Join us

हिरवागार चमचमता ड्रेस घालून करीना कपूरचे न्यू इयर सेलिब्रेशन, लाखों रुपयांच्या ड्रेसची ही कोणती नवीन स्टाईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2023 13:52 IST

Stylish Dress by Kareena Kapoor Khan करिना कपूर स्टायलिश आहेच पण तिनं घातलेला हा ड्रेस वेगळे स्टाइल स्टेटमेण्ट आहे.

बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर खान आपल्या दिलखेचक अदांसाठी ओळखली जाते. ती आघाडीची अभिनेत्री असून, तिने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत. करिना तिच्या अभिनयासोबतच स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. करिना कपूरचा बोल्ड लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होत असतो.

करिना कपूर आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने नुकतंच आपला स्टनिंग लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात तिने हिरव्या रंगाचा चमकदार ड्रेस परिधान केला आहे. तिचा हा बोल्ड लूक सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

करिना कपूरच्या या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे झाले तर, तिने खास न्यू इयर पार्टीसाठी ग्रीन स्लिट ड्रेस परिधान केला होता. ज्यात करिना तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. फुल स्लीव्ह व्ही नेक शिमरी ड्रेसमध्ये करिना कपूर सुरेख दिसत असून, हा लूक लाखो चाहत्यांना वेड लावत आहे.

करिनाचा हा एमराल्ड ग्रीन गाउन, एली साबच्या फॉल 2022 कलेक्शनमधील आहे. या ड्रेसला लॉरेल ग्रीन स्ट्रीप्ड सेक्विन ड्रेस असे म्हणतात. या एका ड्रेसची किंमत 2 लाख 35 हजार 748 रुपये इतकी आहे. तिने आकर्षक अॅक्सेसरीजसह सीक्विन ड्रेसला स्टाइल केले आहे.

या ड्रेसवर तिने हलका मेकअप आणि लो बन हेअरस्टाईल कॅरी केली आहे. हाय हिल्स घालून तिने या लूकला पूर्ण केलं आहे. सध्या करिना कपूर पती सैफ अली खान आणि मुलांसोबत लंडनमध्ये नवीन वर्ष साजरी करत आहे.

टॅग्स :करिना कपूरनववर्षफॅशनब्यूटी टिप्स