गेल्या वर्षभरात सीक्वेंस वर्क असणाऱ्या साड्यां फार ट्रेंडिंगमध्ये (How to Care For Sequin Saree) होत्या. सीक्वेंस वर्कच्या साड्या ही आजकाल सगळ्याच तरुणींची पहिली पसंती झाली आहे. आजकाल प्रत्येकीच्या वॉर्डरोबमध्ये एक ना एक तरी सिक्वेन्स साडी ही असतेच. कोणत्याही खास प्रसंगी, लग्नसमारंभ किंवा एखाद्या पार्टीला आपण ही सीक्वेंस वर्क असणारी साडी तुम्हाला सुंदर, आकर्षक (How To Preserve Your Sequin Fabric) आणि ग्लॅमरस लूक देते. सीक्वेंस वर्कच्या साड्या दिसायला जितक्या मोहक, नाजूक आणि आकर्षक असतात तितकीच त्यांची काळजी देखील घ्यावी लागते(How To Wash And Care For Clothes With Sequins).
कोणताही कपडा घातल्यानंतर तो धुणे आवश्यक आहे, जेणेकरून कपड्यावरील डाग आणि दुर्गंधी दूर होईल. त्याचप्रमाणे, साडी देखील वेळोवेळी धुवून स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे, परंतु आपण सर्व साड्या एकाच (How to Clean & Store Sequins Saree) प्रकारे धुवू शकत नाही. काही साड्यांचे प्रकार असे असतात की जे धुताना त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. काही साड्यांवरचे हँडवर्क, डिजाईन, नक्षीकाम, धागावर्क हे इतके नाजूक असते की अशा साड्या धुताना त्या अतिशय काळजीपूर्वक धुवाव्या लागतात. सिक्वेन्स साडीवरील वर्क हे देखील अतिशय नाजूक प्रकारातील असते त्यामुळे या साड्या नेमक्या कशा धुवून स्वच्छ ठेवाव्यात ते पाहूयात. सिक्विन साडी धुताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून साडी खराब होणार नाही(How to wash & maintain your precious Sequins Sarees).
१. सिक्विन साडी कशी स्टोअर करुन ठेवावी ?
सिक्विन साडी कपाटात ठेवण्यापूर्वी ती व्यवस्थित फिक्स करा. फिक्सिंग करताना, साडीवरील टिकलीचे अनुक्रम एकमेकांना चिकटलेले नाहीत हे सर्वात आधी तपासून घ्यावे. आता सिक्विन साडी एका पेपरमध्ये घडी करुन ठेवा. साडी सुती कापडाच्या पिशवीत स्टोअर करुन ठेवा. साडी नेहमी सरळ स्थितीत ठेवा जेणेकरून सेक्विन दाबले जाणार नाहीत आणि खराब होणार नाहीत. साडी दुमडून ठेवू नका, कारण यामुळे त्यावरील वर्कवर दबाव येऊ शकतो आणि ते तुटू शकतात. तसेच हँगरवर टांगणे टाळा. तुम्ही ही साडी एअरटाईट बॅग किंवा पिशवीमध्ये देखील ठेवू शकता. काही वेळाने तुमच्या सीक्वेन्स वर्क साडीचा फोल्डिंग पॅटर्न बदला. जर साडी बराच वेळ त्याच पॅटर्नमध्ये दुमडलेली राहिली तर त्यामुळे घडीच्या ठिकाणी साडी फाटू शकते.
२. सिक्विन साडीला इस्त्री कशी करावी ?
सीक्वेन्स वर्क साडीला थेट इस्त्री करणे धोकादायक ठरू शकते. साडी नेहमी उलटी करा आणि मऊ पृष्ठभागावर पसरवा आणि मगच इस्त्री करा. शक्यतो इस्त्रीचे तापमान कमी प्रमाणात ठेवा. जर साडीचे फॅब्रिक नाजूक असेल तर पातळ सुती कापड साडीवर घालून मग त्यावरुन इस्त्री फिरवा. अशा प्रकारे साडीला इस्त्री केल्यास साडीवरील सेक्विनचे नुकसान होणार नाही.
ब्रायडल लेहेंगा खरेदी करताना हे ६ रंग नक्की पाहाच, दिसाल सुंदर - मिळेल परफेक्ट नववधू लूक!
३. सिक्विन साडी कशी सुकवायची ?
१. सिक्विन साडी सुकविण्यासाठी वॉशिंग मशिनच्या ड्रायरचा वापर करु नका. यामुळे आपली संपूर्ण साडी खराब होईल. २. साडी सावलीत किंवा पंख्याच्या हवेखाली वाळवा. ३. साडी वाळण्यासाठी दोरीवर न लटकवता त्याऐवजी, ती टेबलावर पसरुन वाळत घाला.
४. सिक्विन साडी धुण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती ?
१. सिक्विन साडी धुण्यासाठी आपण सौम्य डिटर्जंट किंवा वॉशिंग सोल्यूशनचा वापर करु शकतो. सिक्विन साडी धुण्यासाठी साबण वापरु नये. चुकूनही साडीवर साबण घासू नये यामुळे साडीवरचे वर्क खराब होण्याची शक्यता असते. २. सिक्विन साडीला सौम्य सोल्युशन आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये ५ ते १० मिनिटे भिजवून ठेवावे.३. शेवटी साडी स्वच्छ पाण्याने धुवा. ४. साडी धुताना ती ब्रशने घासू नका किंवा चोळू नका. फक्त वाहत्या पाण्याखाली ठेवा.
५. सिक्विन साडी धुण्यासाठी पाणी कसे वापरावे ?
सिक्विन साड्या धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नये. या प्रकारच्या साड्या धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करावा. गरम पाणी वापरल्याने सिक्विन साडीवरील डिजाईन लवकर खराब होण्याची शक्यता असते. फक्त सिक्विनच नाही तर गरम पाण्याने धुतल्याने इतर प्रकारचे फॅब्रिकही खराब होते. ज्यामुळे साडी फाटू शकते. यासाठीच चुकूनही गरम किंवा कोमट पाण्याने साडी धुवू नये. शक्यतो थंड पाण्याचा वापर करावा. अतिशय नाजूक वर्क असलेले कपडे किंवा साड्या वॉशिंग मशीनमध्ये धुतल्याने काहीवेळा खराब होतात. यामध्ये सिक्वेन्स साडीचाही समावेश आहे. जर आपण सिक्विन साडी घरी धुत असाल तर यासाठी वॉशिंग मशीनचा वापर करु नका. सिक्विन साडी हातानेच धुतली पाहिजे. यामुळे साडीवरील सिक्वीन्स खराब होत नाहीत.