Lokmat Sakhi >Fashion > ब्लाऊज खांद्यावरुन उतरतं, ढगळं-गबाळं दिसतं? झटपट फिटिंग करण्यासाठी ३ सोप्या टिप्स

ब्लाऊज खांद्यावरुन उतरतं, ढगळं-गबाळं दिसतं? झटपट फिटिंग करण्यासाठी ३ सोप्या टिप्स

3 Simple Tips For The Perfect Fitting of Loose Blouse: वेटलॉस करणाऱ्या महिलांना हा अनुभव नेहमीच येतो.. वजन कमी झालं की ब्लाऊज खांद्यावरून ओघळू लागतं...(how to fit loose blouse instantly?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2025 17:53 IST2025-09-18T17:04:12+5:302025-09-18T17:53:42+5:30

3 Simple Tips For The Perfect Fitting of Loose Blouse: वेटलॉस करणाऱ्या महिलांना हा अनुभव नेहमीच येतो.. वजन कमी झालं की ब्लाऊज खांद्यावरून ओघळू लागतं...(how to fit loose blouse instantly?)

how to fit loose blouse instantly, 3 simple tips for the perfect fitting of loose blouse  | ब्लाऊज खांद्यावरुन उतरतं, ढगळं-गबाळं दिसतं? झटपट फिटिंग करण्यासाठी ३ सोप्या टिप्स

ब्लाऊज खांद्यावरुन उतरतं, ढगळं-गबाळं दिसतं? झटपट फिटिंग करण्यासाठी ३ सोप्या टिप्स

Highlightsजे ब्लाऊज खांद्यावरून ओघळत असेल त्या ब्लाऊजला पाठीमागच्या बाजुने खांद्याच्या थोडंसं खाली दोन आकर्षक बेल्ट लावून घ्या.

एरवी कित्येक जणी साड्या नेसत नाहीत. सलवार कुर्ता, जीन्स असेच कपडे त्यांना आरामदायी वाटतात. पण आता मात्र सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत. त्यामुळे मग कपाटातल्या साड्या बाहेर यायला सुरूवात होऊ लागते. मधल्या काळात आपले वजन कमी करण्यासाठीचे प्रयत्न सुरूच असतात. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी जेव्हा एखादी साडी नेसण्यासाठी आपण तिचं ब्लाऊज अंगात घालून पाहातो तेव्हा असं जाणवतं की ब्लाऊज जरा सैल झालेलं आहे आणि ते खांद्यावरून ओघळतं आहे (how to fit loose blouse instantly?). असं जर झालंच तर ते ब्लाऊज पुन्हा तुम्हाला परफेक्ट फिटिंगचं यावं यासाठी काय करायचं ते पाहूया..(3 simple tips for the perfect fitting of loose blouse)

ब्लाऊज खांद्यावरून ओघळत असेल तर काय करावं?

 

१. जे ब्लाऊज खांद्यावरून ओघळत असेल त्या ब्लाऊजला पाठीमागच्या बाजुने खांद्याच्या थोडंसं खाली दोन आकर्षक बेल्ट लावून घ्या. त्या बेल्टच्या खालच्या भागाला छान गोंडे किंवा मग लटकन लावा. जेव्हा तुम्ही ही नॉट बांधून घ्याल तेव्हा ब्लाऊज छान फिटिंगचं दिसेल. ते खांद्यावरून ओघळणार नाही.

नवरात्रीसाठी खमंग उपवास भाजणी करण्याची रेसिपी- आरोग्य आणि स्वाद दोन्हीही जपले जाईल

२. दुसरा उपाय करण्यासाठी तुम्हाला टेलरकडे जाण्याची गरज नाही. हा उपाय करण्यासाठी तुमच्या ब्लाऊजच्या वरच्या हुकचे आणि खालच्या हुकचे जे काजे आहे त्याच्या पुढे एक ते दिड सेमी अंतरावर दोन पिना लावा. आता ब्लाऊजचे हुक काज्यामध्ये लावण्याऐवजी पिनेमध्ये अडकवा. यामुळे ब्लाऊज परफेक्ट फिटिंगचं होईल.

 

३. तिसरा उपाय करण्यासाठी ब्लाऊजच्या खांद्यावरची जी शिलाई असते त्या भागात साधारण अर्धा ते १ सेमी एवढी टीप घरच्याघरी मारून घ्या. हा फक्त १ मिनिटाचा उपाय घरच्याघरी केल्यानेही तुमचं ब्लाऊज अगदी परफेक्ट फिटिंगचं होईल. 
 

Web Title: how to fit loose blouse instantly, 3 simple tips for the perfect fitting of loose blouse 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.