रामनवमीचा उत्सव सगळीकडे नुकताच पार पडला. यावेळी सर्वत्र रामनामाचा गजर होत होता. हाच रामनामाचा गजर थेट नीता अंबानी यांच्या साडीवरही दिसून आला. म्हणूनच तर सध्या सोशल मीडियावर नीता अंबानींच्या त्या साडीची खूप चर्चा होेत आहे. एका खासप्रसंगी नीता यांनी ही साडी नेसली होती. त्यांना ओडिसामधील केआयआयटी विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी त्यांनी ओडिसाचा सांस्कृतिक वारसा सांगणारी इक्कत पद्धतीची साडी नेसली होती. या साडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्यावर सगळीकडेच राम लिहिलेले होते. रामनवमीचं औचित्य साधून नीता यांनी नेसलेली ही साडी खरोखरच अतिशय लक्षवेधी ठरली.
ओडिसा येथील हातमाग कला सांगणाऱ्या काही प्रसिद्ध साड्या आहेत. त्यापैकीच एक आहे इकत साडी. इकत साडी विणकाम पद्धतीमध्ये आधी धाग्यांना रंग दिला जातो आणि मग त्यांच्यापासून साडी तयार केली जाते. त्यामुळे ही साडी तयार करायला खूप वेळ लागतो.
पोळ्यांच्या चटकदार नुडल्स करण्याची रेसिपी, मुलांना एवढ्या आवडतील की मैद्याच्या नुडल्स खाणंच विसरतील
त्यामुळेच तर नीता यांची साडी तयार करायलाही जवळपास २ वर्षे लागली. डिझायनर हरीशंकर मेहर यांनी ही साडी तयार केली होती. या साडीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती पुर्णपणे नैसर्गिक रंग वापरून तयार करण्यात आली आहे. त्यामुळेच ती इतर इकत साड्यांपेक्षा खूप वेगळी वाटते.
नीता अंबानींनी नेसलेल्या या साडीवर कित्येक वेगवेगळ्या भाषांमध्ये राम लिहिलेले आहे. याशिवाय रामाचे स्त्रोत्र तसेच रामाची माहिती सांगणाऱ्या शीलालेखांवरील मजकूरही या साडीवर आहे.
विकतच्या क्रिमची गरजच नाही- घरीच बनवा तुरटीचं क्रीम, पिंपल्स- टॅनिंग जाऊन त्वचेवर येईल सुंदर चमक
त्यामुळेच रामशीला साडी म्हणून ती ओळखली जात आहे. या साडीवर रुद्राक्षांची दोनपदरी माळ आणि कानात फुलांच्या आकाराचे कानातले असा लूक नीता यांनी केला होता आणि त्या अतिशय आकर्षक दिसत होत्या.
Web Summary : Neeta Ambani wore a special Ikkat saree with 'Ram' inscribed on it for Ram Navami. This saree, showcasing Odisha's cultural heritage, took two years to create by designer Hari Shankar Meher. Made with natural dyes, the Ramshila saree features Ram's name in multiple languages and information from inscriptions.
Web Summary : नीता अंबानी ने रामनवमी पर 'राम' अंकित एक विशेष इक्कत साड़ी पहनी थी। ओडिशा की सांस्कृतिक विरासत को दर्शाने वाली इस साड़ी को डिजाइनर हरि शंकर मेहर ने बनाने में दो साल लगाए। प्राकृतिक रंगों से बनी, रामशिला साड़ी में कई भाषाओं में राम का नाम और शिलालेखों से जानकारी है।