Join us

Winter Fashion: करिना कपूरचा हा ड्रेस आवडला असेल तर तुम्हीही घेऊ शकता, किंमत अगदीच कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2024 09:15 IST

Kareena Kapoor's Simple White Cotton Kurta: करिना कपूरने नुकत्याच घातलेल्या पांढऱ्या रंगाच्या कुर्ता पायजमाची सध्या खूपच चर्चा आहे. बघा या ड्रेसची नेमकी किंंमत किती..

ठळक मुद्देआता सेलिब्रिटी म्हटल्यावर आणि त्यातही करिना कपूरसारखी सुपरस्टार सेलिब्रिटी असल्यावर तिचे प्रत्येक ड्रेसच अव्वाच्या सव्वा किमतीचे असतील असं आपल्याला वाटतं.

बॉलीवूडची एक सुपरस्टायलिश अभिनेत्री म्हणून करिना कपूर ओळखली जाते. असं म्हणतात की करिना तिचे कपडे, तिच्या ॲक्सेसरीज या बाबतीत खूपच चोखंदळ आहे. बऱ्याचदा ती असे कपडे निवडते ज्यामध्ये तिला आरामदायी वाटेल. त्यामुळेच तर करिनाचे बाहेर फिरायला गेली असतानाचे जे काही फोटो व्हायरल होत असतात, त्या बऱ्याच फोटोंमध्ये ती ओव्हरसाईज पण सुपरस्टायलिश लूक देणाऱ्या कपड्यांत दिसते. आता पुन्हा एकदा करिनाच्या अशाच एका ड्रेसची चर्चा सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये तिच्या ड्रेसपेक्षाही त्याची किंमत जास्त चर्चेत आहे. (Kareena Kapoor's Simple White Cotton Kurta)

 

करिना कपूरचे जे फोटो व्हायरल झाले आहेत, त्यामध्ये ती एक पांढऱ्या रंगाच्या सलवार कुर्त्यामध्ये दिसते आहे.

जड ब्लँकेट्स न धुताच स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक- कुबट वास जाऊन होतील नव्यासारखे फ्रेश- सुगंधी

mandarin कॉलर प्रकारातल्या त्या कुर्त्याच्या बाह्या कोपऱ्यापर्यंत लांब असून तो स्लब कॉटन या कपड्यापासून तयार करण्यात आलेला आहे. शुभ्र पांढऱ्या रंगावर काळ्या रंगाचे फ्लोरल हॅण्डब्लॉक प्रिंट करून त्याला अधिक आकर्षक लूक देण्यात आला. हा ड्रेस अयात दाबू या ब्रॅण्ड हाऊसचा असून त्याची किंमत ५, ५०० रुपये एवढी आहे.

 

आता सेलिब्रिटी म्हटल्यावर आणि त्यातही करिना कपूरसारखी सुपरस्टार सेलिब्रिटी असल्यावर तिचे प्रत्येक ड्रेसच अव्वाच्या सव्वा किमतीचे असतील असं आपल्याला वाटतं. पण या ड्रेसची किंमत मात्र त्यामानाने कमीच आहे.

ड्राय झालेले केस फक्त ५ मिनिटांत होतील सिल्की- मुलायम! केसांवर करू लागाल प्रेम, बघा उपाय 

आता ५ हजार रुपयांत एका मध्यमवर्गीय कुटूंबाचा महिन्याचा किराणा, भाजीपाला असा सगळा खर्च भागतो. त्यामुळे त्याच्यासाठी ती रक्कम निश्चितच मोठी आहे. पण काही उच्च मध्यमवर्गीय लोक असेही आहेत की जे ५- ६ हजार रुपयांचे भरजरी कपडे, साड्या लग्नसराई, सणवार या निमित्ताने घेतच असतात. म्हणूनच अशा लोकांना करिनाचा हा ड्रेस आवडला असेल तर तो त्यांना सहज घेता येऊ शकतो आणि तिच्यासारखी फॅशन करता येऊ शकते.   

टॅग्स :फॅशनकरिना कपूरस्टायलिंग टिप्स