बॉलीवूडची अतिशय स्टायलिश अभिनेत्री म्हणून सोनम कपूर ओळखली जाते. तिचं ड्रेसिंग, ॲक्सेसरीज, हेअरस्टाईल या प्रत्येक गोष्टीमध्ये एक वेगळीच स्टाईल असते. त्यामुळेच सोनम नेहमीच इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळी दिसते. आता आपल्याला माहितीच आहे की काही दिवसांपुर्वीच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते आणि ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याची बातमी तिच्या चाहत्यांना दिली होती. यामुळे तिचे चाहते आनंदातच होते. त्यात आता पुन्हा सोनमचे काळ्या बनारसी साडीतले काही सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या फोटोंमधलं तिचं सोज्वळ, सुंदर रूप प्रत्येकाला आकर्षित करून घेत आहे.(Sonam Kapoor's Maternity Photo Shoot in Black Banarasi Saree)
मुंबई येथे झालेल्या एका सोहळ्यामध्ये सोनम कपूरने अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाईन केलेली काळी बनारसी साडी नेसली होती. काळ्या रंगाच्या साडीचे काठ सोनेरी, चंदेरी रंगाचे होते आणि ते अगदी ठसठशीत दिसत होते. सोनमने बारीक निऱ्या घालून साडीचा पदर पिनअप केला होता.
फक्त २ रुपयांची कॉफी खुलवेल तुमचं सौंदर्य, महागडे कॉस्मेटिक्सही पडतील फिके, बघा कशी वापरायची कॉफी
कोणतीही सामान्य भारतीय स्त्री ज्याप्रमाणे साडी पिनअप करेल अगदी तसाच सोनमचा लूक होता आणि म्हणूनच तो कदाचित सर्वसामान्यांना एवढा जास्त आवडून गेला. हे तिचे फोटो लगेचच Diet Sabya या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आणि “Is this the best pregnancy sari lewk of all time?” असा प्रश्नही त्यावर विचारण्यात आला. या प्रश्नाला चाहत्यांनी अगदी भरभरून प्रतिक्रिया दिल्या.
या सुंदर साडीवर सोनमने हाय नेक आणि लांब बाह्या असणारं प्लेन काळ्या रंगाचं ब्लाऊज घातलं होतं. कानातल्यांचं सिलेक्शन अतिशय युनिक होतं आणि मधोमध भांग पाडून केसांचा अंबाडा घातला होता.
दह्यामध्ये 'हा' पांढरा पदार्थ मिसळून खा, वाढलेलं कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड पटापट होईल कमी
या तिच्या गेटअपवर तिने घेतलेली सोनेरी रंगाची पर्सही खूप उठून दिसत होती. सोनमचा हा लूक पाहून अनेक जणी नॉस्टॅल्जिक झाल्या. हल्ली प्रेग्नन्सी फोटोशूटच्या नावाखाली जे काही उथळ आणि अंग प्रदर्शन घडविणारं फोटोशूट केलं जातं त्या तुलनेत सोनमचं हे रूप कितीतरी उजवं आणि पारंपरिक भारतीय पेहरावाची पाळंमुळं दाखविणारं होतं. म्हणूनच ते नेटिझन्सकडून एवढं उचलून धरलं गेलं..
