महागडी साडी दिसायला जितकी सुंदर असते तितकाच छान तिचा ब्लाऊज आपल्याला हवा असतो. ब्लाऊज शिवताना आपण त्याची डिझाइन, मागचा किंवा पुढचा गळा कसा असायला हवा याचा देखील विचार करतो.(rust stains on blouse) सण-समारंभ असो किंवा लग्नकार्य आपण आवडीने महागाच्या साड्या आणि त्यावर डिझायनर ब्लाऊज शिवतो.(remove rust stains from clothes) पण काही दिवसानंतर कपाटातील ब्लाऊज काढल्यावर हुकांना गंज दिसतो. हा गंज केवळ हुक खराब करत नाही तर (blouse hook rust problem) ब्लाऊजच्या कापडावर पिवळसर- तपकिरी डाग पडतो. अशावेळी तो ब्लाऊज पुन्हा घालणं कठीण होते. मग आपल्याला टेलरकडे धाव घ्यावी लागते किंवा नवीन ब्लाऊज शिवण्यासाठी नाहक पैसे खर्च होतात. पण हे डाग घालवण्यासाठी आपण काही सोप्या घरगुती टिप्स लक्षात ठेवल्या तर नवीन ब्लाऊज खरेदी करण्याची गरज भासणार नाही.
ब्लाऊजच्या हुकवर गंज लागला असेल तर तो काढण्यासाठी आपल्याला लिंबाचा रस आणि मीठाची गरज लागेल. गंजलेल्या हुकवर थोडे मीठ घाला आणि त्यानंतर त्यावर लिंबाचा रस पिळा. १० ते १५ मिनिटे तसेच ठेवा. जुन्या टूथब्रशने हळू घासा. ज्यामुळे गंज निघून जाण्यास मदत होईल.
गंजलेल्या हुकामुळे ब्लाऊजवर डाग पडल्यास साबणाने निघत नाही. अशावेळी आपण पांढरे व्हिनेगर वापरु शकतो. डाग असलेल्या भागावर थोडे व्हिनेगर लावा आणि काही वेळ तसेच ठेवा. यानंतर हलक्या हाताने घासून थंड पाण्याने धुवा. शिफॉन किंवा सिल्कची साडी असेल तर आधी लहान भागावर तपासा.
आपला ब्लाऊज नवाकोरा असेल तेव्हा हुकवर पारदर्शक नेलपॉलिश लावा. यामुळे हूक हवा आणि ओलाव्याच्या संपर्कात येत नाही. यामुळे हुकला गंज देखील चढत नाही. ब्लाऊजला गंज लागण्याचे मुख्य कारण म्हणजे ओलावा. पावसाळ्यात किंवा घाम लागलेला ब्लाऊज तसाच कपाटात ठेवण्यापूर्वी कोरडा असल्याची खात्री करा. हुकच्या जागी टिश्यू पेपर किंवा जुन्या वर्तमानपत्राचा तुकडा ठेवा, ज्यामुळे ओलावा शोषला जाईल.
