Lokmat Sakhi >Fashion > तब्येत सुधारल्यामुळे जुनं ब्लाऊज घट्ट होतंय? १ सोपी ट्रिक, ब्लाऊज होईल परफेक्ट मापाचं

तब्येत सुधारल्यामुळे जुनं ब्लाऊज घट्ट होतंय? १ सोपी ट्रिक, ब्लाऊज होईल परफेक्ट मापाचं

How To Make A Tight Blouse Fit Better?: आता तब्येत सुधारल्यामुळे जर तुमचे जुने ब्लाऊज तुम्हाला येत नसतील तर ते तुमच्या आताच्या आकारानुसार परफेक्ट मापाचे करण्यासाठी एक छोटीशी ट्रिक...(how to Alter or Resize old Tight Blouse to Fit Perfectly?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2024 17:05 IST2024-12-27T16:40:30+5:302024-12-27T17:05:05+5:30

How To Make A Tight Blouse Fit Better?: आता तब्येत सुधारल्यामुळे जर तुमचे जुने ब्लाऊज तुम्हाला येत नसतील तर ते तुमच्या आताच्या आकारानुसार परफेक्ट मापाचे करण्यासाठी एक छोटीशी ट्रिक...(how to Alter or Resize old Tight Blouse to Fit Perfectly?)

how to Alter or Resize old Tight Blouse to Fit Perfectly, simple tips and tricks for the alteration of old tight blouse | तब्येत सुधारल्यामुळे जुनं ब्लाऊज घट्ट होतंय? १ सोपी ट्रिक, ब्लाऊज होईल परफेक्ट मापाचं

तब्येत सुधारल्यामुळे जुनं ब्लाऊज घट्ट होतंय? १ सोपी ट्रिक, ब्लाऊज होईल परफेक्ट मापाचं

Highlightsअशाच पद्धतीने बाह्यांनाही जोड देऊन तुम्ही लहान झालेले जुने ब्लाऊज अगदी परफेक्ट मापाचे करू शकता.

बऱ्याच जणींच्या बाबतीत असं होतं की लग्नानंतर साधारण ८ ते १० वर्षे झाली की लग्नातल्या साड्यांवरचं ब्लाऊज येत नाही. कारण त्यादरम्यान तब्येत बरीच सुधारलेली असते. बाळंतपण झालेलं असतं. त्यामुळे मग छातीचा, पोटाचा भागही वाढलेला असतो. अशावेळी मग लग्नात घेतलेल्या महागड्या साड्या तर अगदी जशासतशा असतात. पण त्या साड्यांवरचे ब्लाऊज मात्र येईनासे होतात. त्या साड्यांवर जर वेगळा कपडा घेऊन ब्लाऊज शिवलं तर साडीला योग्य तो लूक येत नाही आणि साडी शोभून दिसत नाही (simple tips and tricks for the alteration of old tight blouse). त्यामुळे आता लहान झालेले ब्लाऊज कसे मोठे करावे याची ही सोपी ट्रिक पाहा आणि तुमच्या नेहमीच्या टेलरला दाखवून सगळे ब्लाऊज मोठे करून घ्या.(how to Alter or Resize old Tight Blouse to Fit Perfectly?)

 

लहान झालेले ब्लाऊज परफेक्ट मापाचे करण्याची ट्रिक

छातीमध्ये लहान झालेले ब्लाऊज परफेक्ट मापाचे कसे करावे, याची एक मस्त ट्रिक me ek housewife या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी आलिया भटने घातले २ ड्रेस- एक स्वस्त तर दुसरा अतिशय महाग, बघा किंमत

ते ब्लाऊज ज्या साडीवरचे आहे, ती साडीही त्यासाठी लागणार आहे. सगळ्यात आधी तुम्हाला ते ब्लाऊज किती वाढवावे लागणार आहे, याचे अचूक माप घ्या.

त्यानंतर त्या मापानुसार साडीचा जो नेसता पदर असतो, त्याच्या वरच्याबाजुचा काठ कापून घ्या. जिथला काठ कापला असेल तिथे त्याच मिळत्याजुळत्या कपड्याचा एखादा जोड द्या. किंवा ज्यांची उंची कमी असते, त्यांना असा जोड देण्याची गरजही पडत नाही.

 

आता जो काठाचा तुकडा कापला असेल त्याला खालच्या बाजुने अस्तर लावा. यानंतर जे ब्लाऊज मापाचे करायचे असेल ते मागच्या बाजुने मधोमध कापा. साडीच्या काठाचा अस्तर लावलेला तुकडा या दोन भागांच्यामध्ये जोडा.

चरबीचे थर साचून दंड खूपच जाडजूड दिसतात? ५ व्यायाम करा- काही दिवसांतच हात दिसतील सुडौल

त्यावर दोन्ही बाजुंनी लेस लावा. जेणेकरून तो भाग जोडला गेला आहे असे दिसणार नाही.

आता त्या जोडलेल्या भागाच्या मध्यभागी तुमच्या साडीच्या डिझाईन्सला शोभून दिसेल असा एखादा पॅच लावा.

अशाच पद्धतीने बाह्यांनाही जोड देऊन तुम्ही लहान झालेले जुने ब्लाऊज अगदी परफेक्ट मापाचे करू शकता. 

 

Web Title: how to Alter or Resize old Tight Blouse to Fit Perfectly, simple tips and tricks for the alteration of old tight blouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.