Tap to Read ➤

घरात ठेवण्यासाठी ६ इनडोअर प्लांट्स, घर नेहमीच राहील सदाबहार....

घरात हॉलमध्ये, टीपॉयवर किंवा वेगवेगळ्या कॉर्नरवर इनडोअर प्लांट्स छान सजवून ठेवले की घरही कसं फ्रेश, हिरवेगार आणि लाईव्ह वाटते...
म्हणूनच आता घरात ठेवता येण्यासारखे ६ इनडोअर प्लांट्स कोणते ते बघूया... या झाडांची खूप काही विशेष काळजीही घ्यावी लागत नाही. त्यामुळे मेंटेन करायला ते अगदी सोपे आहेत.
स्नेक प्लांट उंच आणि बुटके अशा दोन्ही प्रकारात मिळते. कॉर्नरपीस म्हणून हे झाड छान आहे.
असे वेगवेगळे सकलंट्स तुम्ही टीपॉयवर, खिडकीमध्ये, बेसिनजवळ, बाथरुममध्ये ठेवू शकता... त्यांना दिवसातून एखादा तास चांगला सुर्यप्रकाश मिळाला तरी पुरेसे असते.
मनीप्लांटचे वेगवेगळे प्रकारही घराचा लूक बदलून टाकतात. भरगच्च वाढलेला एखादा मनीप्लांट घरात ठेवून बघा...
पामदेखील घरात खूप छान दिसतो. शिवाय त्याची खूप काळजीही घ्यावी लागत नाही. घराचे दोन्ही कोपरे एकसारखे असतील तर दोन्ही कोपऱ्यांमध्ये दोन पाम ठेवून पाहा.
झेड प्लांट घरात असेल तर त्यामुळेही घराला एकदम क्लासी लूक मिळतो.
कुठेही अगदी सहज वाढणारं आणि कधीही अगदी सदाबहार दिसणारं हे स्पायडर प्लांट एकदा घरात लावून बघाच..
क्लिक करा