टेलिव्हिजनपासून ते चित्रपटांपर्यंत आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री हिना खानने (Hina Khan) नुकतंच लग्न केलं. हिना खान आणि तिला झालेला कॅन्सर सारखा गंभीर आजार, यातून यशस्वीपणे लढा (Hina Khan Aesthetic Look Wins Hearts) देत तिने या आजारावर मात केली. कॅन्सरसारख्या गंभीर आजारातून बाहेर पडण्यासाठी कायम तिच्यासोबतच सावली सारखा उभा असणारा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत तिने लग्नगाठ बांधली. हिना खानने (Hina Khan’s Manish Malhotra wedding saree Look) सोशल मिडीयावर तिच्या लग्नाचे फोटो शेअर करून ही गोड बातमी सगळ्यांसोबत शेअर केली(Hina Khan Wedding Fantastic Look).
खरंतर, लग्नासारख्या खास प्रसंगी महागडे आणि खूप उठावदार, झगमगीत असे भडक रंगाचे कपडे घालण्याचा ट्रेंड सध्या मागे पडत आहे. नेहमी झगमगाट आणि ग्लॅमरस लूकमध्ये दिसणारी हिना, या खास दिवशी मात्र मिनिमलिस्टिक ब्रायडल लुकमध्ये दिसली, आणि तरीसुद्धा तिचं सौंदर्य सगळ्यांच्या नजरा खिळवून ठेवणारं ठरलं. ना कोणतीही भरजरी साडी, ना मोठमोठाले भारदस्त दागदागिने, ना कोणताही बटबटीत - रंगीबेरंगी मेकअप तरी देखील हिना तितकीच उठून दिसत होती. हिनाच्या या लूकमध्ये साधेपणाची ताकद स्पष्टपणे जाणवली.
हिना खानचा लग्नातील खास लूक...
हिना खानने डिझायनर मनीष मल्होत्राच्या डिझायनर कलेक्शनमधील एक सुंदर पिस्ता कलरची साडी नेसली होती. ही टिश्यू सिल्क प्रकारांतील साडी गुलाबी ब्लाउज आणि दुपट्टासोबत नेसली होती. हिना खानने आपल्या लग्नासाठी परिधान केलेली साडीदेखील तिच्या संपूर्ण लूकइतकीच खास होती. तिने ओपल ग्रीन रंगाची टिश्यू सिल्क साडी नेसली होती, ज्याचे विणकाम करताना सोने आणि चांदीच्या धाग्यांनी पारंपरिक आणि अनेक शतकांपासून चालत आलेले मोटिफ्स अत्यंत सुंदरपणे विणले होते. या साडीसोबत हिनाने हलक्या गुलाबी रंगाची बॉर्डर असलेलं थ्रेडवर्क आणि झरदोझी वर्कने सजवलेला दुपट्टा डोक्यावर घेतला होता, ज्यामुळे तिचा लूक अधिकच पारंपरिक आणि खास वाटत होता.
साडी प्रमाणेच तिच्या हातांवरील मेहेंदी देखील तितकीच साधी पण सुंदर दिसत होती. मेहंदीमध्ये तळहाताच्या मध्यभागी कमळाचे मोठे फूल, अचूक नाजूक असे डिझाइन आहे, जे शुद्धता आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. बोटांवर जाळीदार नक्षी आणि बारीक वेलबुट्टी काढल्या होत्या, ज्यामुळे मेहंदी आणखीनच शाही दिसत होती.
घनदाट- काळ्याभोर लांबसडक केसांसाठी मोहरीच्या तेलात मिसळा ३ पदार्थ, केसांचं रुपच पालटेल...
डोकेदुखी, पोटाच्या तक्रारी आणि सर्दी कफाचा त्रास? नागवेली पानाचा खास उपाय - मिळेल आराम...
हिनाच्या पायांवर रेखाटलेली मेंदीही तिच्या संपूर्ण ब्रायडल लूकचा आकर्षक आणि महत्त्वाचा भाग ठरली. पायांच्या तळव्यांवर कमळाच्या फुलाची सुंदर डिझाईन्स पाहायला मिळाले. केवळ पायाच्या वरच्या भागावरच नाही, तर तळव्यांवरही मंडला डिझाइन्स आणि फुलांचे डिझाईन दिसत आहे. पायाच्या अंगठ्याजवळ आणि बोटांभोवती कोरलेले बारीक बुट्टेदार डिझाइन्स आणि लाईनिंग, पायातील पैंजणांसोबत तर अतिशय उठून दिसत होते. हिनाच्या या मेंदी लूकमध्ये सौंदर्य आणि परंपरेचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला.
हिनाच्या मेहेंदीने रंगलेल्या सुंदर हातांमध्ये पारंपरिक काचेच्या बांगड्या, चांदबाली-कट कडा, आणि जडाऊ अंगठ्या घातलेल्या होत्या, ज्यामुळे तिचा संपूर्ण लूक अधिकच राजेशाही आणि आकर्षक वाटत होता. तिच्या साध्या मेकअपमध्ये ताजेपणा आणि नैसर्गिक सौंदर्य उठून दिसत होते. न्यूड लिप शेड, हल्की गुलाबी बिंदी, आणि नॅचरल हायलाइट्स असा साधा मेकअप करून हिना खूपच सुंदर दिसत होती. हिनाचा हा साधा, परंतु अत्यंत अर्थपूर्ण असा ब्रायडल लूक तिच्या व्यक्तिमत्त्वाची आणि तिच्या प्रेमाची खरी ओळख आहे. खरंच "सादगी मे सुंदरता"...हिना खानचा लग्नाचा लूक हे या वाक्याचं उत्तम उदाहरण हे दिसून आले.