Join us

समंथा प्रभुच्या १. ३८ लाखांच्या साडीवरची सुंदर एम्ब्रॉयडरी - ब्लाऊजवर स्टोन वर्क, ' असे ' कॉम्बिनेशन करायचे तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2023 16:13 IST

Samantha Ruth Prabhu's Black Saree Costs 1.38 Lakh : अभिनेत्री समंथा प्रभू हिचा देसी लूक पाहून तिचे चाहते पुन्हा एकदा नव्याने तिच्या प्रेमात पडले आहेत. बघा तिची महागडी साडी नेमकी आहे तरी कशी....

ठळक मुद्देन्यूयॉर्क येथे नुकताच 41st India Day Parade कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणी म्हणून समंथाची उपस्थिती होती.

अभिनेत्री समंथा प्रभू आणि तिचा अभिनय यांची नेहमीच चर्चा होते. दक्षिणेत समंथाचा जसा एक वेगळा चाहता वर्ग आहे, तसाच चाहता वर्ग तिने देशभरात निर्माण केला आहे. समंथा आणि तिचा जबरदस्त फॅशन सेन्स याची चर्चाही नेहमीच होते. बॉलीवूडची स्टनिंग फॅशन आयकॉन म्हणून ती ओळखली जाते (Samantha Ruth Prabhu's black saree worth Rs. 1.38 lakh). आता पुन्हा एकदा तिने असाच काहीसा लूक केला असून तिची स्टाईल आणि नजाकत पाहून पुन्हा एकदा तिच्या फॅशन सेन्सची वाहवा होत आहे. समंथाचे अतिशय सुंदर अशा काळ्या साडीतले काही देखणे फोटो (Samantha Ruth Prabhu's stunning look) नुकतेच व्हायरल झाले असून त्या साडीची किंमत तब्बल १ लाख ३८ हजार एवढी असल्याचे बोलले जाते.

 

न्यूयॉर्क येथे नुकताच 41st India Day Parade कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणी म्हणून समंथाची उपस्थिती होती. या सोहळ्यात समंथाने काळी साडी नेसून असा देखणा देसी लूक केला होता.

जीन्स धुताना ३ चुका टाळा, जीन्स लवकर खराब होणार नाही, दिसेल अनेक वर्षे नव्यासारखी

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अर्पिता मेहता यांनी डिझाईन केलेली ही काळी साडी त्या कार्यक्रमात खरोखरंच लक्षवेधी ठरली. या साडीचं वैशिष्ट्य असं की साडीला अगदी नाजूक असे काठ आहेत आणि त्या काठांवर पुर्णपणे थ्रेड एम्ब्रॉयडरी केलेली आहे. एम्ब्रॉयडरीच्या मध्ये- मध्ये केलेलं मिरर वर्क त्या काठांना आणखी उठाव देत आहे. 

 

साडी एवढंच किंवा त्यापेक्षाही अधिक देखणं झालंय ते तिचं ब्लाऊज. साडीच्या काठावर जे डिझाईन आहे,

बेडवर टाकलेलं बेडशीट २ दिवसांतच चुरगळतं? २ उपाय, बेडशीट राहील इस्त्री केल्याप्रमाणे ताठ

तसंच भरगच्च डिझाईन संपूर्ण ब्लाऊजवर करण्यात आलं असून त्यावर खूप जास्त प्रमाणात स्टोन वर्क आणि मिररवर्क दिसून येतं. समंथाने छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन पदर पिनअप केला आहे. शिवाय खालच्या बाजुने साडी छोट्या- छोट्या झालर असल्याप्रमाणे डिझाईन केलेली आहे. त्यामुळे ती इतर साड्यांपेक्षा आणखी वेगळी वाटते. 

 

टॅग्स :फॅशनसाडी नेसणेसमांथा अक्कीनेनी