Join us

कुर्त्यावर शोभून दिसणारी लेगिन्स नक्की आली कुठून, कुणी शोधली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2022 13:07 IST

लेगिन्सला एक इतिहास आहे, चला तर मग लेगिन्सची थोडक्यात माहिती घेऊयात

सध्या मुली आणि महिलावर्गाची पसंती लेगिन्सला जास्त आहे. हा एक पँटचा प्रकार आहे. लेगिन्स स्ट्रेचेबल आणि कम्फर्ट असल्यामुळे महिलांना ती परिधान करायला जास्त आवडते. टॉप असो किंवा कुर्ता, अनारकली असो या वन पीस कशावरही घालता येते.  लेगिन्स कंफर्टेबल तर असतेच पण वावरायलाही सोपे जाते. मात्र पॅण्टचा हा प्रकार शोधला कुणी, वापरात कसा आला आणि त्यासाठी विशिष्ट कापडच का वापरले जाते? याबद्दल जाणून घेऊयात.

लेगिन्सचा थोडक्यात इतिहास

लेगिन्सचा शोध १९५८ साली लागला होता. लेगिन्सला पहिले लाइक्रा (उर्फ स्पॅन्डेक्स) असे म्हटले जायचे. या कपड्याचा शोध केमिस्ट जोसेफ शिव्हर्स यांनी लावला आणि १९५९ मध्ये प्रथम लायक्रा लेगिंग्ज तयार करण्यात आली होती. फॅशन उद्योगाने १९६० च्या दशकात स्लिम, स्ट्रेच पँट बनवण्यास सुरुवात केली. आणि त्यानंतर मेरी क्वांट आणि एमिलियो सारख्या प्रसिद्ध डिझायनर्सने लेगिन्सला स्वीकारले. खरंतर, १९व्या शतकात, विविध राष्ट्रांचे सैनिक लेगिन्स या पँटचा वापर सुरुवातीला करत होते. त्यांच्या पायाचे संरक्षण करण्यासाठी, घाण, वाळू आणि चिखल त्यांच्या शूजमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी आणि घोट्याला आधार देण्यासाठी अनेकदा लेगिन्स घालत असत. त्यानंतर ती फॅशन उद्योगाने स्वीकारली आणि महिलावार्गामध्ये प्रचंड चर्चेत आली.

खरंतर, सध्या महिला लेगिन्स प्रत्येक कपड्यांवर परिधान करतात. परंतू लेगिन्स हे प्रत्येक पोशाखावर परिधान करणरे कपडा नाही याची माहिती महिलांपर्यंत पोहचवणे तितकेच गरजेचं आहे. भारत एक असा देश आहे जिथे अब्ज डॉलर्सचा उद्योग असूनही लोक फॅशनकडे दुर्लक्ष करीत आहेत. सरासरी व्यक्तीसाठी, कपडे ही एक मूलभूत गरज आहे, मग काय फॅशनेबल आहे आणि काय नाही यासंदर्भात त्यांना माहिती देणे तितकेच गरजेचं आहे. आज देखील महिला वन पिसवर लेगिन्स परिधान करतात. मात्र आपल्याला काय, कशावर शोभून दिसेल, सध्या  ट्रेण्ड कोणता चालू आहे, याची माहिती घेऊनच लेगिन्स वापरणे उत्तम.

टॅग्स :फॅशन