सध्या बदलत्या काळानुसार ब्लाऊजवर वेगवेगळ्या पॅटर्नचे नक्षीकाम किंवा नाजूक वर्क करुन मिळते. ब्लाऊज घातल्यानंतर तो अधिक सुंदर दिसावा किंवा त्याला असा एक खास लूक यावा (Maintain Your Aari Work Blouse Tips for Preserving Embroidery) यासाठी त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे वर्क करून (How to maintain Aari embroidery Blouses) घेतले जाते. यात नाजूक धागा वर्क, मोती वर्क, मण्यांचे वर्क अशा वेगवेगळ्या प्रकारचे वर्क करता येते. यातही आजकाल फारच (Care tips for your precious aari blouses) फेमस झालेला प्रकार म्हणजे (Aari Work Embroidery) 'आरी वर्क'. आरी वर्क या प्रकारांत ब्लाऊजवर बारीक नाजूक गोल्डन मण्यांचे वर्क केले जाते(How to Maintain aari blouse with easy method).
या बारीक नक्षीकाम केलेल्या मण्यांमुळे ब्लाऊज खूप सुंदर दिसतो. हे ब्लाऊजवर आरी वर्क करण्याचे काम अतिशय किचकट, नाजूक आणि वेळखाऊ असते. त्यामुळे ब्लाऊजवर आरी वर्क करून घेण्यासाठी आपल्याला भरपूर पैसे मोजावे लागतात. एवढंच नव्हे तर ब्लाऊजवर इतके महागडे वर्क करून घेतल्याने अशा ब्लाऊजची तितकीच काळजी देखील घ्यावी लागते. हे ब्लाऊज धुण्यापासून ते कपाटात स्टोअर करुन ठेवण्यापर्यंत त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. जर अशा ब्लाऊजची वेळीच काळजी घेतली नाही तर त्यावरील आरी वर्क खराब होऊ लागते. यासाठी महागडे आरी वर्क केलेल्या ब्लाऊजची काळजी कशी घ्यावी ते पाहूयात.
आरी वर्क असणाऱ्या ब्लाऊजची काळजी कशी घ्यावी?
१. ब्लाऊजवर परफ्युम - डिओ लावू नये :- आरी वर्क केलेल्या ब्लाऊजवर कधीही परफ्युम - डिओ किंवा स्प्रे लावू नये. कारण यात असणाऱ्या हानिकारक केमिकल्सयुक्त रसायनांमुळे यावरील गोल्डन मण्यांचा रंग फिका पडून ते खराब दिसू शकतात. तसेच आरी वर्क करताना मणी ज्या धाग्यात गुंफले आहे तो धागा लूज पडून निखळू शकतो यामुळे महागडे आरी वर्क बिघडू शकते. यासाठी शक्यतो ब्लाऊजवर परफ्युम - डिओ लावू नये आणि लावायचा असल्यास तो ब्लाउजच्या आतल्या बाजूने लावावा.
२. ब्लाऊज प्लॅस्टिक बॅगमध्ये ठेवावा :- आरी वर्क केलेला ब्लाऊज कपाटात ठेवताना तो असाच घडी करून किंवा हँगरला लावून ठेवू नये. यामुळे ब्लाऊजवरील आरी वर्क खराब होण्याची शक्यता असते यासाठी, ब्लाऊज नेहमी चांगल्या दर्जाच्या प्लॅस्टिक बॅगमध्येच ठेवावा. जेणेकरून ब्लाऊजवरील आरी वर्क खराब होणार नाही.
३. ब्लाऊजला स्वेट पॅड्स लावावेत :- आपल्याला येणाऱ्या घामामुळे देखील ब्लाऊजवरील आरी वर्क खराब होऊ शकते. यामुळे ब्लाऊजमध्ये घाम शोषून घेणारे स्वेट पॅड्स जरूर लावावेत. घामाच्या संपर्कात आल्याने आरी वर्क केलेल्या मण्यांची गोल्डन शाईन निघून जाण्याची शक्यता असते. यासाठी ब्लाऊजला स्वेट पॅड्स लावावेत. तसेच ब्लाऊज घालून झाल्यावर त्यावरचा घाम संपूर्णपणे सुकू द्यावा आणि मगच तो कपाटांत ठेवावा.
४. आरी वर्क ब्लाऊज शाम्पूच्या पाण्याने धुवून घ्यावा :- आरी वर्क ब्लाऊज घरच्या घरीच धुवायचा असला तर तो शाम्पूच्या पाण्यांत धुवावा. यामुळे त्या मण्यांची चमक नाहीशी होत नाही. यासाठी एका बादलीत पाणी घेऊन त्यात चमचाभर शाम्पू मिक्स करून त्यात हा ब्लाऊज भिजवून हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यावा. मग स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत वाळत घालावा. आरी वर्क ब्लाऊज कधीही थेट सूर्यप्रकाशात वाळत घालू नये यामुळे त्या मण्यांची चमक कमी होऊ शकते.
पारंपरिक खणाचा मॉडर्न ट्रेंड! खणाच्या दागिन्यांचा सुंदर साज, शोभून दिसतील असे 'खण'खणीत दागिने...
५. आरी वर्क ब्लाऊज उलटा करून स्टोअर करणे :- आरी वर्क केलेला ब्लाऊज नेहमी कपाटांत ठेवताना तो उलटा करुन ठेवावा. ब्लाऊजची आतील बाजू बाहेर आणि बाहेरील बाजू आत अशा पद्धतीने कपाटांत स्टोअर करून ठेवावा. यामुळे त्यावरील आरी वर्क खराब न होता दीर्घकाळ चांगले टिकून राहते, तसेच त्यावरची चमक देखील कमी होत नाही.