Lokmat Sakhi >Fashion > क्यों की.. तुलसीचं कमबॅक, पाहा तिच्या नव्या खास साड्या! पारंपरिक कॉटन साड्यांना नवा लूक..

क्यों की.. तुलसीचं कमबॅक, पाहा तिच्या नव्या खास साड्या! पारंपरिक कॉटन साड्यांना नवा लूक..

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Season 2: 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकच्या सिझन २ मध्ये तुलसी विरानी कोणत्या साड्या नेसणार, त्या कशा असणार याविषयी या काही खास गोष्टी पाहाच.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2025 14:20 IST2025-07-10T19:37:27+5:302025-07-11T14:20:15+5:30

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Season 2: 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकच्या सिझन २ मध्ये तुलसी विरानी कोणत्या साड्या नेसणार, त्या कशा असणार याविषयी या काही खास गोष्टी पाहाच.. 

gaurang shah has designed special saree for tulsi virani's come back after 25 years, kyunki saas bhi kabhi bahu thi season 2  | क्यों की.. तुलसीचं कमबॅक, पाहा तिच्या नव्या खास साड्या! पारंपरिक कॉटन साड्यांना नवा लूक..

क्यों की.. तुलसीचं कमबॅक, पाहा तिच्या नव्या खास साड्या! पारंपरिक कॉटन साड्यांना नवा लूक..

Highlights तिच्या प्रत्येक साडीमध्ये एक इतिहास आणि एक खास अर्थ दडलेला आहे. 

'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेचा दुसरा भाग तब्बल २५ वर्षांनी रसिकांच्या भेटीला येत आहे. २००० साली जेव्हा ही मालिका प्रदर्शित झाली होती तेव्हा या मालिकेने खरोखरच लोकप्रियतेचा एक इतिहास घडविला होता. आता पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदीने ती मालिका रसिकांच्या भेटीला येत आहे. तुलसी विरानी हे या मालिकेतलं महत्त्वाचं पात्र. तुलसी, तिचं कुटूंब यांच्या आसपास या मालिकेची कथा गुंफली जाते. शिवाय तुलसीची भुमिका देशाचं मंत्रीपद भुषविणाऱ्या स्मृती इराणी साकारत आहेत. त्यामुळे मालिकेमधली सर्वाधिक कॅची व्यक्तीरेखा असणारं हे पात्र एकदम भारदस्त दिसायला हवं (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Season 2). परंपरा जपणारी तुलसी तिच्या पेहरावावरूनही तशीच दिसायला हवी. म्हणूनच फॅशन डिझायनर गौरांग शहा यांनी तुलसीच्या साड्या अगदी खास पद्धतीने डिझाईन केलेल्या आहेत.(Gaurang Shah has designed special saree for Tulsi Virani's come back after 25 years)

 

कशा असणार आहेत तुलसी विरानीच्या साड्या?

नव्या मालिकेतली तुलसी कशी असणार याविषयी स्मृती इराणींनी एका मुलाखतीत माहिती दिली होती. त्यामध्ये त्या सांगतात की गौरांग शहा यांनी अतिशय कलात्मकतेने तुलसीच्या साड्या तयार केल्या आहेत.

५ पद्धतीने करा वॉकिंग! वजन उतरेल भराभर आणि आरोग्याला होतील भरपूर फायदे...

भारताच्या वेगवेगळ्या प्रांताच्या गोष्टी, परंपरा तर त्या साड्या सांगतच आहेत पण त्यासोबतच त्या परंपरांचा अधुनिकतेशीही सुंदर मिलाफ साधण्यात आला आहे. याचं उत्तम उदाहरण अगदी मालिकेच्या प्रोमोमध्येच दिसून येत आहे. प्रोमोमध्ये तुलसीने बैंगनी रंगाची साडी नेसली आहे. ही साडी शिफॉन कांजीवरम प्रकारातली आहे. एरवी कांजीवरम साड्या सिल्कमध्ये दिसतात. पण नव्या आणि जुन्या पिढीच्या आवडीनिवडी जपत ही साडी तयार करण्यात आली आहे. 

 

गौरांग शाह म्हणतात की तुलसी हे एक असं पात्र आहे जिच्यामध्ये सामर्थ्यही आहे आणि शालिनताही आहे. ती अशा महिलांचं प्रतिनिधीत्व करते ज्या काळासोबत स्वत:ला बदलतात पण काही मुल्यांमध्ये मात्र अजिबात तडजोड करत नाहीत.

जेनेलिया डिसुझाची मुलांकडून ‘ही’ एकच अपेक्षा, कुणी एकटं-उदास असेल तर माझ्या मुलांनी..

त्यामुळे अशा व्यक्तिरेखेचा पेहरावही तसाच असायला हवा. नव्या सिझनमध्ये तुलसी शिफॉन प्रकारातली कांजीवरम, चमकदार रेशमी बांधनी साडी, जामदानी साडी नेसताना दिसणार आहे. तिच्या प्रत्येक साडीमध्ये एक इतिहास आणि एक खास अर्थ दडलेला आहे. 
 

Web Title: gaurang shah has designed special saree for tulsi virani's come back after 25 years, kyunki saas bhi kabhi bahu thi season 2 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.