आपल्यापैकी बऱ्याचजणींना पांढऱ्याशुभ्र रंगाचे कपडे घालायला फार आवडतात. याचबरोबर, काहीवेळा एखादा काही खास प्रसंग असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर आपण पांढऱ्या रंगाचे (What Bra to Wear Under What Outfit) कपडे घालतो. परंतु पांढऱ्या रंगाचे कपडे घालायचे म्हणजे काहीजणींना एका (What to Wear Under a White Clothes) गोष्टीचे फार टेंन्शन येते ते म्हणजे, या पांढऱ्या रंगाच्या कपड्यातून काहीवेळा आपली आतील ब्रेसियर (Best 4 lingerie tips to style white suit set) दिसते. या पांढऱ्या रंगाच्या कपड्यातून अशी ब्रेसियर दिसली तर आपल्याला चारचौघीत लाजिरवाणे वाटते. इतकेच नाही तर दिसताना देखील ते फार वाईट दिसते.
काहीवेळा आपल्याकडे पांढऱ्या रंगाची ब्रेसियर नसल्याने आपण आपल्याकडील असेल ती ब्रेसियर घालतो किंवा गडद रंगाच्या ब्रेसियर घातल्याने देखील त्या पटकन दिसतात. त्यामुळे जर तुम्ही कधी पांढऱ्या रंगाचे किंवा थोडे पारदर्शक पॅटर्नचे कपडे घालणार असाल तर आत कोणत्या प्रकारची ब्रेसियर घालावी याची विशेष काळजी घेतली पाहिजे. यासाठीच, पांढऱ्या रंगाचे किंवा पारदर्शक कपडे घालताना आतील ब्रा ची योग्य निवड कशी करावी ते पाहूयात.
पांढऱ्या रंगाचे किंवा पारदर्शक कपडे घालताना आतील ब्रा ची योग्य निवड कशी करावी ?
jaineegandhi या इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये, पांढऱ्या रंगाचे किंवा पारदर्शक कपडे घालताना आतील ब्रा ची योग्य निवड कशी करावी याबद्दल काही टिप्स व अधिक माहिती शेअर केली आहे.
१. जर तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा पारदर्शक कपडे घालणार असाल तर कायम 'सिमलेस सॉलिड न्यूड ब्रा' ची निवड करावी. शक्यतो पांढऱ्या रंगाच्या आणि पारदर्शक कपड्यातून आपली ब्रा दिसू नये यासाठी न्यूड रंगाच्या ब्रा घालावी. या ब्रा च्या न्यूड, हलक्या रंगांमुळे त्या कपड्यातून पटकन दिसत नाहीत. गडद रंगाच्या ब्रा पांढऱ्या कपड्यात घालणे टाळावे.
कुर्त्यासोबत कोणती जीन्स चांगली दिसते? ‘हे’ परफेक्ट मॅच पाहा-दिसा कायम स्टायलिश आणि सोफिस्टिकेटेड...
२ . तुम्ही वायर्ड किंवा नॉनवायर्ड ब्रा अशा दोन्ही प्रकारच्या ब्रा पांढऱ्या कपड्यात घालू शकता. परंतु नॉनवायर्ड, हलकी, सॉफ्ट पॅडेड ब्रा एका उत्तम पर्याय असू शकतो. कारण या प्रकारची ब्रेसियर तुमच्या स्तनांना योग्य आधार देऊन, पांढऱ्या किंवा फिक्या रंगाच्या कपड्यात देखील तुमच्या स्तनांचा आकार शेपमध्ये किंवा व्यवस्थित दिसण्यास मदत करु शकते.
पांढरे केस नो टेंशन! ‘या’ ३ रंगाचे ड्रेस घाला- पांढऱ्या केसांकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही...
३. पांढऱ्या किंवा पारदर्शक कपड्यांमध्ये नेहमी न्यूड आणि हलकी व कोणत्याही प्रकारचे पॅटर्न नसणारी ब्रेसियर घालावी. काहीवेळा ब्रेसियरवर वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न, डिझाइन्स असतात. लेस, मोती वर्क किंवा पाईपिंगचे डिझाईन्स तसेच गडद रंगाच्या प्रिंट्स असतात परंतु अशा ब्रा पांढऱ्या किंवा पारदर्शक कपड्यांमध्ये घालणे टाळावे. कारण हे लेस, मोती वर्क किंवा गडद प्रिंट्स पांढऱ्या कपड्यातून दिसू शकतात.
४. जर तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या कपड्यांयामध्ये ब्रा घालायची असेल आणि ती शक्य तितकी अदृश्य हवी असेल, तर न्यूड रंगाची ब्रा घालावी किंवा तुमच्या त्वचेच्या रंगाशी मिसळेल आणि हलक्या रंगाच्या कपड्यांखाली तितकीशी लक्षात येणार नाही अशा रंगाची निवड करावी.