Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fashion > Gudi Padwa 2026: सहावारी साडीची नेसा नऊवारी अगदी १० मिनिटांत, साडी नेसण्याची सोपी युक्ती-लूक पारंपरिक

Gudi Padwa 2026: सहावारी साडीची नेसा नऊवारी अगदी १० मिनिटांत, साडी नेसण्याची सोपी युक्ती-लूक पारंपरिक

Gudi Padwa 2026: Turn a 6-Yard Saree into a Nauvari in Just 10 Minutes – Easy Draping trick for a Traditional Look : सहावारीची नऊवारी नेसा पटकन. सोपी पद्धत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2026 14:16 IST2026-03-16T14:13:39+5:302026-03-16T14:16:16+5:30

Gudi Padwa 2026: Turn a 6-Yard Saree into a Nauvari in Just 10 Minutes – Easy Draping trick for a Traditional Look : सहावारीची नऊवारी नेसा पटकन. सोपी पद्धत.

Gudi Padwa 2026: Turn a 6-Yard Saree into a Nauvari in Just 10 Minutes – Easy Draping trick for a Traditional Look | Gudi Padwa 2026: सहावारी साडीची नेसा नऊवारी अगदी १० मिनिटांत, साडी नेसण्याची सोपी युक्ती-लूक पारंपरिक

Gudi Padwa 2026: सहावारी साडीची नेसा नऊवारी अगदी १० मिनिटांत, साडी नेसण्याची सोपी युक्ती-लूक पारंपरिक

Gudi Padwa 2026 Special Nauvari Saree: सहावारीची साडी असली तरी त्यापासून नऊवारी नेसता येते आणि दिसतेही अगदी सुंदर. नऊवारीसारखा पारंपरिक लूक करणे आजकाल अनेक महिलांना पुन्हा आवडायला लागले आहे. त्यात जर सण गुढी पाडव्यासारखा मराठमोळा असेल तर नऊवारी तर हवीच.  (Gudi Padwa 2026: Turn a 6-Yard Saree into a Nauvari in Just 10 Minutes – Easy Draping trick for a Traditional Look )नऊवारी साडी नेसणे थोडे अवघड असले तरी सहावारी साडी वापरुन त्याची नऊवारीचा छान आणि उठावदार लूक जेणारी पटकन सहज नेसता येते. थोडी योग्य पद्धत आणि काही साध्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर सहावारीची नऊवारी नेसणे अगदी सोपे होते.

साडी नेसण्यापूर्वी योग्य तयारी करणे महत्त्वाचे असते. साडी व्यवस्थित बसण्यासाठी फिट बसणारा ब्लाऊज हवा.  तसेच चांगली लेगिंग घालणे गरजेचे आहे. त्यामुळे साडीची पकड चांगली राहते आणि काष्टा काढताना साडी सैल होत नाही. साडी नेसताना सेफ्टी पिन जवळ ठेवली तर साडी नीट सेट करणे आणखी सोपे जाते. फक्त पिन लावताना ती निघणार नाही आणि टोचणार नाही याची काळजी घ्या. 

सहावारीची नऊवारी नेसताना साडी मधोमध पकडून त्याच्या टोकांना कंबरेजवळ बांधा नीट गाठ मारा आणि मग एका बाजूला निऱ्या काढून त्या मागे खोचा तर दुसरी बाजू पदराची असते. साडीची एक फेरी पूर्ण कंबरेभोवती न घेता पायंच्या मधून मागे घ्यायची, दुसरी वरती घ्यायची. त्यामुळे साडी व्यवस्थित बसते. पुढच्या बाजूला साडीच्या नीट घड्या करुन त्या नाभीच्या थोड्या डाव्या बाजूला खोचाव्या. घड्या जितक्या नीट आणि समांतर असतील तितका नऊवारीचा लूक अधिक सुंदर दिसतो.

यानंतर उरलेली साडी खांद्यावरून पदर म्हणून घ्यावी. पदर तसा जरा लहान येतो. कारण शेवटी साडी सहावार आहे. शेवटी साडीच्या घड्या, काष्टा आणि पदर नीट बसले आहेत का ते आरशात पाहून थोडीफार सेटिंग करावी. गरजेच्या ठिकाणी पिना लावाच. लक्षात ठेवा की ज्या रंगाची साडी आहे त्यात रंगाची पॅण्ट आत घाला. म्हणजे विचित्र दिसणार नाही. 

सहावारीची नऊवारी नेसताना हलक्या कापडाची साडी निवडली तर नेसणे आणि सांभाळणे सोपे जाते. कॉटन, सिल्क मिक्स किंवा हलक्या फॅब्रिकची साडी यासाठी उत्तम ठरते. त्याचबरोबर पारंपरिक दागिने, गजरा, बिंदी किंवा नथ घातली तर नऊवारीचा लूक आणखी खुलून दिसतो. सुरुवातीला ही पद्धत थोडी अवघड वाटू शकते, पण एक-दोन वेळा सराव केला की सहावारीची नऊवारी सहज आणि आत्मविश्वासाने नेसता येते.
 

Web Title : गुड़ी पड़वा: छह गज की साड़ी से नौवारी साड़ी बनाएं

Web Summary : मिनटों में छह गज की साड़ी को नौवारी में बदलें! गुड़ी पड़वा के लिए बिल्कुल सही, यह आसान ट्रिक आरामदायक फिट के साथ एक पारंपरिक लुक प्रदान करती है। हल्के कपड़े चुनें और संपूर्ण, प्रामाणिक शैली के लिए एक्सेसराइज़ करें।

Web Title : Gudi Padwa: Drape a Nauvari Saree from a Six-Yard Saree

Web Summary : Transform a six-yard saree into a stunning Nauvari in minutes! Perfect for Gudi Padwa, this easy trick offers a traditional look with a comfortable fit. Choose light fabrics and accessorize for a complete, authentic style.