'साडी' नेसायला बऱ्याच स्त्रियांना आवडते. साडी हा सगळ्यांचं महिलांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्या साडी नेसायला आवडत जरी असले तरी सध्याच्या (How To Look Slim in Saree) काळात साडी नेसणे फार होतच नाही. आपल्यापैकी बऱ्याचजणी या नेहमीच्या वापरासाठी सलवार कुर्ता, जीन्स, स्कर्ट असे वेगवेगळ्या प्रकारचे आऊटफिट्स (How to Look Slim in Saree When You Are Fat) घालणेच पसंत करतात. यामुळे साडी नेसणे फारसे (How to wear saree perfectly to look slim) होतच नाही. अशावेळी साडी आपण फक्त एखाद्या सणावाराला किंवा काही खास प्रसंग असेल तरच नेसतो.
आपण अशा प्रकारे कधीतरी साडी नेसणार म्हटल्यावर आपला लूक अगदी परफेक्ट आणि सुंदरच असाला पाहिजे. परंतु आपल्याला रोज साडी नेसण्याची सवय नसल्याने आपण कधीतरी साडी नेसतो आणि काही चुका हमखास करतोच. साडी नेसण्याचा सराव आपल्याला नसल्याने आपल्यामधून काही लहान - मोठ्या चुका होतात ज्यामुळे साडी व्यवस्थित नेसली न जाऊन साडीत आपण जाड दिसतोच. साडी नीट न नेसल्याने ती काहीवेळा खूप फुलून येते किंवा चापून - चोपून बसत नाही. अशा लहान - सहान चुकांमुळे आपण साडीत जाड दिसतो. साडीत जाड दिसू नये यासाठी ती कशी नेसावी, किंवा कोणत्या साडीची निवड करावी ते पाहूयात.
साडीत जाड दिसू नये यासाठी काही खास टिप्स...
१. बॉर्डरलेस साडीची निवड करावी :- मोठ्या बॉर्डरच्या साड्या तुम्हाला हेव्ही लूक देतात. त्यामुळे फक्त पातळ बॉर्डर असलेल्या किंवा मग बॉर्डरलेस साड्यांची निवड करावी. यामुळे साडी नेसल्यावरही तुम्ही साडीत अगदी बारीक दिसाल.
२. स्लिव्हलेस ब्लाऊज टाळा :- साडी नेसल्यावर जाड दिसू नये म्हणून स्लिव्हलेस ब्लाऊज घालणे टाळावे. साडीवर तुम्ही लांब बाह्यांचे किंवा मग थ्री - फोर्थ लेन्थचे हात शिवावेत. जर तुम्ही स्लिव्हलेस किंवा मेघ स्लिव्ह्जचे ब्लाऊज घातले तर तुमचे दंड जाड दिसतील, आणि त्यामुळे तुम्ही जाड दिसू शकता.
पदरावरती जरतारीचा मोर...! अस्सल पैठणी कशी ओळखाल, वापरा या ट्रिक्स - फसगत होणारच नाही...
३. परफेक्ट साडी नेसणे :- साडी नेसताना ती योग्य पद्धतीने नेसणेच गरजेचे असते. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने साडी नेसली तरीही तुम्ही साडीत जाड दिसू शकता. साडी नेसताना जर तुम्ही ती खूप वर नेसली तरीही तुम्ही साडीत जाड दिसू शकता.
४. योग्य साडीची निवड :- सगळ्यात सोपा उपाय म्हणजे साडीची निवड थोडी विचारपुर्वक करावी. ज्या साड्यांचे सूत अगदी मऊ असते, ज्या साड्या खूप फुगत नाही, ज्यांचा कपडा जाड नसतो आणि ज्या साड्या थोड्या सुळसुळ्या असतात अशा साड्या निवडा.
पांढऱ्या किंवा चिकनकारी कॉटन पारदर्शक कपड्यांतून ब्रा दिसते? ४ टिप्स- बिंधास्त घाला आवडीचे कपडे...
५. शेपवेअर घाला :- हायवेस्ट पेटिकोट किंवा शेपवेअर घाला. यामुळे पोटाचा भाग दबल्यासारखा होताे आणि जास्त दिसत नाही.
६. चापूनचोपून साडी नेसू नका :- खूप घट्ट, अगदी चापूनचोपून साडी नेसू नका. थोडी सैलसर साडी नेसा. खूप चापूनचोपून साडी नेसल्यास पोट जरा जास्तच फुगल्यासारखे वाटते.
पांढरे केस नो टेंशन! ‘या’ ३ रंगाचे ड्रेस घाला- पांढऱ्या केसांकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही...