Lokmat Sakhi >Fashion > जुन्या ब्रा पॅडपासून बनवा ट्रेंडी हेअर बन, सुंदर हेअरस्टाइल झटपट करण्याची एक सोपी ट्रिक

जुन्या ब्रा पॅडपासून बनवा ट्रेंडी हेअर बन, सुंदर हेअरस्टाइल झटपट करण्याची एक सोपी ट्रिक

trendy hair bun : old bra pads hairstyle hack: quick hairstyle tricks: ब्रा जुनी झाल्यानंतर आपण फेकून देतो. पण थोडा विचार केला तर त्या पॅडपासून आपण भन्नाट हेअर बन बनवू शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2025 15:41 IST2025-08-26T15:40:25+5:302025-08-26T15:41:00+5:30

trendy hair bun : old bra pads hairstyle hack: quick hairstyle tricks: ब्रा जुनी झाल्यानंतर आपण फेकून देतो. पण थोडा विचार केला तर त्या पॅडपासून आपण भन्नाट हेअर बन बनवू शकतो.

how to make a stylish hair bun using old bra pads quick and easy hair bun hack at Home eco-friendly DIY hair accessories ideas | जुन्या ब्रा पॅडपासून बनवा ट्रेंडी हेअर बन, सुंदर हेअरस्टाइल झटपट करण्याची एक सोपी ट्रिक

जुन्या ब्रा पॅडपासून बनवा ट्रेंडी हेअर बन, सुंदर हेअरस्टाइल झटपट करण्याची एक सोपी ट्रिक

सणसमारंभ म्हटलं की सगळीकडे आनंदाचे वातावरण. पण या आनंदासोबत जगण्याची मज्जा देखील वेगळी असते. नवीन कपडे, सुंदर दागिने आणि त्याला शोभेल अशी हेअरस्टाईल हा प्रत्येक मुलीचा आवडता भाग असतो.(easy hair bun ideas) मात्र, प्रत्येक वेळी पार्लरला जाऊन महागडे हेअरस्टाईल करून घेणे सगळ्यांना शक्य होत नाही.(hair styling hacks) म्हणूनच आज आपण एकदम वेगळा, पण क्रिएटिव्ह उपाय पाहणार आहोत – तो म्हणजे जुन्या ब्रा पॅडपासून बनवलेला हेअर बन. (eco-friendly hairstyle ideas)
साधारणत: ब्रा जुनी झाल्यानंतर आपण फेकून देतो. पण थोडा विचार केला तर त्या पॅडपासून आपण भन्नाट हेअर बन बनवू शकतो.(trendy hair bun) हा हेअर बन आपल्या केसांची शोभा अधिक प्रमाणात वाढवू शकतो.(old bra pads hairstyle hack) 

Ganeshotsav 2025 : मोदकांसाठी उकड कशी काढावी? मोदकांच्या पिठीसाठी कोणता तांदूळ योग्य? लक्षात ठेवा ५ गोष्टी-मोदक परफेक्ट

सणात नऊवारी साडी असो किंवा सलवार- कुर्ती असो. हा स्टायलिश बन ट्रेडिशनल आणि मॉडर्न लूक दोघांवर शोभून दिसेल. केस व्यवस्थिथ गुंडाळून बनमध्ये बसवल्यास चेहऱ्याचा संपूर्ण लूक बदलेल. इतकेच नाही तर हा बन आपण टाकाऊपासून टिकाऊ या पद्धतीने बनवणार आहोत. त्यावर गजरा, हेअरपिन्स किंवा छोटे कृत्रिम फुले, मोत्यांची पिन लावून त्याला हटके स्टायलिश लूक देता येईल. 

या बनचा आपल्या केसांसाठी फायदा म्हणजे तो नीट टाईट राहिल. केस सारखे मोकळे होणार नाही. गणपतीच्या दिवसांत रोज नवे कपडे घालायची मजा तर असतेच, पण त्याचसोबत एक वेगळी हेअरस्टाईल करून पाहण्याची संधीही मिळते. त्यामुळे या वेळी पार्लरचा खर्च न करता स्वतःचा DIY हेअर बन करून बघा. जुन्या ब्रा पॅडपासून बनवलेला हा साधा पण स्मार्ट उपाय आपल्या लूकला नक्कीच चारचांद लावेल!

हा बन बनवण्यासाठी आपल्याला जुन्या झालेल्या ब्रा मधला पॅड काढावा लागेल. याला गोलाकार आकारा व्यवस्थित कापून घ्या. आता ग्लू गनच्या मदतीने ब्रा वर गम लावा. आणि आपल्याकडे असणाऱ्या मोत्यांची लेस त्यावर लावून घ्या. आता आतल्या बाजूने पुन्हा एका ग्लू गम लावून त्यावर केसांची जाळी चिकटवा. आता केसांना गोलाकार पद्धतीने बांधा. त्यावर तयार केलेले बन कव्हर लावा. यामुळे आपला लूक अधिक आकर्षित होईल. 


Web Title: how to make a stylish hair bun using old bra pads quick and easy hair bun hack at Home eco-friendly DIY hair accessories ideas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.