Lokmat Sakhi >Fashion > राधिका मर्चंटच्या विंटेज ड्रेसपेक्षा सातपट महाग आहे तिची पर्स, बघा या दोन्ही वस्तूंची खासियत....

राधिका मर्चंटच्या विंटेज ड्रेसपेक्षा सातपट महाग आहे तिची पर्स, बघा या दोन्ही वस्तूंची खासियत....

Anant Ambai- Radhika Merchant Pre Wedding: अंबानी कुटूंबाची होणारी सून राधिका मर्चंट हिचा गुलाबी रंगाचा मिडी ड्रेस आणि तिची पर्स या दोन्ही गोष्टी सध्या व्हायरल झाल्या आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2024 03:27 PM2024-06-13T15:27:10+5:302024-06-13T15:29:43+5:30

Anant Ambai- Radhika Merchant Pre Wedding: अंबानी कुटूंबाची होणारी सून राधिका मर्चंट हिचा गुलाबी रंगाचा मिडी ड्रेस आणि तिची पर्स या दोन्ही गोष्टी सध्या व्हायरल झाल्या आहेत.

radhika merchant's pink cocktail dress worth rs 3 lakh, viral photo of her expensive dress and purse | राधिका मर्चंटच्या विंटेज ड्रेसपेक्षा सातपट महाग आहे तिची पर्स, बघा या दोन्ही वस्तूंची खासियत....

राधिका मर्चंटच्या विंटेज ड्रेसपेक्षा सातपट महाग आहे तिची पर्स, बघा या दोन्ही वस्तूंची खासियत....

Highlightsराधिकाचा तो लूक अतिशय खास होता. खूप काही मेकअप न करताही तिचं सौंदर्य खुलून आलं होतं. 

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी (Mukesh Ambani And Nita Ambani) यांचे लहाने चिरंजीव म्हणजे अनंत अंबानी.अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याच्या आधीचा दुसरा प्री- वेडिंग सोहळा (Pre Wedding) नुकताच परदेशात थाटात पार पडला. या सोहळ्यालाही अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. या सोहळ्यादरम्यान एका खास प्रसंगी राधिकाने गुलाबी रंगाचा मिडी ड्रेस घातला होता. त्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती यात वादच नाही. त्यानिमित्ताने तिच्या सौंदर्याची चर्चा तर झालीच. पण त्यापेक्षाही तिच्या त्या ड्रेसच्या किमतीची आणि त्यावेळी तिच्या हातात असणाऱ्या पर्सची चर्चा अधिक रंगली होती. 

 

सोहळ्यादरम्यान राधिकाने जो गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता तो ड्रेस christian dior couture 1959 cocktail dress म्हणून ओळखला जातो. हा ड्रेस विंटेज कलेक्शनपैकी असून विंटेज क्लोदिंग एक्सपर्ट डोरिस रेमंड यांनी २०१६ साली या ड्रेसचा लिलाव केला होता.

गळून गळून केस पातळ झाले? खोबरेल तेलात ३ पदार्थ टाकून लावा- नवे केस भराभर उगवतील

तेव्हा त्या ड्रेसची किंमत ३८४० अमेरिकन डॉलर एवढी निश्चित झाली होती. त्यानुसार जर पाहायला गेलं तर तिचा त्या ड्रेसची किंमत भारतीय चलनानुसार ३, १९, ४१६ रुपये आहे. या लाखमोलाच्या ड्रेसवर राधिकाने घेतलेली सुंदर ड्रेसही खूप लक्षवेधी ठरली. तिच्या त्या पर्सची किंमत तर तिच्या ड्रेसच्या कित्येक पटीने जास्त आहे.

या विंटेज ड्रेसवर मॅचिंग करायला राधिकाने जी पर्स घेतली होती ती हर्मीस मिनी केली या जगप्रसिद्ध ब्रॅण्डची होती आणि तिची किंमत तब्बल २२ लाख रुपये होती असं abplive.com यांनी सांगितलं आहे.

तुमच्या- आमच्या घरात नेहमीच होणारा 'हा' पदार्थ जगातल्या वाईट पदार्थांच्या यादीत! बघा तो कोणता 

राधिकाचा तो लूक अतिशय खास होता. खूप काही मेकअप न करताही तिचं सौंदर्य खुलून आलं होतं. 

 

Web Title: radhika merchant's pink cocktail dress worth rs 3 lakh, viral photo of her expensive dress and purse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.