Join us

आपल्या ड्रेसला शोभून दिसतील असे चप्पल-सॅण्डल-बुट घालताना गोंधळ उडतो? परफेक्ट फुटवेअरसाठी स्मार्ट टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2024 19:04 IST

How to choose correct footwear according to clothes : Easy Guide on How to Choose the Perfect Pair of Shoes for Any Outfit : How to Choose the PERFECT Shoes for Every Outfit : आऊटफिट्सच्या वेगवेगळ्या प्रकारांनुसार पायांत कोणते सॅण्डल, चप्पल, बूट घालावे ते पहा...

आपल्याला शोभेल असे सुंदरसे आऊटफिट्स घातल्यावर त्यावर मॅचिंग असे चपला - बुट घालणे ओघाने आलेच. महिलांच्या बाबतीत शक्यतो प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या आऊटफिट्सवर (How to Choose the PERFECT Shoes for Every Outfit) शोभून दिसतील असे सॅण्डल- चप्पल - बुट असतातच. एवढंच नव्हे तर काहीजणींकडे चप्पलांचे वेगवेगळे प्रकार असतात. यातील काही ऑफिसवेअर तर काही घरात ( Easy Guide on How to Choose the Perfect Pair of Shoes for Any Outfit) घालण्याच्या तर काही बाहेर घालायच्या असतात. चपलांचे काही प्रकार असे असतात की जे लग्नकार्यात किंवा पार्टीमध्ये घालता येतील असे फंक्शनल प्रकारातले असतात. काहीवेळा आपल्याकडे चपला - बुटांचे इतके प्रकार असतात की नेमकं कोणत्या आऊटफिट्सवर कोणत्या प्रकारातील चपला - बूट शोभून दिसतील हे समजत नाही(How to choose correct footwear according to clothes).

वरवर पाहता चपला- बूट बदलल्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वात असा काय फरक पडणार असे आपल्याला वाटते. पण तुमच्या कपड्यांना परफेक्ट मॅच होणारे फुटवेअर तुम्ही निवडले तर नक्कीच तुम्ही अधिक स्मार्ट- स्टायलिश दिसू शकता. कपड्यांनुसार फुटवेअरची निवड कशी करायची, याविषयीचा एक छानसा व्हिडिओ tanyaharchani या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये कपड्यांनुसार चपला- बुटांची निवड करण्यासाठी काही खास प्रकार सविस्तर पद्धतींनी सांगितले आहेत.

कपड्यांनुसार कशी करायची चपला- बुटांची निवड ?

१. सँडविच मेथड :- सँडविच मेथड या पद्धतीत आपण ज्या रंगाचे टॉप घातले आहे त्याच रंगाचे फुटवेअर घालावे. 

२. एलिमेंट ओरिएण्टेड मेथड :- या पद्धतीमध्ये आपल्या हातात ज्या वस्तू असतील जसे की बॅग, घड्याळ, ब्रेसलेट किंवा इतर काही या वस्तूंच्या रंगाशी मॅचिंग असणारे फुटवेअर घालावे. 

३. इल्युजन मेथड :- इल्युजन मेथड या पद्धतीमध्ये जर तुमची उंची जास्त आहे असा आभास निर्माण करायचा असल्यास आपल्या बॉटमला मॅचिंग असणाऱ्या  रंगाशी मिळते जुळते फुटवेअर घालावे. जर तुम्ही काळ्या रंगाची पॅन्ट किंवा स्कर्ट घातला असेल तर त्याच रंगाची मॅचिंग फुटवेअर घालावी. 

४. कलर पुलिंग मेथड :- कलर पुलिंग मेथड या पद्धतीमध्ये तुमच्या आऊटफिटमधील जो रंग सर्वात उठून दिसतो आहे किंवा जो रंग जास्त हायलाईट होत आहे त्याच रंगाचे आऊटफिट् घालावे. 

प्रत्येकीकडे असायलाच हव्यात अशा ८ 'ब्रेसियर ॲक्सेसरीज,' ब्रा वापरताना होणाऱ्या अडचणी होतील कमी...

‘या’ ९ रंगांच्या साड्या नेसा, साडी स्वस्त असली तरी मिळेल क्लासी-महागडा-श्रीमंत लूक...

 इतरही टिप्स लक्षात ठेवा... 

१. जर तुम्ही क्रॉप, स्लिम फिट ॲन्कल लेन्थ जीन्स किंवा जेगिंन्स घातली असेल तर त्यावर हिल्स, स्निकर्स किंवा फ्लॅट शूज छान वाटतात. 

२. बॉटम मोठी असणारी ॲन्कल लेन्थ पॅण्ट असेल तर त्यावर शूज किंवा स्निकर्स घालू नका. तुमच्या तळपायाचा थोडा भाग दिसेल अशा पद्धतीचे हाय हिल्स सॅण्डल त्यावर छान दिसतील.

३. बॉटम मोठ्या असणाऱ्या बॅगी पॅण्ट घातल्या असतील तर त्यावर खूप बल्की शूज किंवा हिल्स घालू नका. त्यावर स्निकर्स छान दिसतील.

४. मोठा बॉटम असणाऱ्या प्लाझोसोबत नेहमी नाजूक धाटणीच्या हिल्स असणाऱ्या सॅण्डल घालाव्या.

लग्नात भरजरी लेहेंग्यावर शोभून दिसणाऱ्या नोज रिंग्जचे नवे पॅटर्न, नथीपासून नथनीपर्यंत स्टायलिश फॅशन...

टॅग्स :फॅशनस्टायलिंग टिप्स