Join us
Daily Top 2Weekly Top 5

नीता अंबानींनी नेसली 'कधवा' बनारसी साडी, वाचा आता दुर्मिळ होत चाललेल्या कधवाची खास बात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2026 18:34 IST

Neeta Ambani in Red Banarasi Saree: नीता अंबानी यांचे लाल बनारसी साडीतले फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत... बघा या साडीची खासियत...

ठळक मुद्देहल्ली ही कला नव्याने शिकण्याचे प्रमाणही कमी झाले असून मशिनचा वापर वाढला आहे. 

नीता अंबानी हे एक नेहमीच चर्चेत असणारं व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कार्याची जेवढी चर्चा असते, तेवढीच चर्चा त्यांनी नेसलेल्या साड्यांचीही होते. कारण या साड्या खूप खास असतात. शिवाय जे काही एकदम युनिक, एकदम वेगळं आहे ते नीता अंबानी यांच्या कलेक्शनमध्ये पाहायला मिळतं. अशीच एक वेगळ्या धाटणीची बनारसी साडी त्यांनी नुकतीच नेसली होती. आता बनारसी साड्या तर खूप असतात, पण नीता अंबानी यांच्या साडीची मात्र गोष्टच वेगळी होती. कारण ही साडी सध्या खूपच दुर्मिळ होत चाललेल्या कधवा पद्धतीने विणलेली होती. आता ही नेमकी काय पद्धत असते आणि तिचे काय वैशिष्ट्य असते ते पाहूया...

 

नीता अंबानी यांच्या लाल रंगाच्या बनारसी साडीचे वैशिष्ट्य..

लालबुंद रंग असणाऱ्या बनारसी साडीमध्ये नीता अंबानी खरोखरच अतिशय सुंदर दिसत होत्या. या साडीचा पदर आणि त्यावरची नक्षीही अतिशय देखणी होती. ही साडी खास कधवा पद्धतीने विणली गेली आहे, असं सांगितलं जातं. साडी विणकामाची ही एक अतिशय अवघड कला आहे. आपण एरवी ज्या साड्या पाहातो त्या साडीच्या बाहेरच्या बाजुला नक्षी असते आणि आतल्या बाजुला त्याचे धागे दिसत असतात.

 

पण कधवा पद्धतीने विणलेल्या साडीमध्ये मात्र आतल्या बाजुने दोरे अजिबात दिसत नाहीत. आतल्या बाजुने आणि बाहेरच्या बाजुने नक्षी अगदी सारखं असतं. त्यामुळे बऱ्याचदा तर साडीची बाहेरची बाजू कोणती आणि आतली बाजू कोणती हे देखील समजत नाही. हे काम पुर्णपणे हातानेच केलं जातं. म्हणूनच ही कला अतिशय अवघड मानली जाते. या पद्धतीने साड्या विणायला खूप संयम आणि वेळ लागतो. त्यामुळे हल्ली ही कला नव्याने शिकण्याचे प्रमाणही कमी झाले असून मशिनचा वापर वाढला आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Nita Ambani's rare 'Kadhwa' Banarasi saree: Special details revealed.

Web Summary : Nita Ambani wore a rare Banarasi saree woven with the Kadhwa technique. This difficult art produces sarees with identical designs on both sides. Due to the time and skill required, few artisans now practice Kadhwa weaving, with machines replacing handwork.
टॅग्स :फॅशनसाडी नेसणेनीता अंबानी