आपल्यापैकी प्रत्येकीच्या कपाटात किमान एक तरी खास कॉटनची साडी असतेच. सण - समारंभ असो किंवा ऑफिस, कॉटन साडीचा लूक नेहमीच उठून दिसतो. मात्र, कॉटनची साडी नेसताना सर्वात मोठी अडचण येते ती म्हणजे साडी 'फुगण्याची'. कितीही नीट नेसली तरी ती व्यवस्थित बसत नाही आणि त्यामुळे आपला लूक हवा तसा दिसत नाही. कॉटनची साडी दिसायला जितकी सुंदर आणि आरामदायी असते, तितकीच ती नीट बसवणे अनेकदा मोठे कठीण काम असते. अनेकदा साडी नेसल्यावर निऱ्या नीट (tips to avoid bulky look in cotton saree) न बसता साडी फुगलेली दिसते, कमरेजवळ जाडी वाढल्यासारखी वाटते किंवा चालताना साडी विस्कटते. चुकीचा इनर, निऱ्या काढण्याची चुकीची पद्धत, साडीची जाडी किंवा नेसण्याची पद्धत यामुळे ही समस्या अधिकच वाढते(tips to prevent a cotton saree from looking bulky after wearing it).
कॉटनची साडी फुगल्यामुळे आपण जाड दिसतो आणि पूर्ण लूक बिघडतो. कॉटनची साडी फुगू नये आणि ती एखाद्या सिल्क साडीसारखी अंगाला चापूनचोपून बसावी, यासाठी काही खास गोष्टींची काळजी घेणे (how to wear cotton saree neatly) गरजेचे असते. कॉटनची साडी नेसायची आहे पण ती फुगते म्हणून कित्येकजणी ती नेसणे टाळतात, परंतु साडी नेसण्याची योग्य पद्धत आणि काही खास टिप्सचा वापर केल्यास कॉटनची साडी न फुलता अंगाला व्यवस्थित (prevent cotton saree from looking bulky) अशी चापून - चोपून बसते. कॉटनची साडी नेसल्यावर ती व्यवस्थित आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी नेमकं काय करावं याच्या खास टिप्स पाहूयात...
कॉटनची साडी नेसल्यावर फुगू नयेत म्हणून खास टिप्स...
१. खूप जास्त स्टार्ट्च किंवा कांजी लावल्यास साडी कडक होऊन फुगते. हलकासा स्टार्च करणे पुरेसे असते.
२. साडी नेसण्यापूर्वी व्यवस्थित इस्त्री करणे गरजेचे असते, विशेषतः काठ आणि पदराला व्यवस्थित इस्त्री करावी.
३. कॉटनची साडी नेसताना निऱ्या जास्त काढू नयेत, निऱ्या ५ ते ६ काढाव्यात. जास्त निऱ्या काढल्यास साडी कंबरेजवळ फ़ुगीर दिसते. निऱ्या खोचताना देखील थोड्या घट्ट खेचून खोचाव्यात म्हणजे साडी कंबरेजवळ जास्त फुगलेली न दिसता व्यवस्थित बसते.
४. निऱ्या खोचताना थोड्या हाय वेस्ट म्हणजेच नाभीच्या किंचित वर खोचाव्यात. जर पोट थोडं जास्त असेल तर निऱ्या नाभीच्या थोड्याशा डावीकडे खोचून घ्याव्यात. पोटाचा आकार जास्त नसेल तर निऱ्या बरोबर नाभीवरच खोचाव्यात. निऱ्या थोड्या आत वाकवून पिन केल्यास कमरेजवळ जाडी दिसत नाही.
५. जर कॉटनची साडी प्लेन असेल तर त्यावर प्रिंटेड व साडीच्या रंगाला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालावा. यामुळे पाहताना लक्ष सर्वात आधी ब्लाऊज कडेच जाते, त्यामुळे साडी फुगलेली आहे याकडे लक्षच जात नाही. यासोबतच आपला लूक देखील सुंदर आणि एलिगंट दिसतो.
६. कॉटन साडीमध्ये नेहमी बॉडी शेपर पेटीकोट किंवा थोडा फिटिंगचा पेटीकोट वापरल्याने साडी व्यवस्थित अंगाला चापून - चोपून बसते, फुलत नाही.
७. साडी नेसताना सतत ओढत सरळ केल्यास ती शरीराला चिकटून बसते. खूप पिन्स लावल्यास जाडी वाढल्यासारखी दिसते. गरजेपुरतेच पिन्स वापरा. खूप सैल ब्लाऊज असल्यास साडी नीट बसत नाही आणि फुगलेली दिसते. अगदी जाड शुद्ध कॉटनपेक्षा कॉटन-सिल्क किंवा कॉटन पॉलिस्टर मिक्स साड्या चांगल्या बसतात.
या सोप्या टिप्स फॉलो केल्यात तर तुमची कॉटन साडी फुगणार नाही, स्लिम आणि एलिगंट लूक दिसेल.
Web Summary : Cotton sarees can appear bulky if not styled correctly. Ironing, minimal starch, fewer pleats, high-waisted petticoats, and fitted blouses help achieve a sleek, elegant look. Choosing cotton-silk blends also prevents the saree from puffing up.
Web Summary : कॉटन की साड़ी को सही ढंग से स्टाइल न करने पर वह भारी दिख सकती है। इस्त्री, कम स्टार्च, कम प्लीट्स, हाई-वेस्टेड पेटीकोट और फिटेड ब्लाउज स्लिम लुक पाने में मदद करते हैं। कॉटन-सिल्क मिश्रण साड़ियों को चुनने से भी साड़ी फूलती नहीं है।