श्रावण महिना, गोकुळाष्टमी, गणेश चतुर्थी तसेच विविध पुजा असे सारे सणासुदीचे दिवस एकामागे एक पटापट येतात. सण साजरे करताना भारतीय संस्कृतीला साजतील असे विविध ड्रेस घातले तरी साडी नेसल्यावर जो आनंद मिळतो तो दुसर्या पेहरावात नाही. पण साडी नेसून पटापट काम करायला जरा कठीणच जाते. (Wear a saree for festivals and do your work in style, tips for women, saree draping tips)पूर्वी महिला कायम साडी नेसायच्या रोजच्या वापरातील असल्यामुळे त्यांना ती सांभाळण्याची सवय आणि पद्धत व्यवस्थित माहिती होती. मात्र आता रोज साडी नेसणाऱ्या स्त्रिया तशा कमीच आहेत. त्यामुळे जुन्या पिढीला साडी जेवढी सहज सांभाळता यायची तेवढी सगळ्यांनाच जमत नाही. अशा वेळी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवायच्या. पहिल्यांदा साडी नेसत असाल तरी छान सांभाळता येईल.
१. आजकाल सुंदर आणि हलक्या साड्या आरामात उपलब्ध आहेत. त्यामुळे जेवण, आवराआवरी, जागरण, पुजा सारेच करायचे असेल तर साडी निवडताना हलकी घ्या. कॉटन, सॉफ्ट सिल्क, शिफॉन, कॉटन सिल्क या प्रकारच्या साड्या निवडा. या साड्या मुळात शरीराला आरामदायी असतात. त्यामुळे त्यात कमी उकडते आणि त्वचेलाही त्रास होत नाही.
२. साडीचा पदर नेहमी आपण छान लांब काढतो. काम करताना पदर खोचायचा आणि कामाला लागायचे. मात्र काही साड्यांना टोकाला वर्क असतं. त्यामुळे अशा साड्यांचे काठ पोटाला लागतात. त्यामुळे वळ उठतात. अशा साड्या नेसताना पदर नेहमीपेक्षा लहान काढायचा. त्यामुळे वाकल्यावर किंवा चालताना पदर अडकत नाही.
३. साडीच्या निऱ्या काढून झाल्यावर त्यांना टोकाला एक पिन लावायची. वरती पिन लावा मग ती खोचा. तसेच बाहेरच्या निऱ्यांना एक पिन लावायची. असं केल्यावर निऱ्या नीट बसतात आणि साडी फुगत नाही.
४. कॉटनचे जुन्या पद्धतीचे परकर फार फुगतात. तसेच चालताना पायात अडकतात. त्यामुळे बॉडीफीटींगचे आजकाल नवीन पद्धतीचे परकर मिळतात. ते वापरायला सोपे असतात. स्ट्रेचेबलही असतात. पायात अडकत नाहीत आणि शरीरही सुबक दिसते. त्यामुळे साडी नेसताना आत जुने परकर न घालता आता असे परकर वापरुन पाहा. साडी अगदी सुंदर दिसते.
४. साडीचा पदर सारखा सरकतो त्यामुळे मग आरामात काम करता येत नाही. त्यामुळे साडी नेसून झाल्यावर ब्लाऊज आणि पदराचे टोक जास्त ताणून न घेता हलकेच पिनेने बांधायचे. असे केल्यावर पदर बाजूला सरकत नाही आणि दिसायलाही छान दिसते.