Join us

जान्हवी कपूरचा चमचमता नारंगी ‘इलेक्ट्रिफाइंग’ लेहेंगा! सिक्विन, डार्क रंग आवडत असतील तर जान्हवीची स्टाइल पाहाच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2022 16:59 IST

Stunning Look of Janhvi Kapoor: जान्हवी कपूरच्या या घेरदार, चमचमत्या लेहेंग्याची सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. बघा तिचा हा लेहेंगा आहे तरी कसा..

ठळक मुद्देएरवी अशा भडक रंगाचे कपडे घेणं आपण टाळतो. पण जान्हवी मात्र त्या लेहेंग्यामध्ये खरोखरच अतिशय बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे. 

फॅशन सेन्सच्या बाबतीत अभिनेत्री जान्हवी कपूरचं (Janhvi Kapoor) नाव नेहमीच अग्रेसर असतं. वेस्टर्न असो किंवा इंडियन... कोणताही ड्रेस कॅरी करण्याची तिची स्टाईल आणि कॉन्फिडन्स बघण्यासारखा असतो. आता सध्या जान्हवीचा असाच एक लूक जबरदस्त व्हायरल झाला आहे. यामध्ये तिने गडद नारंगी रंगाचा लेहेंगा घातला असून या लेहेंग्याची चमक एवढी जास्त आहे की अनेक ठिकाणी त्याचं वर्णन ‘इलेक्ट्रिफाइंग’ असं करण्यात आलं आहे. एरवी अशा भडक रंगाचे कपडे घेणं आपण टाळतो. पण जान्हवी मात्र त्या लेहेंग्यामध्ये खरोखरच अतिशय बोल्ड आणि ग्लॅमरस (Janhvi Kapoor's orange coloured glittery, sequin lehenga) दिसते आहे. 

 

कसा आहे जान्हवीचा लेहेंगा?जान्हवीचा लेहेंगा, त्यावरचं ब्लाऊज आणि ओढणी असं तिन्ही गडद नारंगी रंगातलं आहे. लेहेंग्याची ओढणी लेहेंगा आणि ब्लाऊजलाच ॲटॅच असून ती वेगळी कॅरी करण्याची गरज नाही.

कवठाची चटकमटक आंबटगोड चटणी, झटपट ५ मिनिटांत तयार, बघा चटकदार रेसिपी

तिचा लेहेंगा नियॉन मटेरियलचा होता आणि शिवाय तो अतिशय कळीदार असल्याने खूपच घेरदार झाला होता. नियॉन मटेरियलचा असल्याने तो पुर्णपणे फुलून गेलेला दिसत होता. शिवाय ओढणी, ब्लाऊज आणि लेहेंगा अशा संपूर्ण ड्रेसवरच भरगच्च सिक्विन वर्क करण्यात आलेले आहे. त्यामुळे मुळातच गडद, ब्राईट रंगाचा असणारा तिचा लेहेंगा सिक्विन वर्कमुळे आणखीनच चमचमता झाला आहे. 

 

जान्हवीने घातलेला हा लेहेंगा सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अमित अग्रवाल यांच्या कलेक्शनमधला असून नुकत्याचा पार पडलेल्या एका फॅशन शो मध्ये तिने तो घातला होता. या शोमध्ये ती शो स्टॉपरच्या भुमिकेत होती.

कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवायचे तर रोज खा ५ गोष्टी; तज्ज्ञ सांगतात हार्टवरचा ताण कमी करायचा तर..

लेहेंग्याचा रंग भडक असल्याने तिने त्यावर अतिशय सोबर आणि लाईट शेडमधला मेकअप केला होता. तसेच हातात फक्त एकच अंगठी घातली होती. एकंदरीतच जान्हवीचा हा लूक अतिशय बोल्ड आणि आयकॅची ठरला होता. 

 

टॅग्स :फॅशनजान्हवी कपूर