Join us

गौराईच्या सणाला केसांत माळा गुलाब पाकळ्यांचा देखणा गजरा, पाहा गजरा करण्याची सोपी पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2025 17:57 IST

How to Make Rose Petal Garland or Gajra: गुलाब पाकळ्यांचा गजरा करण्याची एक अतिशय सोपी पद्धत...

ठळक मुद्देजाई, जुई, चमेली, मोगरा यांचा गजरा आपण नेहमीच माळतो. पण आता मात्र गुलाबाच्या पाकळ्यांचा गजरा लावा.

सणासुदीचे दिवस आले की अनेकजणी हौशीने पारंपरिक वेशभुषा करतात. छान नटतात, सजतात. साड्या नेसून अगदी केसांमध्ये फुलं किंवा गजरासुद्धा माळतात. आता तर घरोघरी गौरी विराजमान होणार आहेत. त्यामुळे हळदी- कुंकू, गौरींच्या दर्शनासाठी जाणे हे सगळे कार्यक्रम ओघाने आलेच. या कार्यक्रमांसाठी छान तयार झाल्यावर यंदा केसांमध्ये गुलाब पाकळ्यांचा छानसा लाल- गुलाबी रंगाचा गजरा माळा. एरवी जाई, जुई, चमेली, मोगरा यांचा गजरा आपण नेहमीच माळतो. पण आता मात्र गुलाबाच्या पाकळ्यांचा गजरा लावा. सगळ्याजणी तुमच्या गजऱ्याचं कौतूक करतील.(How to Make Rose Petal Garland or Gajra?)

 

गुलाब पाकळ्यांचा गजरा कसा तयार करायचा?

गुलाब पाकळ्यांचा गजरा तयार करण्यासाठी आपल्याल गुलाबाच्या देठांचे थोडे तुकडे आणि गुलाबाच्या भरपूर पाकळ्या लागणार आहेत.

ज्येष्ठा- कनिष्ठा गौरींसाठी झटपट तयार करा सुंदर बॅकड्रॉप- ७ डेकोरेशन आयडिया, आरास होईल मस्त

गजऱ्यासाठी पाकळ्या निवडताना त्या आकाराने मोठ्या तसेच अगदी गडद गुलाबी रंग असणाऱ्या निवडाव्या. लहान आकाराच्या पाकळ्या घेणे टाळा.

तसेच ज्या पाकळ्या कडांना काळ्या होत चाललेल्या आहेत किंवा सुकत चालल्या आहेत त्या घेणं टाळा. कारण असा गजरा लगेच सुकून जातो.

 

आता एक मोठी सुई घ्या. त्यात दोरा ओवल्यानंतर सुरुवातीला पाकळ्या ओवण्याच्या आधी गुलाबच्या देठाचे २- ३ छोटे तुकडे करून ते ओवून घ्या. यामुळे पाकळ्या गळून पडणार नाहीत आणि खालच्या पाकळीला चांगला बेस मिळेल.

गणपतीला वाहिलेल्या फुलांचं काय करायचं? निर्माल्यापासून घरीच तयार करा ‘असं’ खत, बाग फुलेल छान

यानंतर पाकळी उभी धरा. ती मधोमध दाबा. मधोमध दाबल्यानंतर तिचा वरचा आणि खालचा भाग एकमेकांना जोडल्या जाणार नाही, एकमेकांपासून दूर होईल अशा पद्धतीने त्या जोडा. त्यानंतर ती अलगदपणे सुईमध्ये ओवून घ्या. अशाच पद्धतीने एकेक पाकळी ओवली की गुलाब पाकळ्यांचा गजरा झाला तयार. यामध्ये तुम्ही मधे थोडी हिरवीपाने किंवा निशिगंधाची फुलंही घालू शकता. 

टॅग्स :फॅशनफुलं