Join us  

सानिया मिर्झाचा नवाबी थाट! परिणितीचा लग्नात घातलेल्या घागऱ्याची किंमत तब्बल ४.५ लाख...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2023 2:26 PM

Sania Mirza's lehenga cost ₹4.36 lakh: स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने तिची बेस्ट फ्रेंड परिणिती चोप्रा हिच्या लग्नात केलेला नवाब थाट बघण्यासारखा होता...

ठळक मुद्देपरिणिती आणि सानिया या दोघी एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी असून सानिया या लग्नात अगदी नवाबी थाटात गेली होती.

क्रिकेट व्यतिरिक्त अन्य कोणत्या खेळाडूंना जर भारतात ग्लॅमर मिळालं असेल तर त्यातली पहिली खेळाडू आहे सानिया मिर्झा. खेळाडूही किती स्टायलिश आणि ग्लॅमरस असतात आणि त्यांचे फॅन फॉलोईंगही किती जबरदस्त असू शकते हे देखील सानियानेच दाखवून दिले आहे. सानिया मिर्झा आणि तिच्या स्टाईलची नेहमीच चर्चा असते. ती आताही होत आहे. त्याला निमित्त ठरलं बॉलीवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आप नेते राघव चढ्ढा यांचं शाही लग्न (Parineeti Chopra- Raghav Chadha's wedding). परिणिती आणि सानिया या दोघी एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी असून सानिया या लग्नात अगदी नवाबी थाटात गेली होती. कारण तिने लग्नासाठी घातलेला लेहेंगा तब्बल ४ लाख ३६ हजारांचा होता. (Sania Mirza's lehenga cost ₹4.36 lakh)

 

तिचे त्या अत्यंत सुंदर लेहेंग्यातले देखणे फोटो तिने नुकतेच सोशल मिडियावर शेअर केले आहेत. "Sometimes an outfit makes you feel like royalty..." असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

कपड्यांवरचे डाग निघत नाहीत? बर्फ वापरा, बघा बर्फाचा भन्नाट वापर, डाग निघतील झटकन- पटकन

तिचे ते कपडे आणि त्यावरचे तिचे दागिने, तिचा मेकअप या सगळ्याच गोष्टी तिच्या लूकला खरोखरच एक रॉयल फिल देणाऱ्या आहेत. तिने घातलेला लेहेंगा, ब्लाऊज आणि ओढणी असं सगळंच मोतिया किंवा पीच कलरचं असून तो लेहेंगा सेलिब्रिटी डिझायनर मृणालिनी राव यांच्या डिझायनर कलेक्शनमधला आहे.

 

ब्लाऊज आणि लेहेंग्यावर खूप हेवी जरदोसी वर्क असून ते सगळं हॅण्डमेड आहे. लेहेंगा जेवढा भरजरी आहे, तेवढंच त्याचं ब्लाऊजही भरगच्च डिझाईन असणारं आहे.

अनुष्का- दीपिका- प्रियांका आणि परिणीती; त्यांच्या सुंदर आणि प्रचंड महाग मंगळसूत्रांचे पाहा देखणे डिझाईन्स

रेशमी ओढणीच्या काठांना लेहेंगा आणि ब्लाऊजच्या वर्कला शोभेल असं जरदोसी वर्क केलेलं आहे. गळ्यातलं आणि कानातलं लेहेंग्यावरच्या जरदोसी वर्कला मिळतं जुळतं असून त्यावर तिने ग्लॉसी लाईट शेड मेकअप केला आहे. हातातलं घड्याळ देखणं असून तिच्या लूकला आणखीनच स्टायलिश टच देणारं ठरलं आहे.   

टॅग्स :फॅशनसानिया मिर्झापरिणीती चोप्रालग्न