माधुरी दीक्षित ही अनेकांची ऑल टाईम फेव्हरेट अभिनेत्री. तिची नजाकत, तिचं हास्य या सगळ्या गोष्टी लाजवाब आहे.. त्यामुळेच तर माधुरीची प्रत्येक झलक तिच्या चाहत्यांसाठी खास आहे. रिॲलिटी शो किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून माधुरी नेहमीच तिच्या चाहत्यांना भेटत असते. सोशल मीडियावरही ती ॲक्टीव्ह असते. त्यामुळेच तिच्या कित्येक लूक्सची नेहमीच चर्चा होते. आता पुन्हा एकदा अशीच एक चर्चा रंगली आहे ती तिच्या हिरव्या रंगाच्या साडीची. माधुरीची ही साडी खरोखरच खूप सुंदर असून तिची किंमत लाखोंच्या घरात आहे...(Madhuri Dixit's Green Saree Look)
आता सेलिब्रिटी म्हटलं की महागडे कपडे घालणं ओघाने आलंच.. माधुरीही त्याला अपवाद नाही. तिने साेशल मीडियावर जे हिरव्या साडीमधले फोटो शेअर केले आहेत, ती साडी जयंती रेड्डी यांच्या कलेक्शनमधली असून ग्रीन जरिया साडी असा या साडीचा उल्लेख शॉपिंग साईटवर करण्यात आला आहे.
डोकं दुखलं-ॲसिडिटी झाली घे गोळी, मनानाचे औषधांचा मारा टाळा-नॅचरल पेनकिलर असलेले ‘हे’ पदार्थ खा
या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे तिचे काठ आणि त्यावरचं ब्लाऊज. काठ अतिशय बघण्यासारखे असून त्यावर बारीक मोती, कुंदन, स्टोन लावलेले आहेत. हे काठ आणि साडीवरचं ब्लाऊज म्हणजे हॅण्ड एम्ब्रॉयडरीचं एक उत्तम उदाहरण आहे.
त्या साडीला खऱ्या अर्थाने शोभा आलेली आहे ती तिच्यावरच्या ब्लाऊजमुळे. ब्लाऊज अतिशय भरगच्च वर्क असणारं आहे. शिवाय त्यावरचं जरदोसी वर्कही हातानेच करण्यात आलं आहे. समोरच्या बाजून वेगळ्याच आकाराचा पानगळा तिने घेतला असून मागच्या बाजुनेही त्याचा मोठा गळा आहे.
शेंगा खा टरफले बागेला द्या! बागेतली माती कसदार करतात टरफले, 'असे ' वापरा आणि पाहा बागेचा कायापालट
हेवी ब्लाऊज आणि साडीचे सुंदर हॅण्डवर्क असणारे काठ यामुळे या साडीची किंमत तब्बल २ लाख १९ हजार एवढी सांगितली जाते. माधुरीसारखा असा लूक लग्नसराईच्या निमित्ताने करण्यास हरकत नाही. एका हातात घड्याळ, एका हातात ब्रेसलेट आणि कानात झुमके अशा थाटातली माधुरी या साडीत खरोखरच भाव खाऊन जाते.
Web Summary : Madhuri Dixit's green saree, from Jayanti Reddy's collection, features intricate hand embroidery. Paired with a heavily worked blouse, the saree costs ₹2.19 lakhs. Her look is perfect for wedding inspiration.
Web Summary : माधुरी दीक्षित की जयंती रेड्डी कलेक्शन की हरी साड़ी में जटिल हस्तकला है। भारी कढ़ाई वाले ब्लाउज के साथ, साड़ी की कीमत ₹2.19 लाख है। उनका लुक शादी के लिए एकदम सही है।