सणवाराचे दिवस किंवा एखादा खास कार्यक्रम, प्रसंग असला की आपण ठेवणीतले चांगले कपडे घालतो. शक्यतो ठेवणीच्या कपड्यात भरजरी, काठापदराच्या साड्या, ड्रेसेस, हेव्ही वर्क किंवा नक्षीकाम (How to save Saree & dupatta from Safety Pins) केलेल्या ओढण्या असे सगळे महागडे कपडे असतात. महागड्या - भरजरी साड्या, ड्रेस आपण मोठ्या हौसेने घालतो खरे परंतु वजनाने जड असणारे असे कपडे सावरणं म्हणजे मोठं अवघड काम असते(Safety pin hacks you need to know).
भरजरी साडीचा पदर किंवा हेव्ही वर्क असणाऱ्या ओढण्या सहजपणे सावरता याव्यात यासाठी आपण सेफ्टी पिन लावून त्या पिनअप करतो. परंतु अशा प्रकारे पिनअप केल्याने काहीवेळा साड्यांचे पदर - ओढण्या यात हा सेफ्टी पिन अडकून बसतो. इतकंच नव्हे तर हा पिन व्यवस्थित काढला नाही तर महागड्या साड्या - ओढण्या फाटण्याची शक्यता असते. अशावेळी अशा महागड्या - भरजरी कपड्यांना सेफ्टी - पिन लावल्याने ते फाटू नये किंवा पिन अडकून राहू नये यासाठी नेमकी कोणती काळजी घ्यावी ते पाहूयात. . महागड्या साड्या आणि ओढणीवर सेफ्टी पिन लावण्याची योग्य पद्धत पाहूयात.
१. रंगीत बटणांचा वापर :- महागड्या कापडावर छिद्र पडू नये म्हणून आपण रंगीत बटणांचा वापर करू शकता. यासाठी सेफ्टी पिनमध्ये बटण ओवून घ्या. आता कोणत्याही कापडावर सेफ्टी पिनचा वापर करा. यामुळे सेफ्टी पिन कापडात अडकून कापड फाटणार नाही.
२. मोती :- सेफ्टी पिन पदर किंवा ओढणीमध्ये अडकत असेल तर, आपण मोत्यांचा वापर करु शकता. यासाठी पदर किंवा ओढणीला सेफ्टी पिन लावण्यापूर्वी सेफ्टी पिनमध्ये मोती ओवून घ्यावा. यामुळे सेफ्टी पिनमध्ये पदर किंवा ओढणी अडकून फाटणार नाही.
बॅकलेस ब्लाऊज घालताय? ५ टिप्स, बोल्ड -स्टायलिश लूक मिळेल-दिसेलही सुंदर आणि ग्लॅमरस...
पारंपरिक पैठणीचा मॉडर्न थाट ! आता फ्रॉक - जंपसूट आणि को - ऑर्ड सेटपण पैठणीचे...
३. कागदाचा लहानसा तुकडा :- जर आपल्याकडे आयत्यावेळी बटण किंवा मोती नसेल तर आपण कागदाच्या लहानशा तुकड्याचा वापर करु शकता. यासाठी कापडावर पिन लावण्यापूर्वी सेफ्टी पिनमध्ये कागदाचा तुकडा अडकवून घ्यावा.
४. टिकली :- कपाळावर लावण्यात येणाऱ्या टिकलीचा वापर आपण कापडावर छिद्र पडू नये म्हणूनही करू शकता. यासाठी ज्याठिकाणी सेफ्टी पिनचा वापर कराल त्या ठिकाणी आधी दोन्ही बाजूने टिकली लावा. नंतर सेफ्टी पिन लावा. यामुळे कापडावर छिद्र पडणार नाही. शिवाय फॅब्रिकही खराब होणार नाही.
साडीचे मोठे काठ वापरुन ब्लाऊजला द्या नवा लूक, नेहमीचे ब्लाऊज दिसतील सुंदर आणि आकर्षक...