Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया भटची मोगरा साडी- नाजुक फुलांचे सुंदर काठ, जणू मोगऱ्याचा बहर! पाहा व्हायरल फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2026 15:17 IST

Mogra Saree of Alia Bhatt: आलिया भटने नेसलेल्या मोगरा साडीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे...(Alia Bhatt wore mogra saree for Screen Award 2026) 

ठळक मुद्देआलिया भटने जी मोगरा साडी नेसली होती ती फॅशन डिझायनर गौरव गुप्ता यांनी डिझाईन केली होती.

बाॅलीवूड अभिनेत्री आलिया भट आणि तिचे स्टायलिश लूक यांची नेहमीच चर्चा होत असते. कधी कधी तिला भयंकर ट्रोल केलं जातं तर कधी कधी तिची एखादी स्टाईल डोक्यावर उचलून घेतली जाते. पण कौतूक होवो किंवा टिका होवो... आलिया नेहमीच वेगवेगळ्या फॅशन्सचे कपडे घालून वेगवेगळ्या रुपात कार्यक्रमांना उपस्थिती लावत असते. आता हेच पाहा ना स्क्रिन ॲवॉर्ड २०२६ चं होस्टिंग नुकतंच आलियाने केलं. एखादा ॲवॉर्ड सोहळा होस्ट करण्याची तिची ही पहिलीच वेळ होती. या सोहळ्यात तिने जी साडी नेसली होती, ती मोगरा साडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.(Mogra Saree of Alia Bhatt)

 

कशी होती आलिया भटची मोगरा साडी?

आलिया भटने जी मोगरा साडी नेसली होती ती फॅशन डिझायनर गौरव गुप्ता यांनी डिझाईन केली होती. रॉयल, माॅडर्न आणि एथनिक लूक देणारी ही साडी आलियाला अतिशय छान दिसत होती.

उन्हाळ्यात चोप्रा माय- लेकी चेहऱ्याला लावतात 'हे' खास उटणं, प्रियांका चोप्राच्या आईने सांगितला देसी नुस्का

सॅटीन सिल्क प्रकारातली चमकदार मोतिया रंगाची ही साडी होती आणि त्यावरचं ब्लाऊज बारीक मोती, कुंदन, सेक्विन लावून डिझाईन करण्यात आलेलं होतं. ब्लाऊजवर काही  प्रमाणात जर्दोसी, थ्रेड वर्कही दिसून आलं. या साडीवर आलियाने मोती आणि हिऱ्यांचे दागिने घातले होते पण सगळ्यात जास्त लक्षवेधी ठरली ती तिने घेतलेली मोगऱ्याची माळ...

 

साडीचा पदर ज्या पद्धतीने कंबरेच्या डाव्या भागापासून मागच्या बाजुने पुढे येत डाव्या खांद्यावरून मागे सोडला जातो, अगदी तशाच पद्धतीने आलियाने मोगऱ्याच्या फुलांची दुहेरी माळ पदराप्रमाणे अंगावर घेतली होती.

फक्त अर्धा टोमॅटो बघा कसं खुलवतो तुमचं सौंदर्य.. 'हा' घरगुती मास्क लावून पाहा- त्वचा होईल सुंदर

ते फोटो पाहून हा खराखुरा मोगऱ्याचा हार आहे का असा भास होतो. पण बारकाईने पाहिल्यास लक्षात येतं की ते मोगऱ्याच्या कळीच्या आकाराचे मोती आहेत. न्यूड मेकअप आणि मोजके दागिने अशा थाटात आलिया या मोगरा साडीत खरंच लक्षवेधी दिसली. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Alia Bhatt's Mogra Saree: Delicate Floral Border, Viral Photos!

Web Summary : Alia Bhatt's Mogra saree, designed by Gaurav Gupta, went viral after the Screen Award. The pearl-colored satin silk saree features a blouse adorned with beads and sequins. Alia paired it with diamond jewelry and a Mogra garland.
टॅग्स :फॅशनसाडी नेसणेस्टायलिंग टिप्सआलिया भटदागिनेफुलं