lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fashion > जान्हवी कपूरच्या २४ हजारांच्या लिनन साडीचा व्हायरल फोटो, तिची साडी नेसण्याची पद्धतही वेगळीच..

जान्हवी कपूरच्या २४ हजारांच्या लिनन साडीचा व्हायरल फोटो, तिची साडी नेसण्याची पद्धतही वेगळीच..

Janhvi Kapoor's Linen Saree Worth Rs 24k: जान्हवी कपूरचा लिनन साडीतला फोटो पाहून तिच्या काही चाहत्यांना ती एका सुंदर चित्राप्रमाणे दिसते आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2023 02:17 PM2023-09-02T14:17:21+5:302023-09-02T14:18:18+5:30

Janhvi Kapoor's Linen Saree Worth Rs 24k: जान्हवी कपूरचा लिनन साडीतला फोटो पाहून तिच्या काही चाहत्यांना ती एका सुंदर चित्राप्रमाणे दिसते आहे. 

Janhvi Kapoor's stunning look in linen saree worth Rs 24k, look at her unique saree draping style | जान्हवी कपूरच्या २४ हजारांच्या लिनन साडीचा व्हायरल फोटो, तिची साडी नेसण्याची पद्धतही वेगळीच..

जान्हवी कपूरच्या २४ हजारांच्या लिनन साडीचा व्हायरल फोटो, तिची साडी नेसण्याची पद्धतही वेगळीच..

Highlightsकाही जणांनी तर अशीही कमेंट केली आहे की जान्हवी त्या चित्रांमध्ये ज्येष्ठ चित्रकार राजा रवी वर्मा यांनी केलेल्या एखाद्या सुंदर पेंटिंगप्रमाणे दिसते आहे.

फॅशन आणि स्टाईल या बाबतीत जान्हवी कपूरला तोड नाही. आता हळूहळू  बॉलीवूडमधली स्टायलिश अभिनेत्री म्हणून ती ओळखली जात आहे. ट्रॅडिशनल कपडे असो किंवा मग वेस्टर्न कपडे असो... प्रत्येक लूकमध्ये जान्हवी खूप आकर्षक दिसते. शिवाय कपडे कॅरी करण्याची तिची स्टाईलही अफलातून आहे. आता पुन्हा एकदा जान्हवीच्या स्टाईलने नेटिझन्सला आकर्षित केले आहे. तिचे काही फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले असून यामध्ये तिने तब्बल २४ हजार रुपयांची लिनन साडी नेसली आहे. (Janhvi Kapoor's stunning look in linen saree worth Rs 24k)

 

जान्हवीने नेसलेली लालसर गुलाबी रंगाची साडी Anavila या ब्रॅण्डची असून साडीचे काठ चंदेरी रंगाचे आहेत. जान्हवीने ही साडी अतिशय वेगळ्या पद्धतीने नेसली आहे. ब्लाऊज न घालता तिने ती छातीभोवती गुंडाळली आहे.

ओठ काळवंडले आणि भेगाही पडल्या २ उपाय, भेगा गायब आणि ओठ होतील मऊ- गुलाबी 

मॉडर्न आणि इथनिक असे दोन्ही प्रकार तिच्या या लूकमध्ये दिसून येतात. या लूकवर तिने कोणतेही दागिने घातलेले नाहीत. शिवाय मेकअपही अगदीच लाईट पिंक शेडमध्ये केलेला आहे. मोकळे केस आणि त्या केसांवर माळलेली गुलाबी फुले जान्हवीला अधिकच आकर्षक लूक देणारी ठरली आहेत.

 

जान्हवीचे अशा लूकमधले फोटो पाहून तिचे चाहते मात्र तिच्या दिसण्याचे आणि तिच्या स्टाईलचे जबरदस्त कौतूक करत आहेत.

रेस्टॉरंटस्टाईल ओनियन सलाड! कांदा नुसताच तोंडी लावण्यापेक्षा असं काही चटपटीत करा- खाणारे होतील खुश

काही जणांनी तर अशीही कमेंट केली आहे की जान्हवी त्या चित्रांमध्ये ज्येष्ठ चित्रकार राजा रवी वर्मा यांनी केलेल्या एखाद्या सुंदर पेंटिंगप्रमाणे दिसते आहे. अवघ्या काही तासांतच जान्हवीच्या या फोटोंना शेकडो लाईक्स मिळाले आहेत. 

 

Web Title: Janhvi Kapoor's stunning look in linen saree worth Rs 24k, look at her unique saree draping style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.