झाल्यावर ते हालचाल करताना निसटत नाहीत आणि हवे तेव्हा सहज काढताही येतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Why do bras have three hooks? The secret revealed!

Web Summary : Bras have three hooks for adjustable fit, accommodating body changes, and extending bra life. Use the outer hook when new, and move inward as the bra stretches. The design evenly distributes pressure, enhancing comfort. Replace when the innermost hook feels loose.
टॅग्स :फॅशनस्टायलिंग टिप्समहिला