ब्लाऊजची फिटिंग अगदी परफेक्ट (How To Tighten a Loose Saree Blouse Without Stitching) असेल तरच तो व्यवस्थित बसतो. आपल्या योग्य मापानुसार जर ब्लाऊजचे फिटिंग असेल तर अशा ब्लाऊजमुळे आपल्याला छान लूक येतो. काहीवेळा आपल्या ब्लाऊजची फिटिंग इतकी बिघडते किंवा माप चुकते की असा व्यवस्थित फिटिंग नसलेला ब्लाऊज घालण्याची इच्छाच होत नाही(How to tighten your blouse in a second without any stitch).
ब्लाऊजचे माप किंवा फिटिंग चुकले तर तो लूज किंवा टाईट होतो. असेच ब्लाउज काहीवेळा खांदयांतून उतरतो किंवा सैल होतो. अशावेळी सतत हा ब्लाऊज आपल्याला हाताने वर ओढत बसावे लागते. याचबरोबर, आपण अशा सैल झालेल्या ब्लाऊजला टाके घालून फिटिंग करतो. परंतु जर अगदीच आयत्यावेळी ब्लाऊज घालायचा आहे आणि फिटिंग (How To Fix a Loose Blouse without stitching) करत बसायला पुरेसा वेळ नसेल तर आपण काही साध्यासोप्या टिप्सचा वापर करून हे खांद्यातून सतत उतरणारे सैल झालेले ब्लाऊज योग्य पद्धतीने फिटिंग करु शकतो.
ब्लाऊज सैल झालं - खांद्यावरुन उतरत यासाठी सोप्या टिप्स...
१. नेकलेसचा असा करा वापर :- खांद्यावरुन उतरणाऱ्या किंवा सैल झालेल्या ब्लाऊजला फिटिंग करण्यासाठी आपण नेकलेसचा वापर करु शकता. यासाठी ब्लाऊजच्या रंगाला मॅचिंग असा एखादा नेकलेस घ्यावा. मग या दोन्ही नेकलेसच्या टोकांना सेफ्टीपीन लावून हा नेकलेस ब्लाऊज च्या दोन्ही खांदयावर लावून घ्यावा. या नेकलेसमुळे ब्लाऊजला एक छान लूक येईल तसेच तो खांद्यावरून सतत खाली उतरणार देखील नाही.
पांढऱ्या किंवा चिकनकारी कॉटन पारदर्शक कपड्यांतून ब्रा दिसते? ४ टिप्स- बिंधास्त घाला आवडीचे कपडे...
२. स्टायलिश नॉट किंवा दोरी लावा :- ब्लाऊज खांद्यावरुन खाली उतरु नये म्ह्णून ब्लाऊजला मागच्या बाजूने डिझायनर नॉट किंवा दोरी लावू शकतात. तसेच जर का तुम्हाला एक नॉटने पर्फेक्शन वाटत नसेल तर तुम्ही या ब्लॉउजला दोन तीन नॉट देखील लावू शकतात. ज्यामुळे ब्लॉउज मागच्या बाजूने सुंदर दिसेल आणि तुम्हाला ब्लॉउज लूज आहे असे वाटणार नाही.
३. पारदर्शक ब्रा स्ट्रिप्स वापरा :- ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित नसली की तो खांद्यावरून खाली पडत राहतो आणि एका जागी व्यवस्थित राहत नाही. यासाठी तुम्ही ट्रान्स्परन्ट ब्रा स्ट्रिप्स वापरू शकता. तसेच हे स्ट्रेप्स ब्लॉऊजला लावताना त्याचे पट्टे तुमच्या आकारानुसार सेट केले पाहिजेत आणि ब्लाऊजला लावले पाहिजेत ज्यामुळे ब्लॉऊजची फिटिंग परफेक्ट दिसेल. अशातच तुमच्याकडे जर का हे ट्रान्स्परन्ट स्ट्रेप्स नसतील तर तुम्ही याला सेप्टीपिन देखील लावू शकतात. यामुळे ब्लॉऊज खांद्यावरून लूज होणार नाही.
पांढरे केस नो टेंशन! ‘या’ ३ रंगाचे ड्रेस घाला- पांढऱ्या केसांकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही...
४. जॅकेटचा वापर करा :- जर ब्लाऊज खांद्यावरून सारखा उतरत असेल तर तुम्ही जॅकेटचा वापर करु शकता. या जॅकेटमुळे तुमचा ब्लाऊज खांद्यावरून खाली उतरणार नाही. तसेच जॅकेटमुळे ब्लाऊजला अधिक चांगला लूक येईल.
५. सेफ्टीपीन :- हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त १ सेफ्टीपिन लागणार आहे. यासाठी छातीच्या समोरच्या भागातील थोडे ब्लाऊज दुमडून घ्या आणि नंतर ते ब्लाऊज तुमच्या ब्रासोबत पिनअप करून घ्या. ब्लाऊज जरा जास्तच सैल असेल तर खांद्याच्या थोडं खालच्या भागात समोरच्या दोन्ही बाजूंनी ब्लाऊजला अढी घालून ते दुमडून घ्या आणि दोन्ही बाजूंनी ब्रा सोबत पिनअप करून घ्या.
६. बांगडीचा असा करा वापर :- ब्लाऊज पोटाजवळ सैल होत असेल तर बांगडी वापरूनही ते परफेक्ट फिटिंगचं करता येतं. शिवाय ब्लाऊजला एक छान स्टायलिश फॅशनेबल लूक मिळतो. यासाठी ब्लाऊजच्या मागच्या भागात मधोमध एक बांगडी आतल्या बाजुने ठेवा आणि तिला ब्लाऊजच्या रंगाशी मिळतंजुळतं असणारं रबरबॅण्ड अगदी घट्ट लावून टाका.