Join us

अबब ! अथियाच्या लग्नाचा शाही लेहेंगा तयार करण्यासाठी लागले तब्बल १०,००० तास ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2023 15:07 IST

Athiya Shetty's Royal Wedding Lehenga : बॉलिवूड मधील अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या लग्न सोहोळ्यांची जितकी चर्चा होते तितकीच चर्चा त्यांच्या लग्नाच्या कपड्यांची होते.

बॉलिवूड मधील अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या लग्न सोहोळ्यांची बात काही औरच असते. यांच्या लग्न सोहोळ्यांचे वर्णन करताना बिग फॅट वेडिंग किंवा शाही लग्न सोहोळा अश्याच शब्दांत वर्णन करावे लागेल. कुणी सातासमुद्रापार डेस्टिनेशन वेडिंग करत तर कुणी मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत रॉयल लग्न करतात. यांच्या लग्न सोहोळ्यांची जितकी चर्चा होते तितकीच चर्चा त्यांच्या लग्नाच्या कपड्यांची होते. आपल्यासारख्या सामान्य माणसाचे संपूर्ण लग्न पार पडेल इतक्या किमतीचा तर त्यांचा एक शाही कपड्यांचा जोड असतो. बॉलिवूड अभिनेत्री आणि सुनील शेट्टी यांची कन्या अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर खूप जोरदार चर्चा आहे.

अथियाने लग्नाच्याच दिवशी संध्याकाळी आपल्या या खास क्षणांचे फोटो इंस्टाग्राम वरून आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. फोटोमध्ये अथिया शेट्टी आणि केएल राहुल या दोघांचाही लूक एकदम जबरदस्त दिसत आहे. फोटोंमध्ये दोघेही आनंदी दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून केएल राहुल आणि अथिया शेट्टी हे एकमेकांना डेट करत होते. सतत यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. शेवटी अथिया आणि केएल राहुल यांचा शाही विवाह सोहळा पार पडलाय. अत्यंत खासगी पध्दतीने यांचे लग्न खंडाळ्यामध्ये पार पडले आहे. खास पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा पार पडला(Athiya Shetty's Royal Wedding Lehenga).

अथियाच्या लग्नाचा लेहेंगा बनवायला लागले तब्बल १०,००० तास...  अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी विवाह सोहळ्यामध्ये पिंक फिकट रंगाचे आउट्फिट घातल्याचे दिसत आहे. अथियाचा लेहेंगा संपूर्ण जरदोसी वर्कने भरलेला असून हा लेहेंगा पिंक पेस्टल शेडमधील ओल्ड रोज रंगाचा आहे. या लेहेंग्यावर जरदोसी वर्क सोबतच हलक्या मेटॅलिक रंगांच्या शेड्स देण्यात आल्या आहेत. अथियाने परिधान केलेला लेहेंगा सिल्कचा असून त्या दुपट्ट्यावर हेव्ही वर्क केले आहे. तिने या लेहेंग्यावर मॅचिंग असा पेस्टल शेडचाच ब्लाऊज घातला आहे. तिचा दुपट्टा सिल्क ओर्गेंजा मटेरियलने बनला आहे. अथियाच्या लेहेंग्यावरील जरदोसी वर्क हे हॅण्डमेड म्हणजेच हातांनी कारीगरी केलेले आहे. हा लेहेंगा तयार करताना कारागिरांना तो संपूर्ण बनवून तयार करण्यासाठी तब्बल १०,००० तास लागल्याचे सांगितले जात आहे. सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर अनामिका खन्ना यांनी अथियाच्या लग्नाचा लेहेंगा डिझाईन केला आहे. अथियाने आपल्या लेहेंग्याला फरफेक्ट मॅच होईल असा न्यूड मेकअप करणे पसंत केले आहे. अथिया न्यूड, लाइट व अतिशय मिनिमल मेकअपमध्ये देखील उठून दिसत आहे. गळ्यात पांढऱ्या पारदर्शक रुबीच्या स्टोनचा हार, माथ्यांवर बिंदी, कानात साजेसे असे कानातले असा साज घालून आपला वेडिंग लूक पूर्ण केला आहे. 

अथियासोबतच केएल राहुल याच्यादेखील वेडिंग लूकची चर्चा...  

क्रिकेटर केएल राहुल यानेसुद्धा अथियाच्या कपड्यांना परफेक्ट मॅच होईल अशा कपड्यांची निवड केली आहे. अभिनेत्री अथियासोबतच क्रिकेटर केएल राहुल याने परिधान केलेल्या कपड्यांचीदेखील तितकीच चर्चा आहे. केएल राहुल याने लाईट पेस्टल शेडमधील शेरवानी घालून अथियासोबत पेअरिंग केले आहे. लाइड आणि न्यूड शेडमधील कपड्यात केएल राहुल सुद्धा उठून दिसत आहे. केएल राहुल ने शेरवानीला साजेसा असा दुपट्टा घेऊन मॅचिंग मोजडी पायात घातली आहे. गळ्यांत हिरव्या रंगाच्या माळ घालून त्याने आपला वेडिंग लूक पूर्ण केला आहे.

टॅग्स :फॅशनसेलिब्रिटी