कोणत्याही कार्यक्रमाला जाताना किंवा सणाच्या दिवशी तयार होताना अनेक जणींचं कपडे कोणते घालायचे हे तर पक्कं ठरलेलं असतं. पण त्या कपड्यांवर दागिने कोणते घालावे याबाबतीत मात्र त्या गोंधळून गेलेल्या असतात. कपडे आणि दागिने भलेही खूप सुंदर आणि महागडे असतील. पण कशावर काय घालायचं याची निवड करण्यात तुम्ही चुकलात तर मग मात्र तुमचा पूर्ण लूक बिघडून जातो. म्हणूनच दागिने आणि कपडे यांची निवड परफेक्ट होणं गरजेचं आहे. शिवाय आता मॅचिंग- मॅचिंगचा जमाना गेला (styling tips for jewellery and clothes contrast combinations). ज्यापद्धतीने साड्यांवर कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाऊज ट्रेण्डी आहेत, त्याचप्रमाणे दागिन्यांचंही आहे.(how to choose jewellery colour according to colour of your clothes)
कपडे आणि दागिने यांच्या रंगांचं कॉन्ट्रास्ट मॅच कसं करावं?
आधी अशी फॅशन होती की कपाळावरच्या टिकलीपासून ते पायातल्या चपलेपर्यंत सगळंकाही परफेक्ट मॅच करायचं. पण आता मात्र हा ट्रेण्ड पुर्णपणे बदलला आहे. आता कॉन्ट्रास्ट रंगसंगती अतिशय हिट आहे. दागिन्यांच्या बाबतीतही तीच फॅशन असल्याने दागिने आणि कपडे यांचे रंग निवडताना पुढे सांगितलेले काही कॉम्बिनेशन्स लक्षात ठेवा..
दिवाळीसाठी अंबाडा हेअरस्टाईलचे ७ प्रकार- पारंपरिकता आणि स्टाईल दोन्हीचं मस्त कॉम्बिनेशन
१. जांभळा किंवा पर्पल रंगाचे कपडे तुम्ही घालणार असाल तर त्यावर गुलाबी, पिवळे, हिरवे या रंगाचे दागिने घाला. खूप उठून दिसतील. किंवा हेच कॉम्बिनेशन तुम्ही उलट करू शकता.
२. हिरव्या रंगाचे कपडे असतील तर त्यावर लाल, गुलाबी, वाईन शेड असणारे दागिने ट्राय करून पाहा.
३. गुलाबी, राणी कलर किंवा बेबी पिंक अशा गुलाबी रंगाच्या कोणत्याही शेडच्या कपड्यांवर गुलाबी रंगाचेच दागिने घातले तर ते अजिबात उठून दिसत नाहीत.
दिवाळीसाठी सोन्याचांदीच्या दागिन्यांना घरीच करा पॉलिश, ३ उपाय- दागिने नव्यासारखे लख्खं चमकतील..
या रंगाच्या कपड्यांवर नेहमीच हिरवे, जांभळे, मोरपंखी किंवा काळ्या रंगाचे दागिने घाला.
४. जर पांढरी किंवा मोतिया रंगाची साडी असेल तर त्यावर मोत्याचे किंवा पांढऱ्या स्टोनचे दागिने अजिबात घालू नका. त्यावर हिरवे, निळे, लाल असे दागिने घाला किंवा मल्टीकलर दागिने घाला.