सध्या हिवाळा सुरू आहे आणि त्यातही थंडीचा कडाक खूप वाढलेला आहे. त्यामुळे घराबाहेर तर स्वेटर, शाल घेतल्याशिवाय पडता येतच नाही. पण घरातही उबदार कपडे घालून बसावं लागत आहे. पुर्वी विणकाम, भरतकाम केलेल्या सुंदर शाली अंगावर घेण्याचा ट्रेण्ड होता. पण आता मात्र ती फॅशन मागे पडली आहे. कारण हल्ली स्वेटर, जॅकेट यांच्यामध्ये कित्येक आकर्षक प्रकार मिळत आहेत. म्हणूनच आता ही एक भन्नाट ट्रिक पाहा आणि तुमच्या कपाटातल्या वापरात नसलेल्या सगळ्या शाली बाहेर काढा..(how to stitch winter jackets, cardigan from old shawl?) बघा नेमकं काय करायचं..(how to stitch winter jackets?)
जुन्या शालींपासून स्वेटर, जॅकेट कसे शिवावे?
ज्या शालींवर छान कलाकुसर केलेली आहे आणि ज्या खरोखरच आकर्षक आहेत त्या शालींपासून तुम्ही अशा पद्धतीचे आकर्षक विंटर जॅकेट तयार करून घेऊ शकता. शाल अंगावर घेणं आणि ती सांभाळत बसणं खरोखर कठीण आहे.
रोजच्याच भाजी, वरणालाही येईल अफलातून चव! ५ सोप्या ट्रिक्स, सगळेच तुम्हाला सुगरण म्हणतील
त्यामुळेच खरंतर शाल वापरण्याचा अनेकींना कंटाळा येतो. त्याला पर्याय म्हणून आता असे कित्येक प्रकारचे कपडे तुम्ही शिवून घेऊ शकता. ही विंटर फॅशन करून तुम्ही जेव्हा चारचौघात जाल तेव्हा अशा स्टायलिश आणि अगदी वेगळ्या धाटणीच्या उबदार कपड्यांमुळे नक्कीच सगळ्यांमध्ये उठून दिसाल.
कॉलेज गोईंग तरुणींमध्ये असे श्रश खूप लोकप्रिय आहे. हे श्रग साधारणपणे मांड्यांपर्यंत लांब असते आणि समोरच्या बाजुने त्याला बटन, चेन असं काही नसतं.
टॅनिंगमुळे चेहरा काळा पडला? घ्या जायफळाचा सोपा उपाय- १५ मिनिटांत टॅनिंग, डेडस्किन गायब
हे श्रग जीन्स, टीशर्टवर घालायला खूप छान वाटतात. एखादी अशी सुंदर काठ असणारी प्लेन शाल असेल तर तिच्यापासून तुम्ही असं श्रग शिवून घेऊ शकता.
जुन्या शाली उपयोगात आणण्याचा हा एक खूप चांगला पर्याय असून यामुळे तुमच्याकडचं विंटर फॅशन कलेक्शनही निश्चितच वाढणार आहे.
