Join us  

आलियाप्रमाणेच आता सारा अली खाननेही घातला जुना ड्रेस- बघा नेमकं काय सांगतोय हा नवा ट्रेण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2023 4:55 PM

Sara Ali Khan Repeats Her Blue Anarkali Dress Again: बॉलीवूडमध्ये कधी कोणता ट्रेण्ड येईल काहीच सांगता येत नाही... म्हणूनच तर आता सारा अली खाननेही पुन्हा एकदा तिचा जुना ड्रेस घातला आहे...(Sustainable fashion trend in bollywood)

ठळक मुद्दे२०२० साली दिवाळी साजरी करण्यासाठीही तिने हाच ड्रेस घातला होता. अबु जानी संदिप खोसला यांच्या कलेक्शनमधला तो ड्रेस साराला खूप छान दिसत होता.

बॉलीवूड स्टारचे कपडे आपण सहसा पुन्हा कधी रिपिट झालेले पाहिले नाहीत. अगदी काही मोजके अपवाद सोडले तर ही स्टार मंडळी पब्लिकसमोर येताना त्यांचे जुने कपडे क्वचितच कधीतरी घालतात. त्यामुळे त्यांच्या कपड्यांचं कलेक्शन हा नेहमीच सर्वसामान्यांसाठी एक मोठाच आश्चर्याचा विषय असतो. पण आता हा ट्रेण्डही बदलू लागला आहे. जुनेच कपडे पुन्हा नव्याने घालण्याची फॅशन आता बॉलीवूडमध्ये येऊ पाहते आहे (Sustainable fashion trend in bollywood). आधी आलिया भट आणि आता सारा आली खान... यामुळेच तर सारा अली खान सध्या चर्चेत आली आहे.(Sara Ali Khan repeats her blue anarkali dress again)

 

काही दिवसांपुर्वी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी अभिनेत्री आलिया भट हिने तिच्या लग्नातली साडी नेसली. आता सेलिब्रिटी अशा पुरस्कार सोहळ्यांना नेहमीच नवे कोरे कपडे घालून येत असतात.

गुळाचे 'हे' २ प्रकार माहिती आहेत का? बघा यातला नेमका कोणता गूळ खाणं आरोग्यासाठी चांगलं...

त्यात आलियाने नेसलेली रिपिट साडी पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. sustainable fashion म्हणून आलियाने तिची साडी रिपिट केली होती. आता सारानेही तोच ट्रेण्ड फॉलो केलेला दिसतो आहे.

घरात ठेवण्यासाठी ६ इनडोअर प्लांट्स, घर नेहमीच राहील सदाबहार....

साराने तिच्या निळ्याशार अनारकली ड्रेसमधले काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. कोणत्यातरी कार्यक्रमासाठी ती छान तयार झालेली त्या फोटोंमध्ये दिसली.

 

पण २०२० साली दिवाळी साजरी करण्यासाठीही तिने हाच ड्रेस घातला होता. अबु जानी संदिप खोसला यांच्या कलेक्शनमधला तो ड्रेस साराला खूप छान दिसत होता. sustainable fashion या ट्रेण्डनुसार अभिनेत्री दीपिका पदुकोन हिनेदेखील तिच्या लग्नाच्या लेहेंग्याची ओढणी दिवाळीमध्ये घेतली होती.

चारचौघांत बोलण्याचा कॉन्फिडन्स नाही- मनातलं कुणाला सांगताच येत नाही? शिल्पा शेट्टीने सांगितलेले ३ व्यायाम करा.... 

सुहाना खान हिनेही आलिया भटने नेसलेल्या रिपिट साडीचं तोंडभरून कौतूक केलं आणि आपणही हे करायला पाहिजे, असं म्हणाली... एकंदरीतच सध्या sustainable fashion चं वारं बॉलीवूडमध्ये जोरदार वाहू लागलं आहे...

 

टॅग्स :फॅशनसारा अली खान