Join us

आलिया भट-कियारा अडवाणीची साडी ड्रेप करणारी एक्सपर्ट सांगतेय ५ टिप्स, साडी सुंदरच दिसणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2025 15:46 IST

Saree Draping Tips From Dolly Jain: आजवर श्रीदेवीपासून ते आलिया भटपर्यंत कित्येक अभिनेत्रींना साडी नेसविणाऱ्या डॉली जैन यांनी साडी नेसताना प्रत्येकीने लक्षात ठेवाव्या अशा काही खास टिप्स दिल्या आहेत..(5 tips to look more smart and attractive in saree)

ठळक मुद्देसाडी तुमच्या अंगावर एवढी चापूनचोपून बसेल की ती सांभाळणं तुम्हाला खूपच सोपं जाईल.

एरवी बहुतांशजणी ड्रेस, जीन्स, स्कर्ट, वनपीस अशा कपड्यांमध्ये वावरतात. पण लग्नसमारंभासारख्या काही खास ठिकाणी साडी नेसून जायलाच त्यांना आवडतं. सध्या तर लग्नसराईचेच दिवस सुरू आहेत. त्यामुळे साडी नेसणं ओघाने आलंच. म्हणूनच या काही खास टिप्स लक्षात ठेवा जेणेकरून तुमचं साडी नेसण्याचं काम तर सोपं हाेईलच. पण तुम्ही साडी नेसल्यावर आणखी छान, आकर्षक दिसाल. शिवाय साडी तुमच्या अंगावर एवढी चापूनचोपून बसेल की ती सांभाळणं तुम्हाला खूपच सोपं जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साडी नेसल्यावर तुम्हाला कधीही अवघडून गेल्यासारखं होणार नाही (tips and tricks from Dolly Jain about Saree Draping). उलट खूप आरामदायी पद्धतीने तुम्ही साडीमध्ये वावरू शकाल.(5 tips to look more smart and attractive in saree)

 

साडी नेसल्यावर अधिक स्मार्ट, आकर्षक लूक येण्यासाठी ५ टिप्स

१. साडी नेसण्यापुर्वी नेहमी साडीला इस्त्री करून घ्या. कधीही बिना इस्त्री केलेली साडी नेसू नका. बऱ्याच महिलांचं असं हाेतं की इस्त्री केल्यानंतर एकदाच तर ही साडी नेसली होती, आता पुन्हा इस्त्रीची काय गरज.. असा विचार करू नका. कारण इस्त्री करून नेसलेल्या साडीचा आणि इस्त्री न करता नेसलेल्या साडीचा लूक आणि फिल दोन्ही खूप वेगळा असतो. 

हळदी- कुंकू कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यासाठी ६ टिप्स, कामाचा ताण न येता सगळं होईल छान

२. साडीच्या  निऱ्यांचा जो भाग आहे त्याच्या खालच्या भागात अनेक जणी एखादा कडक कपडा जोडून घेतात. यामुळे निऱ्या खूप सफाईदारपणे येतात आणि चापूनचोपून बसतात. तुम्ही कितीही भराभर चाललात किंवा खूप धावपळ करावी लागली तरी निऱ्या अजिबात हलत नाहीत.

 

३. साडीला साधी इस्त्री करण्यापेक्षा नेहमी स्टीम आयर्न करून घेत जा. यामुळे साडीचा सुळसुळीतपणा कमी होऊन ती जास्त छान बसते.

राष्ट्रीय बालिका दिन: 'मेरी बेटी मेरा अभिमान' म्हणत पहिल्या मुलीचं दणक्यात स्वागत करणारे ८ सेलिब्रिटी..

४. ३ ते ४ ठिकाणी साडी व्यवस्थित पिनअप करा. जेणेकरून बराच वेळ साडीमध्ये राहावं लागलं तरी तुम्हाला अजिबात अवघडल्यासारखं होणार नाही. 

५. साडी नेसल्यावर नेहमीच अंडरआर्म पॅडचा वापर करा. कारण जर काखेत घाम येऊन ब्लाऊज ओलसर झालं तर तुमचा संपूर्ण लूकच खूप अजागळ वाटू लागतो. 

 

टॅग्स :फॅशनसाडी नेसणे