Join us
Daily Top 2Weekly Top 5

हातावर सजतेय चमचमत्या आरशांची ‘मिरर मेहेंदी!’ पाहा हातावर मेहेंदी लावण्याचा नवा सुंदर ट्रेंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2026 18:32 IST

New Trend of Mirror Mehndi: सध्या ट्रेंडिंग असणाऱ्या मिरर मेहेंदीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? (latest patterns of mirror mehendi)

कपडे, दागिने, हेअरस्टाईल यात नेहमीच वेगवेगळे बदल होत असतात. त्यालाच तर आपण फॅशन म्हणताे. नाही म्हणायला मेहेंदीमध्ये पण खूप वेगवेगळे बदल झाले. पावडर मेहेंदीच्या जागी मेहेंदी कोन आले. आता तर इंस्टंट मेहेंदी आली आहे. मेहेंदीचे छापे आहेतच. आता यामध्ये आणखी एक भर पडली आहे ती मिरर मेहेंदीची. नावाप्रमाणेच या मेहेंदीमध्ये चमचमत्या आरशांचा किंवा स्टोनचा वापर केलेला असतो (New Trend of Mirror Mehendi). त्यामुळे ही मेहेंदी निश्चितच एक वेगळा लूक देते आणि शिवाय झटपट काढता येते (mirror mehendi designs). या लग्नसराईमध्ये इतरांपेक्षा वेगळी मेहेंदी हवी असेल तर मिरर मेहेंदी नक्की ट्राय करून पाहा.(latest patterns of mirror mehendi)

मिरर मेहेंदीचा नवा ट्रेण्ड

 

मिरर मेहेंदी हा एक आता खूप नवा प्रकार आला आहे. यामध्ये नेहमीसारखी मेहेंदी घेऊन किंवा इंस्टंट मेहेंदीसाठी असणारे रंग वापरून तुम्ही मेहेंदी काढू शकता. काही तरी एखादी नाजूक डिझाईन काढायची आणि त्याला मिरर, स्टोन, कुंदन किंवा मोती लावून सजवायचं अशा प्रकारची ही मेहेंदी असते. फुलं, पानं, वेली असा कोणताही तुम्हाला आवडेल तो आकार तुम्ही या मेहेंदीतून घेऊ शकता. तुमच्या मनाने हवी तशी डिझाईन करून घेऊ शकता.

 

ही मेहेंदी मिळते कुठे असा प्रश्न पडला असेल तर काही ब्रॅण्ड मिरर मेहेंदी बिंदी विकतात. त्या मिरर टिकल्या तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरून खरेदी करू शकता किंवा मग तुमच्या शहरातल्या लोकल बाजारात मिळत असतील तर तिथून घेऊ शकता. जर तुम्हाला अशा मिरर बिंदी मिळाल्या नाही तर बाजारातून वेगवेगळ्या आकाराचे, रंगाचे स्टोन, कुंदन विकत आणा. त्यासोबतच एक आयलॅशेश ग्लू देखील घ्या. हा ग्लू हातावर लावायचा आणि त्यावर तुम्हाला हवे तसे कुंदन, स्टोन चिटकवायचे. त्याच्या आजुबाजुने खऱ्या मेहेंदीने किंवा इंस्टंट मेहेंदीने डिझाईन करायचे. मस्त मिरर मेहेंदी तयार. एखाद्यावेळी ट्राय करून पाहा. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mirror Mehendi: A sparkling new trend in hand decoration!

Web Summary : Mirror Mehendi, a new trend, uses mirrors, stones, or kundans to embellish henna designs. Apply a delicate design using regular or instant henna, then decorate with mirrors and stones. It's quick, unique, and perfect for weddings.
टॅग्स :फॅशनस्टायलिंग टिप्सखरेदी