नवरात्र, दसरा, दिवाळी असे एकामागे एक सण आता सुरू होणारच आहेत. दिवाळी सरली की लग्नसराईलाही दणक्यात सुरूवात होतेच. त्यामुळेच मग या दिवसांमध्ये कपाटातल्या भरजरी साड्या बाहेर येतात. यामध्ये एखादी पैठणीही असतेच.. काठपदराच्या सिल्कच्या साड्या एकीकडे आणि पैठणीचा मान दुसरीकडे.. म्हणूनच या लाखमोलाच्या पैठणीला आपणही अगदी जपून जपून वापरतो. अनेकजणींच्या बाबतीत अशी अडचण येते की पैठणीचे काठ काही दिवसांनी काळपट पडत जातात (4 Tips to Maintain Paithani Saree). किंवा त्यांची चमक कमी होत जाते. असं तुमच्या पैठणीच्या बाबतीत होऊ द्यायचं नसेल तर या काही गोष्टींची नक्की काळजी घ्या..(how to maintain shine or glaze on paithani saree?)
पैठणीच्या काठांवरची चमक कमी होऊ नये म्हणून....
१. पैठणी किंवा इतर कोणतीही साडी नेसून तयार झाल्यावर आपण अंगावर, कपड्यांवर परफ्यूम मारतो. पण परफ्यूममध्ये असणारे केमिकल्स सिल्क साड्यांच्या जरीकाठांसाठी चांगले नाहीत. काठ काळे पडू शकतात. त्यामुळे शक्यतो पैठणी नेसल्यावर तिच्यावर परफ्यूम मारण्यापेक्षा अंगाला अत्तर लावा.
अतिशय पौष्टिक असणारे ५ भारतीय पदार्थ- तब्येत राहील ठणठणीत, वजनही वाढणार नाही
२. पैठणी साडी वारंवार रोलप्रेस किंवा ड्रायक्लिन करून ठेवू नका. ती साडी तुम्ही जेव्हा नेसणार असाल तेव्हाच रोलप्रेस किंवा ड्रायक्लिन करून आणा. कारण रोलप्रेस आणि ड्रायक्लिनिंग यामुळेही काठ काळे पडतात. त्यांच्यावरची चमक जाऊन ते धुरकट दिसू लागतात.
३. पैठणी साडी कधीही प्लास्टिकच्या साडी कव्हरमध्ये ठेवू नका. ती नेहमी सुती कपड्यामध्ये गुंडाळून ठेवा. यामुळे साडीला मोकळी हवा लागते. साडीचे सूत आणि तिच्यावरची चमक खराब होत नाही.
अण्णाच्या हॉटेलमध्ये मिळतो तसा जाळीदार डोसा घरीच हवा? पिठामध्ये २ पदार्थ मिसळा- डोसा होईल परफेक्ट
४. पैठणी साडी कधीही इतर साड्यांच्या वर किंवा खाली थेट ठेवू नका. म्हणजेच तिचा थेट स्पर्श इतर साड्यांना होईल अशा पद्धतीने ती ठेवू नका. पांढऱ्या सुती, मऊ कपड्यात ती गुंडाळून ठेवा.