Join us

Wedding Special: लग्नात साडी आणि ड्रेसनुसार ‘अशी’ करा दागिन्यांची योग्य निवड! ५ टिप्स-दिसाल लाखांत एक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2024 18:26 IST

How To Choose Jewellery According To Clothes: कपड्यांची निवड तर आपण करतो, पण त्यानुसार दागिन्यांची निवड कशी करावी हे अनेकदा लक्षात येत नाही. त्यासाठीच या काही खास टिप्स...(simple tips for jewellery selection)

ठळक मुद्देफक्त लग्नसराईसाठीच नव्हे तर एरवी कधीही दागिन्यांच्या बाबतीत तुमचा काही गोंधळ उडालाच तर या काही टिप्स लक्षात ठेवा.

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे लग्नाच्या कोणत्या कार्यक्रमात कोणते कपडे घालावे, याचं प्लॅनिंग अनेकींचं झालेलं असतं. कपड्यांचा चॉईस, कपडे खरेदी, ब्लाऊज किंवा ड्रेसची शिलाई असं सगळं व्यवस्थित होतं. पण चोखंदळपणे निवडलेल्या कपड्यांवर दागिने कोणते घालावेत, हे ठरवताना मात्र खूप तारांबळ उडते. तुमचा लूक कसा दिसणार आहे हे जेवढं तुमच्या कपड्यांवर अवलंबून असतं, तेवढंच ते तुमच्या दागिन्यांवरूनही ठरतं (how to choose jewellery according to clothes?). त्यामुळेच दागिन्यांची निवड अगदी परफेक्ट होणं गरजेचं आहे (jewellery matching ideas with your clothes). फक्त लग्नसराईसाठीच नव्हे तर एरवी कधीही दागिन्यांच्या बाबतीत तुमचा काही गोंधळ उडालाच तर या काही टिप्स लक्षात ठेवा.(simple tips for jewellery selection)

 

कपड्यांनुसार दागिन्यांची निवड कशी करावी?

१. सध्या स्टेटमेंट ज्वेलरीचा खूप ट्रेण्ड आहे. स्टेटमेंट ज्वेलरी म्हणजे गळ्यातलं, कानातलं, अंगठी असं सगळं ठसठशीत असणारे दागिने. हे दागिने लग्नसराईमध्ये छान दिसतात.

 

तळपाय खूपच खरखरीत होऊन काळे पडले? घरीच करा पेडिक्युअर- पाय होतील मऊ, दिसतील सुंदर

तुम्ही जर प्लेन किंवा खूप डिझाईन नसणारी साडी नेसणार असाल तर त्यावर लांब गळ्यातलं घाला. उठून दिसेल.

२. काळ्या रंगाचे कपडे घालणार असाल तर त्यावर मोत्याचे दागिने कायम उठून दिसतात.

 

३. काॅटन, लीनन या प्रकारातली तुमची साडी असेल तर त्यावर ऑक्सिडाईज ज्वेलरी अधिक उठून दिसते.

कशाला महागडी आलं- लसूण पेस्ट विकत घेता? ही रेसिपी पाहून घरीच तयार करा- महिनाभर टिकेल 

४. कॉटन सिल्क, लीनन, शिफॉन या प्रकारच्या साड्यांवर तुम्ही टेरिकोटा ज्वेलरीही घालू शकता. टेरिकोटा ज्वेलरीसुद्धा नेहमीच ट्रेण्डिंग आणि हटके दिसते.

५. सोन्याचे दागिने घालून पुर्णपणे ट्रॅडिशनल लूक करायचा असेल तर एका खाली एक येतील असे ३ ते ४ गळ्यातले घाला. काठपदर साड्यांवर, घागऱ्यावर सोन्याची किंवा रोज गोल्ड ज्वेलरी जास्त शोभून दिसते.

 

टॅग्स :फॅशनस्टायलिंग टिप्सदागिने