उन्हाळ्याचे दिवस आले की बच्चे कंपनीला विशेष उत्साह असतो. कारण त्यांना सुट्टी लागणार असते. आता मुलांची सुट्टी म्हटलं की साहजिकच कुठेतरी बाहेर फिरायला जाणं आलंच. पण उन्हाळ्यात बाहेर सहलीला जाताना एकच अडचण येते आणि ती म्हणजे कडाक्याचं ऊन आणि त्यात होणारा घामघाम... या दिवसांत एवढी उष्णता असते की जीव अगदी नकोसा होऊन जातो. उष्णतेला आपण काही करू शकत नाही. पण त्या वातावरणात कसं आरामदायी पद्धतीने राहता येईल हे मात्र आपण ठरवू शकतो. त्यासाठीच कपड्यांचं सिलेक्शन थोडं अचूक व्हायला हवं..(stylish and trendy clothing options for summer trips)
उन्हाळी सहलीला जाताना कोणते कपडे घालणं अधिक सोयीस्कर?
१. सध्या ओव्हरसाईज टी शर्टचा ट्रेण्ड आहे. हा ट्रेण्ड उन्हाळ्यासाठी अगदी परफेक्ट आहे. हे शर्ट अंगात अगदी मोकळेढाकळे वाटतात. त्यामुळे गरमी होत नाही. पण एक मात्र लक्षात ठेवा की शर्टचं कापड कसं आहे ते व्यवस्थित पाहून घ्या. कारण जाडसर कपडा असेल तर तो शर्ट घालून निश्चितच जास्त गरमी होणार.
फक्त १० मिनिटांत घरीच करा विकतसारखे खमंग कुरकुरीत बटाटा चिप्स, शिजवण्याची- वाळवण्याची कटकटच नाही..
२. स्लिव्ह्जलेस प्रकारातले कॉर्ड सेटसुद्धा खूप स्टायलिश वाटतात. कॉटन, रेयॉन प्रकारात मिळणारे कॉर्डसेट तुलनेने बरेच स्वस्त आहेत. अगदी ४०० ते ५०० रुपयांत तुम्हाला उत्तम दर्जाचा स्टायलिश कॉर्ड सेट मिळू शकतो. ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही ते खरेदी करू शकता.
३. तिसरा पर्याय म्हणजे टॉप आणि स्कर्ट. कॉटन, होजियरी किंवा क्रेप प्रकारातले शॉर्ट टॉप आणि त्याखाली मस्त घेरदार स्कर्ट असा लूक केला तर तो दिसेलही मस्त आणि तुम्हाला खूप आरामदायीही वाटेल. त्यामुळे स्कर्ट आणि टॉप असा एखादा तरी ड्रेस सोबत घ्याच..
PCOD त्रास १ महिन्यात कमी करण्यासाठी खा 'हे' पदार्थ, मासिक पाळीच्या तक्रारी होतील दूर..
४. या दिवसांत जीन्सला पुर्णपणे बाद करून टाका. त्याऐवजी बाजारात खूप चांगल्या कॉटन पॅण्ट मिळतात, त्यांचा वापर करा. या पॅण्ट कॅज्युअल आणि फॉर्मल या दोन्ही प्रकारात मिळतात आणि शिवाय खूप स्टायलिश लूक देतात.
Web Summary : Choose comfortable, stylish outfits for summer trips. Oversized t-shirts, cotton cord sets, tops with skirts, and cotton pants are ideal. Avoid jeans for a cool and trendy look during the heat.
Web Summary : गर्मी की यात्राओं के लिए आरामदायक, स्टाइलिश कपड़े चुनें। oversized टी-शर्ट, कॉटन कॉर्ड सेट, स्कर्ट के साथ टॉप और कॉटन पैंट आदर्श हैं। गर्मी के दौरान शांत और ट्रेंडी लुक के लिए जींस से बचें।